Shashi Tharoor on Bihar Political Crisis : नितीशकुमारांना एकवेळ आयाराम, गयाराम अन् पलटूराम म्हणता येईल, पण शशी थरुरांनी वापरलेल्या शब्दाने घाम फुटायची वेळ!
वृत्तसंस्था पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, बिहारच्या घटनेनंतर काँग्रेस नेते शशी थरूर यांनी आपल्या परिचित शैलीत नवीन शब्द वापरला आहे. '
![Shashi Tharoor on Bihar Political Crisis : नितीशकुमारांना एकवेळ आयाराम, गयाराम अन् पलटूराम म्हणता येईल, पण शशी थरुरांनी वापरलेल्या शब्दाने घाम फुटायची वेळ! Shashi Tharoor on nitishkumar has coined a new word in his familiar style jdu bjp Shashi Tharoor on Bihar Political Crisis : नितीशकुमारांना एकवेळ आयाराम, गयाराम अन् पलटूराम म्हणता येईल, पण शशी थरुरांनी वापरलेल्या शब्दाने घाम फुटायची वेळ!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/28/57bb543208fe4a9bc695f806a555469c1706441956852736_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Shashi Tharoor on Bihar Political Crisis : आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीत मोठी फूट पडली आहे. बिहारमध्ये इंडिया आघाडीला धक्का देत बिहारचे मुख्यमंत्री आणि जेडीयू अध्यक्ष नितीश कुमार एनडीएमध्ये सामील झाले आहेत. नितीश कुमार यांनी रविवारी (28 जानेवारी) बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि महाआघाडी सरकारचा निरोप घेतला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी रविवारी (28 जानेवारी) नितीश कुमार यांच्या निर्णयाचा खरपूस समाचार घेतला आणि त्यांच्यासाठी पुन्हा एकदा 'स्नॉलीगोस्टर' हा शब्द वापरला.
वृत्तसंस्था पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, बिहारच्या घटनेनंतर काँग्रेस नेते शशी थरूर यांनी आपल्या परिचित शैलीत नवीन शब्द वापरला आहे. 'स्नॉलीगोस्टर' (snollygoster) हा शब्द वापरून त्यांनी नितीश कुमार यांचे वर्णन 'धूर्त' किंवा तत्त्वशून्य राजकारणी असे केले आहे. त्यांनी ट्विटरवर 2017 ची पोस्ट देखील शेअर केली आहे, ज्याचा संबंध बिहारमधील सध्याच्या राजकीय संकटाशी आहे.
<Sigh!> Didn’t realise it would be the Word of Another Day too ! #Snollygoster https://t.co/W6KKVrGb5i
— Shashi Tharoor (@ShashiTharoor) January 28, 2024
2017 मध्ये नितीश कुमार भाजपमध्ये सामील झाल्याची पोस्ट शेअर
शशी थरूर यांनी 2017 ची एक पोस्ट शेअर केली आहे. तेव्हा नितीश कुमार यांनी बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेससोबत केलेल्या महाआघाडीपासून वेगळे झाल्यावर केली होती. यानंतर भाजपशी दीर्घकाळ राजकीय वैर राहिल्यानंतर ते त्यांच्याकडे परतले आहेत.
'मला पुन्हा 'स्नॉलीगोस्टर' वापरावे लागेल हे माहित नव्हते'
सध्याच्या घडामोडींचा दुवा साधत थरुर यांनी 27 जुलै 2017 चे ट्विट शेअर केले. जुन्या ट्विटमध्ये त्यावेळी वापरल्या गेलेल्या 'स्नॉलीगोस्टर' या अमेरिकन शब्दाचा संदर्भ देत लिहिले की, "हा आणि एका दिवसाचा शब्द असेल हे माहित नव्हते." #snollygoster.
2019 च्या राजकीय घडामोडींवर देखील वापर
2017 मध्ये हा शब्द वापरल्यानंतर त्यांनी 2019 मध्ये वापरला. ज्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आणि भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार यांनी पाठिंबा दिला होता.
सरड्याचा व्हिडिओही शेअर
थरूर यांनी नोव्हेंबर 2022 मध्ये एक व्हिडिओ देखील पोस्ट केला होता ज्यामध्ये रंग बदलणारा गिरगिट खांबावर चढताना दाखवला होता. अनेकदा राजकीय उड्या मारणाऱ्या राजकारण्यांची खरडपट्टी काढण्यासाठी केले होते. 'स्नॉलीगोस्टर' हा शब्दही त्यावेळी वापरला होता. हिमाचल प्रदेश आणि गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतर करणाऱ्यांना लक्ष्य करण्याच्या संदर्भात त्यांनी हा प्रकार केला होता. दुसरीकडे, काँग्रेसनेही जेडीयू अध्यक्ष नितीश कुमार यांची तुलना 'सरड्या'शी केली. विश्वासघात केल्याबद्दल नितीशकुमार यांनी बिहारच्या जनतेची जाहीर माफी मागावी, असेही काँग्रेसने म्हटले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)