एक्स्प्लोर

मध्य प्रदेशचे रस्ते अमेरिकेपेक्षा गुळगुळीत, खोटं बोलणाऱ्या मुख्यमंत्र्यांना ट्विटरवर धुतलं!

मध्य प्रदेशातील रस्ते हे अमेरिकेतील रस्त्यांपेक्षा उत्तम आणि गुळगुळीत आहेत, असा दावा शिवराजसिंहांनी अमेरिकेत केला.

वॉशिंग्टन:  अमेरिका दौऱ्यावर असलेले मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना रेटून खोटं बोलणं महागात पडलं. मध्य प्रदेशातील रस्ते हे अमेरिकेतील रस्त्यांपेक्षा उत्तम आणि गुळगुळीत आहेत, असा दावा शिवराजसिंहांनी अमेरिकेत केला. मात्र त्यांच्या या वक्तव्यानंतर शिवराजसिंहांना सोशल मीडियातून ट्रोल करण्यात येत आहे. शिवराजसिंह हे मध्य प्रदेशात परदेशी गुंतवणूक वाढावी यासाठी यूएस इंडिया स्ट्रॅटेजिक फोरममध्ये सहभागी झाले आहेत. https://twitter.com/ANI/status/922837634744950785 यावेळी शिवराज म्हणाले, “मी गेल्या 12 वर्षांपासून मध्य प्रदेशचा मुख्यमंत्री आहे. पायाभूत सुविधांशिवाय कोणतंही राज्य पुढे जाऊ शकत नाही. त्यासाठी सर्वात आधी आम्ही रस्ते बनवले. ज्यावेळी मी अमेरिकेत विमानतळावर उतरलो आणि रस्त्याने आलो, तेव्हा मला वाटलं की मध्य प्रदेशचे रस्ते हे अमेरिकपेक्षा उत्तम आहेत”. शिवराज यांचं वक्तव्य वायूवेगानं व्हायरल झालं आणि लोकांनी हसा लेको स्टाईलमध्ये त्याची खिल्ली उडवली. शिवराज यांच्या वक्तव्यानंतर लोकांनी ट्विटरवर तऱ्हेऱ्हेचे फोटो टाकायला सुरुवात केली. https://twitter.com/iamjee2/status/922870382348025856 कुणीतरी पूर स्थितीचा दौरा करतानाचा फोटो टाकला, आणि त्यावर मुख्यमंत्री रस्ते सफाईची पाहणी करताना अशी टॅगलाईन हाणली. https://twitter.com/mohitraj/status/922868092320980992 एकानं तर कहर केला, पहिलं चित्र वॉशिंग्टन डीसीचं तर दुसरं मध्य प्रदेशचं असल्याचं म्हटलं. https://twitter.com/RoflGujarati_/status/922878880679059457 तर एका फोटोवर हा रस्ता मध्य प्रदेशातील मंदसौरचा असल्याचं लिहिलं.. https://twitter.com/fazlurism/status/922870789921112065 अभिनेते अनुपम खेर यांच्या नावाचं पॅरोडी अकाऊंट आहे, त्यावर कुणीतरी रतलामच्या दीन दयाल कॉलनीतला हा अप्रतिम नजारा बघा, म्हणत शिवराज यांची खिल्ली उडवली. https://twitter.com/Kumar_Ke5hav/status/922871178556928001 https://twitter.com/sagarcasm/status/922865138004140037 https://twitter.com/runjhunmehrotra/status/922867381319245824 https://twitter.com/Hasanraza0007/status/922905271160180737 आता शिवराज यांनी केलेल्या हास्यास्पद वक्तव्याचं वास्तव बघा.. 2015 च्या एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार -मध्य प्रदेशात रोज 112 रस्ते अपघात होतात -त्यात 27 लोकांचा जीव जातो - रस्ते अपघातात एमपी चौथ्या नंबरवर आहे. शिवराज यांना वाटलं की अमेरिकेत काहीही पुड्या सोडल्या तरी काय कळणाराय? पण सोशल मीडियाचं लचांड किती भयानक आहे, याचा अनुभव शिवराज यांना आला असेल. त्यामुळे खोटं बोल पण रेटून बोल असला धंदा बंद थांबवलेलाच बरा.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 09PM TOP Headlines 09 PM 19 January 2024Special Report Saif Ali Khan Attacker :र्जी, G-पे आणि बेड्या;सैफच्या 'जानी दुश्मन'च्या अटकेची कहाणीWankhede Stadium Turns 50 Documentry : वानखेडे झालं 50 वर्षांचं! कहाणी वानखेडे स्टेडियमच्या निर्मितीचीABP Majha Marathi News Headlines 08PM TOP Headlines 08 PM 19 January 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Dada Bhuse : नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Embed widget