एक्स्प्लोर
प्रजासत्ताक दिनी राजपथावर अवतरणार ‘शिवराज्याभिषेक’
राजपथावर प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या पथसंचलनासाठी महाराष्ट्राच्यावतीने ‘शिवराज्याभिषेका’ वर आधारित चित्ररथ सादर होणार आहे. चित्ररथ बांधणीसाठी प्रसिध्द कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या नेतृत्वाखालील चमू दिल्लीत दाखल झाला आहे. यावर्षी 69 वा प्रजासत्ताक दिनी इंडियागेट वरील राजपथावर महाराष्ट्रासह 14 राज्यांचे चित्ररथ प्रदर्शित होणार आहे.
नवी दिल्ली : राजपथावर प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या पथसंचलनासाठी महाराष्ट्राच्यावतीने ‘शिवराज्याभिषेका’ वर आधारित चित्ररथ सादर होणार आहे. चित्ररथ बांधणीसाठी प्रसिध्द कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या नेतृत्वाखालील चमू दिल्लीत दाखल झाला आहे. यावर्षी 69 वा प्रजासत्ताक दिनी इंडियागेट वरील राजपथावर महाराष्ट्रासह 14 राज्यांचे चित्ररथ प्रदर्शित होणार आहे.
यावर्षी देशभरातून एकूण 29 राज्यांनी प्रजासत्ताक दिनी राजपथावरील चित्ररथ प्रदर्शनासाठी दावेदारी केली होती. विविध चाचण्यांनंतर महाराष्ट्रासह देशातील फक्त 14 राज्यांच्या चित्ररथांची निवड या गौरवपूर्ण कार्यक्रमासाठी झाली आहे.
महाराष्ट्राच्या या चित्ररथावर रायगड किल्यावर असलेली ‘मेघडंबारी’ उभारण्यात येणार असून शिवराज्याभिषेक दर्शविण्यासाठी प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिकाही साकारली जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेतील कलाकारासह चित्ररथावर एकूण 10 कलाकार असतील. चित्ररथाच्या उजव्या आणि डाव्या बाजुला विविध प्रतिमांच्या माध्यमातून शिवराज्याभिषेकाचा अभूतपूर्व सोहळा दर्शविण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे गुणगौरव वर्णन करणाऱ्या गीतांची धूनही राजपथावर या चित्ररथासह सादर होणार आहे.
यापूर्वी 1980 मध्येही राज्याच्यावतीने ‘शिवराज्याभिषेक’ दर्शविणारा चित्ररथ प्रदर्शित केला होता. यास प्रथम पारितोषिक मिळालं होतं. 1983 मध्ये ‘बैल पोळा’ या चित्ररथास प्रथम क्रमांक मिळाला होता. यानंतर 1993 ते 1995 असा सलग 3 वर्ष प्रथम क्रमांकाचा मान महाराष्ट्राला मिळाला होता. 2015 मध्ये प्रदर्शित ‘पंढरीची वारी’ या चित्ररथास प्रथम क्रमांक मिळाला ही उल्लेखनीय बाब आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
महाराष्ट्र
Advertisement