एक्स्प्लोर

पीक विम्याच्या प्रश्नावर शिवसेना खासदार पंतप्रधान मोदींच्या भेटीला

पीक विम्याबाबत शिवसेना सध्या आक्रमक झालेली पाहायला मिळत आहे. मुंबईत विमा कंपन्यांच्या कार्यालयावर शिवसेनेकडून मोर्चाही काढण्यात आला होता. त्यानंतर आता शिवसेना खासदारांनी आज पंतप्रधान मोदींची भेट घेतली आहे.

नवी दिल्ली : पीक विम्याच्या मुद्द्यावर मुंबईत विमा कंपन्यांविरोधात मोर्चा काढल्यानंतर आज शिवसेनेच्या खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची या प्रश्नावर भेट घेतली आहे. संसदेतल्या पंतप्रधान कार्यालयात आज ही भेट झाली. यावेळी शिवसेना खासदारांनी पीकविम्या संदर्भातील अडचणींची पंतप्रधान मोदींना माहिती दिली. पीक विम्याबाबत शिवसेना सध्या आक्रमक झालेली पाहायला मिळत आहे. मुंबईत विमा कंपन्यांच्या कार्यालयावर शिवसेनेकडून मोर्चाही काढण्यात आला होता. त्यानंतर आता शिवसेना खासदारांनी आज पंतप्रधान मोदींची भेट घेतली आहे. यावेळी त्यांनी पीकविम्याची रक्कम देताना कंपन्यांकडून चालढकल होत असल्याबाबत माहिती पंतप्रधानांना दिली. एकट्या महाराष्ट्रातच शेतकऱ्यांचे 473 कोटी रुपये विमा कंपन्यांनी हडपल्याचंही यावेळी खासदारांनी मोदींच्या निदर्शनास आणून दिलं. पीक विमा योजना चांगली असली तरी या संदर्भातली पूर्ण माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नसल्याने विमा कंपन्या त्याचा गैरफायदा घेत आहेत, असेही यावेळी खासदारांनी म्हटलं आहे. आणेवारी करण्याची पद्धत सुधारली पाहिजे, अशी मागणीही यावेळी खासदारांनी केली. शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्यानंतर जिल्ह्यात विमा कंपन्यांचे अधिकारी सापडत नाहीत त्यामुळे विमा कंपनीचं ऑफिस प्रत्येक तालुक्यात असायला हवं, अशीही मागणी त्यांनी केली. शिवसेना खासदाराच्या या मागणीनंतर पंतप्रधानांनी या योजनेतील काही त्रुटी दूर करण्याबाबत आपण लक्ष घालू, असे आश्वासन दिल्याचं या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना शिवसेना गटनेते विनायक राऊत यांनी सांगितलं आहे. मुंबईतल्या मोर्चात उद्धव ठाकरे यांनी विमा कंपन्यांना पंधरा दिवसांची डेडलाईन दिली होती. ही डेडलाईन आता दोन दिवसात संपत आहे. त्यामुळे शिवसेनेच्या या पवित्र्यानंतर तरी विमा कंपन्या सरळ होणार की हा केवळ राजकीय स्टंट ठरणार, हे पाहणे महत्त्वाचं असेल. पीक विम्याच्या प्रश्नावरुन शिवसेना पुन्हा आक्रमक

महत्त्वाच्या बातम्या

बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
Monsoon Session 2026 : काय आहे 'मिशन 360'? बजेट सत्रानंतर कसं बदललं संसदेचं गणित? मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पास होणार का?
काय आहे 'मिशन 360'? बजेट सत्रानंतर कसं बदललं संसदेचं गणित? मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पास होणार का?
सोनम वांगचुक आमच्यासाठी आणि देशासाठी महत्त्वाचे, सरकार अतिशय असंवेदनशील, सुप्रिया सुळेंची टीका
सोनम वांगचुक आमच्यासाठी आणि देशासाठी महत्त्वाचे, सरकार अतिशय असंवेदनशील, सुप्रिया सुळेंची टीका
राज ठाकरेंना काय ढेकळं कळतात का? आता हलगी वाजवणारे झालेत; गुणरत्न सदावर्तेंची अमित ठाकरेंवरही टीका
राज ठाकरेंना काय ढेकळं कळतात का? आता हलगी वाजवणारे झालेत; गुणरत्न सदावर्तेंची अमित ठाकरेंवरही टीका

व्हिडीओ

Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashadhi Wari : वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
Sir Garry Sobers : क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
RBI चा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
MSRTC Fare Hike : एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली? जाणून घ्या
एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली?
पुण्यात 18 वर्षीय तरुणीने उचललं टोकाचं पाऊल; राहत्या घरीच जीवन संपवलं, आई-वडिलांवर दु:खाचा डोंगर
पुण्यात 18 वर्षीय तरुणीने उचललं टोकाचं पाऊल; राहत्या घरीच जीवन संपवलं, आई-वडिलांवर दु:खाचा डोंगर
धुमाकूळ घालणाऱ्या अस्वलाला भरपावसात पकडलं; वन विभागाच्या टीमचं धाडस, लोकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला
धुमाकूळ घालणाऱ्या अस्वलाला भरपावसात पकडलं; वन विभागाच्या टीमचं धाडस, लोकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला
Embed widget