एक्स्प्लोर
'दलित हे देखील हिंदूच, मनुस्मृतीत सर्वांना समान अधिकार'
द्वारका पीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरुपानंद यांनी कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणात जातीय संघर्ष नसल्याचं म्हटलं आहे. तसेच हिंदू कधीही जातीसाठी एकमेकात भांडत नसल्याचा दावा त्यांनी केला आहे.
अलाहाबाद : द्वारका पीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरुपानंद यांनी कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणात जातीय संघर्ष नसल्याचं म्हटलं आहे. तसेच हिंदू कधीही जातीसाठी एकमेकात भांडत नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. शिवाय, दलित हे देखील हिंदूच आहेत, आणि मनुस्मृतीत सर्वांना समान अधिकार असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
अलाहाबादमध्ये माध्यमांशी बोलताना त्यांनी सुरुवातीला कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणावर खेद व्यक्त केला. तसेच हे सर्वजण जातीसाठी एकमेकांशी भांडत नसल्याचं सांगितलं. शंकराचार्य म्हणाले की, “महाराष्ट्रातील हिंसाचारानंतर दलितांना बिगर हिंदू असल्याचं सांगितलं जात आहे, ते अतिशय धोकादायक आहे. दलित समाज हा देखील हिंदू धर्माचा अविभाज्य भागच आहे. आणि त्यांनाही समान अधिकार आहेत.”
विशेष म्हणजे, यावेळी त्यांनी जात व्यवस्था आवश्यक असल्याचंही सांगितलं. पण आंतरजातीय विवाहाला त्यांनी तीव्र विरोध दर्शवला. त्यांच्या मते, ‘प्रत्येक जातीची एक वेगळी परंपरा आहे. त्यामुळे आंतरजातीय लग्न झाल्यास, कुटुंब तुटण्याचा धोका सर्वाधिक असतो.’
दरम्यान, शंकराचार्यांनी यावेळी मनुस्मृतीचंही जोरदार समर्थन केलं. मनुस्मृतीसंदर्भात ते म्हणाले की, “हे हिंदू असण्यासाठी नाही, तर माणुसकीसाठी अतिशय गरजेचं आहे. मनुस्मृतीवर जातीच्या आधारे भेदभाव करण्याचा आरोप अत्यंत चुकीचा आहे. वास्तविक, यात प्रत्येक जातीला समान अधिकार देण्यात आला आहे.”
कोण आहेत शंकराचार्य स्वामी स्वरुपानंद?
स्वामी स्वरुपानंदांचा जन्म 2 डिसेंबर 1924 रोजी मध्य प्रदेशमधील सिवानी जिल्ह्यात ब्राह्मण कुटुंबात झाला. वयाच्या नवव्या वर्षी त्यांनी घर सोडलं, आणि देशभरातील तीर्थ स्थळांची यात्रा सुरु केली. या यात्रेदरम्यान, ते काशीमध्ये पोहोचल्यानंतर त्यांनी ब्रह्मलीन श्री स्वामी करपात्री महारांकडून शास्त्राचं शिक्षण घेतलं. काही काळ त्यांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातही सक्रिय सहभाग नोंदवला होता. 1950 मध्ये त्यांनी ब्रह्मलीन शंकराचार्य स्वामी ब्रह्मानंद सरस्वती यांच्याकडून सन्यस्थ जीवनाची दिक्षा घेतली. यानंतर त्यांना स्वामी स्वरुपानंद म्हणून सर्वत्र ओळखले जाऊ लागले. 1981 मध्ये त्यांना शंकराचार्याची उपाधी मिळाली.
स्वामी स्वरुपानंद आणि वाद
स्वामी स्वरुपानंद नेहमीच आपल्या वक्तव्याद्वारे चर्चेचा केंद्र स्थानी राहिले आहेत. अलाहबादमध्ये ऑगस्ट 2016 रोजी इस्कॉन विषयी अतिशय वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. याशिवाय शिर्डीच्या साईबाबांबद्दलही त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यांच्या वक्तव्यानंतर साई भक्तांनी त्यांचा निषेध व्यक्त केला होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
छत्रपती संभाजी नगर
महाराष्ट्र
बातम्या
नाशिक
Advertisement