देश वाचवण्यासाठी आंदोलनात सहभागी, कंगनाच्या ट्वीटला शाहीनबागच्या आज्जीचं उत्तर
नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA) च्या विरोधात प्रदर्शन करताना शाहीनबागच्या आजी बिल्किस बानो या प्रसिध्दीच्या झोतात आल्या होत्या. कंगनाने त्यांच्यावर केलेल्या आरोपाला आज्जींनी आता उत्तर दिलंय.

नवी दिल्ली: शाहीनबागच्या आंदोलनाच्या वेळी प्रसिध्दीच्या झोतात आलेल्या बिल्किस बानो आजीनी आता कंगना रनौतच्या आरोपांना उत्तर दिलं आहे. आम्ही शंभर रुपयांसाठी आंदोलनाला बसलो नव्हतो तर देश वाचवण्यासाठी बसलो होतो असं त्या म्हणाल्या.
काय म्हणाली होती कंगना रनौत? अभिनेत्री कंगना रनौतने एक व्हिडिओच्या माध्यमातून शाहीनबागच्या आजीवर आरोप केला होता. कंगना म्हणाली होती की, "शाहीनबागची अशिक्षित आजी, तिला कोणतीही माहिती नसताना आंदोनलनात भाग घेते. अशा पध्दतीनं लोकांचा वापर करुन घेण्यात येतोय हे या लोकांना समजत नाही.'
आज्जीचं उत्तर कंगनाच्या या आरोपांना आज्जींनी आता उत्तर दिलय. त्या म्हणाल्या की, "कंगनी देखील आमच्या मुलीसारखी आहे. ती आम्हाला अशिक्षित म्हणाली. आम्ही ज्यावेळी मुलांना जन्म देतो त्यावेळी त्यांना कसं शिक्षण द्यायचं हे देखील आम्हाला माहित आहे. जामिया आणि जेएनयू मध्ये आमच्या मुलांना मारलं त्यावेळी ते आम्हाला सहन झालं नाही. पोलिसांचा हिंसाचार आम्हाला सहन झाला नाही."
आजी पुढं म्हणाल्या की, "कंगनाला मी कधी पाहिलंही नाही. आम्ही शंभर रुपये मिळतात म्हणून आंदोलन करत नाही तर देशाला वाचवण्यासाठी आंदोलन करतोय. मी एका शेतकऱ्याची मुलगी आहे, एका शेतकऱ्याची सून आहे. त्यामुळे देशाला वाचवण्यासाठी मी आंदोलनात सहभागी झाले. यात माझं सारं आयुष्य गेलंय. गरज पडली तर रस्त्यावर उतरायला आणि अन्यायाविरोधात आवाज कसा उठवायचा हे आम्हाला चांगलं माहित आहे."
संबंधित बातम्या:
- Farmers Protests | शेतकरी आंदोलनामागे राजकीय हेतू; दहशतवाद्यांचाही सहभाग - कंगना रनौत
- कंगना रणौतचं ट्विटर अकाऊंट कायमचं बंद करण्यासाठी हायकोर्टात आलेल्या याचिकेला राज्य सरकारचा विरोध
- Shaheen bagh | शाहिन बाग प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय!
Before You Go
Praful Patel On Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पक्षातूनच चॅलेंज, थेट नोटीसही पाठवली; आता प्रफुल पटेल यांची पहिली प्रतिक्रिया





















