एक्स्प्लोर
शशी थरुर यांच्या 'डॉग फिल्टर' ट्वीटचा नेटिझन्सकडून समाचार
मुंबई पोलिसांनी एआयबीविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर याचा निषेध करत काँग्रेस नेते शशी थरुर यांनीही 'डॉग फिल्टर' वापरला आहे. पण यामुळे त्यांना नेटिझन्सच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे.
मुंबई : 'एआयबी'ने मोदींच्या फोटोवर स्नॅपचॅटवरच ‘डॉगी फिल्टर’ लावून त्यांच्या फोटोची खिल्ली उडवली होती. यानंतर नेटिझन्सनी यावर आक्षेप घेतल्यानंतर मुंबई पोलिसांनी 'एआयबी'विरोधात गुन्हा दाखल केला. पण याचा निषेध करत काँग्रेस नेते शशी थरुर यांनीही 'डॉग फिल्टर' वापरला आहे. पण यामुळे त्यांना नेटिझन्सच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे. शशी थरुर यांनी आपल्या फोटोला ‘डॉगी फिल्टर’ वापरुन ट्विटरवर पोस्ट करुन ट्रोलरना आव्हान दिलं आहे. पण या फोटोमुळे ते स्वत: अडचणीत आले आहेत. कारण शशी थरुर यांच्या या फोटोवर नेटिझन्सनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.
'एआयबी' ग्रुपने आपल्या ट्वीटर हॅण्डलवरुन मोदींच्या फोटोला ‘डॉगी फिल्टर’ लावून शुक्रवारी तो फोट पोस्ट केला होता. पण या फोटोवर नेटिझन्सनी तीव्र आक्षेप नोंदवला. यानंतर एआयबीने हा फोटो टि्वटरवरून हटवला. मात्र, मुंबई पोलिसांच्या सायबर गुन्हे विभागाने याची गंभीर दखल घेत, शनिवारी 'एआयबी'विरोधात गुन्हा दाखल केला होता. संबंधित बातम्या एआयबीकडून मोदींच्या फोटोवर डॉग फिल्टरAttn all trolls: I took the #DogFilter challenge! @AllIndiaBakchod pic.twitter.com/0lmClCS7CF
— Shashi Tharoor (@ShashiTharoor) July 15, 2017
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
छत्रपती संभाजी नगर
मुंबई
व्यापार-उद्योग
राजकारण























