एक्स्प्लोर
शरद यादव यांना जेडीयूच्या राज्यसभा गट नेतेपदावरुन हटवलं!
जेडीयूच्या खासदारांची आज सायंकाळी 5 वाजता बैठक होणार आहे. या बैठकीत अधिकृतपणे निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती आहे.
![शरद यादव यांना जेडीयूच्या राज्यसभा गट नेतेपदावरुन हटवलं! Sharad Yadav Removed As Party Leader In Rajya Sabha शरद यादव यांना जेडीयूच्या राज्यसभा गट नेतेपदावरुन हटवलं!](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/08/12133653/Nitish_Sharad-580x39511.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नवी दिल्ली : बिहारच्या राजकारणात आणखी एक मोठी घडामोड घडली आहे. सतत पक्षविरोधी भूमिका ठेवल्याने जेडीयूचे ज्येष्ठ नेते आणि खासदार शरद यादव यांना जेडीयूच्या राज्यसभेच्या गट नेतेपदावरुन हटवण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे.
शरद यादव यांच्या जागी आरसीपी सिंह यांची गट नेतेपदी नियुक्ती केली जाणार आहे. जेडीयूच्या खासदारांची आज सायंकाळी 5 वाजता बैठक होणार आहे. या बैठकीत अधिकृतपणे निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती आहे.
बिहारमध्ये गेल्या काही दिवसांपासून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आरजेडीचे लालू प्रसाद यादव यांच्यासोबतच्या वादानंतर भाजपसोबत सत्ता स्थापन केली.
यापूर्वी शरद यादव दिल्लीतून पाटण्यात दाखल झाल्यानंतर, आपण महायुतीसोबत असल्याचं वक्तव्य केलं होतं. तसेच बिहारच्या 11 कोटी जनतेने 2015 च्या विधानसभा निवडणुकीत पाच वर्षांसाठी महायुतीला जनादेश दिला होता, असं म्हणतं नितीश कुमारांना घरचा आहेर दिला होता.
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्या संपत्तीवरील सीबीआयच्या छापेमारीनंतर, नितीश कुमारांनी 26 जुलै रोजी स्वत: च आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. पण दुसऱ्याच दिवशी म्हणजे, 27 जुलै रोजी भाजपसोबत युती करत, पुन्हा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.
नितीश कुमार बिहारच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर, आज पंतप्रधान मोदींची भेट घेतली. या भेटीत बिहारच्या विकासासंबंधी विविध विषयांवर चर्चा झाली. तसेच यानंतरही आपण पुन्हा मोदींच्या भेटीसाठी दिल्लीत येणार असल्याचं, माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं.
दुसरीकडे राजेडी अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी जेडीयूमधील फुटीवरुन नितीश कुमारांवर निशाणा साधला होता. नितीश कुमारांनी शरद यादव यांना धोका दिल्याचं सांगत, शरद यादव पाटण्याला आल्यानंतर जदयूचे कार्यकर्ते त्यांचा विरोध करतील आणि नितीश कुमारांच्या इशाऱ्यावर त्यांच्यावर हल्लाही होऊ शकतो, असा आरोप लालू यादव यांनी केला होता. त्यांच्या पक्षाची शरद यादव यांच्या जेडीयूशी युती कायम राहिल, असंही लालू म्हणाले होतं.
संबंधित बातम्या
शरद यादव यांची जेडीयूमधून हकालपट्टी होणार?
नितीश कुमारांचा अंतरात्मा पंतप्रधान मोदींमध्ये आहे का? : तेजस्वी यादव
नितीश कुमार सत्तेचे भुकेले, लालूप्रसाद यादव यांचं टीकास्त्र
बिहारमध्ये आणखी एक भूकंप, जेडीयूमध्ये फूट?
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
शिक्षण
बातम्या
ठाणे
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)