एक्स्प्लोर

Seema Haider Rakhi : Seema Haider Rakhi : पाकिस्तानी सीमा हैदरने मोदी, शाह आणि योगींना पाठवली राखी; म्हणाली, 'बहिण या नात्याने...'

Raksha Bandhan : पाकिस्तानी सीमा हैदरने पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यासह देशातील दिग्गजांना पोस्टाने राखी पाठवली आहे.

नोएडा, उत्तर प्रदेश : रक्षाबंधन (Raksha Bandhan 2023) हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे. भाऊ-बहिणीच्या नात्यासाठी हा अतिशय खास दिवस या दिवशी बहिण भावाच्या मनगटावर राखी बांधते आणि भाऊ बहिणीला तिची रक्षा करण्याचं वचन देतो. आता पाकिस्तानातून भारतात पळून आलेली सीमा हैदरही रक्षाबंधन सण साजरा करण्यासाठी उत्सुक आहे. पाकिस्तानी सीमा हैदरने (Pakistani Seema Haider) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यासह देशातील दिग्गन नेत्यांना राखी पाठवली आहे.

सीमा हैदरने मोदी, शाहांसह दिग्गजांना पाठवली राखी

सीमा हैदरने पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)  केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (HM Amit Shah), संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh), उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांना पोस्टाने राखी पाठवली आहे. यासोबत सीमाने सरसंघचालक मोहन भागवत यांनाही राखी पाठवली आहे. सीमा हैदरने या दिग्गज नेत्यांना राखी पाठवून आनंद व्यक्त केला आहे. तिनं आशा व्यक्त केली आहे की, तिची राखी या दिग्गजांपर्यंत पोहोचेल.

बहिणीच्या म्हणून आनंद व्यक्त केला

सीमा हैदरने याबाबत प्रतिक्रिया देताना सांगितलं की, पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यावर देशाच्या सुरक्षेची जबाबदारी आहे. त्यामुळे सीमा हैदरने या दिग्गजांना राखी पाठवून बहिणीच्या नात्याने आनंद व्यक्त केला आहे. सीमा हैदरने इस्रोच्या चांद्रयान-3 मोहिमेसाठी उपवास आणि पूजा-अर्चा देखील केली.

पाहा व्हिडीओ : राखी पाठवताना नेमकी काय होती सीमा हैदरची भावना

पाकिस्तानी सीमा हैदर चर्चेत

पाकिस्तानी सीमा हैदरने अवैध पद्धतीने नेपाळमार्गे भारतात प्रवेश केला. मे महिन्यापासून ती नोएडामध्ये तिचा प्रेमी सचिनसोबत राहत आहे. दोघांनी हिंदू पद्धतीने लग्न केलं आहे. त्यानंतर आता सीमा हैदर हिंदू धर्मीय महिलेप्रमाणे साडी, डोक्यावर पदर, कपाळावर कुंकू अशा वेशात दिसते. तिने हिंदू धर्म स्वीकारल्याचा दावाही केला आहे.

पबजीवरुन जडले प्रेम, मग थेट भारतात एन्ट्री

सीमा हैदर 30 वर्षांची आणि सचिन मीना 22 वर्षांचा आहे. या दोघांना ग्रेटर नोएडा पोलिसांनी 4 जुलै रोजी अटक केली होती, पण न्यायालयाने 7 जुलै रोजी दोघांना जामीन मंजूर केला. पबजी गेम खेळताना सीमा आणि सचिन यांनी ओळख झाली. त्यानंतर सचिनच्या प्रेमासाठी सीमा हैदर बेकायदेशीरपणे भारतात आली. यामुळे भारताच्या सुरक्षेचा धोका असल्याचीही चिंता व्यक्त केली जात आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Seema Haider : पाकिस्तानी सीमा हैदर तुरुंगात जाणार? सचिनवरही कारवाईची शक्यता, नोएडा पोलीस आरोपपत्र दाखल करण्याच्या तयारीत

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राज ठाकरेंनी महायुतीला पाठींबा देण्याचे आदेश नाही दिले, मग आम्हाला वाटतं त्याला मत देऊ : संदीप देशपांडे
विधान परिषद निवडणुकीत मनसेचा महायुतीला पाठिंबा नाही? संदीप देशपांडेंच्या वक्तव्यानं चर्चांना जोर
Beed News: पंकजा मुंडे यांच्याविषयी सोशल मीडियावर आक्षेपार्ह कमेंट; वडवणी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल
पंकजा मुंडे यांच्याविषयी सोशल मीडियावर आक्षेपार्ह कमेंट; वडवणी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल
Actress Rekha Income Source :  दशकभरापासून चित्रपटांपासून दूर, अभिनेत्री रेखाच्या उत्पन्नाचे स्रोत काय?
दशकभरापासून चित्रपटांपासून दूर, अभिनेत्री रेखाच्या उत्पन्नाचे स्रोत काय?
Pune Zika Virus : पुण्यात 46 वर्षीय डॉक्टर आणि त्यांच्या मुलीला झिका व्हायरसची लागण, प्रशासन सतर्क
पुण्यात 46 वर्षीय डॉक्टर आणि त्यांच्या मुलीला झिका व्हायरसची लागण, प्रशासन सतर्क
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Pune Zika Virus : पुण्यात 46 वर्षीय डॉक्टर आणि त्यांच्या मुलीला झिका व्हायरसची लागण, प्रशासन सतर्कLok Sabha Speaker Election : लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी यंदा निवडणूक, 'इंडिया'कडून के. सुरेश मैदानातABP Majha Marathi News Headlines 09 AM TOP Headlines 26 June 2024Niranjan Davkhare on Election : विरोधकांकडून खोटे आरोप, मात्र माझं काम मतदारांना माहिती : डावखरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राज ठाकरेंनी महायुतीला पाठींबा देण्याचे आदेश नाही दिले, मग आम्हाला वाटतं त्याला मत देऊ : संदीप देशपांडे
विधान परिषद निवडणुकीत मनसेचा महायुतीला पाठिंबा नाही? संदीप देशपांडेंच्या वक्तव्यानं चर्चांना जोर
Beed News: पंकजा मुंडे यांच्याविषयी सोशल मीडियावर आक्षेपार्ह कमेंट; वडवणी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल
पंकजा मुंडे यांच्याविषयी सोशल मीडियावर आक्षेपार्ह कमेंट; वडवणी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल
Actress Rekha Income Source :  दशकभरापासून चित्रपटांपासून दूर, अभिनेत्री रेखाच्या उत्पन्नाचे स्रोत काय?
दशकभरापासून चित्रपटांपासून दूर, अभिनेत्री रेखाच्या उत्पन्नाचे स्रोत काय?
Pune Zika Virus : पुण्यात 46 वर्षीय डॉक्टर आणि त्यांच्या मुलीला झिका व्हायरसची लागण, प्रशासन सतर्क
पुण्यात 46 वर्षीय डॉक्टर आणि त्यांच्या मुलीला झिका व्हायरसची लागण, प्रशासन सतर्क
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
Maharashtra Legislative Council : विधानपरिषदेचं पहिलं अधिवेशन कधी अन् कुठं झालं? वरिष्ठ सभागृह विसर्जित का होत नाही? जाणून घ्या
विधानसभेप्रमाणं विधानपरिषद विसर्जित का होत नाही? सदस्यसंख्या ते रचना, जाणून घ्या तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरं
Mumbai Crime: परळच्या प्रसिद्ध मेडिकल शॉपच्या मालकाला 'सीबीआय' अधिकाऱ्याचा फोन, घाबरुन 1.30 कोटी देऊन टाकले अन्...
परळच्या प्रसिद्ध मेडिकल शॉपच्या मालकाला 'सीबीआय' अधिकाऱ्याचा फोन, घाबरुन 1.30 कोटी देऊन टाकले अन्...
महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची रात्री उशीरा दीड तास वर्षावर खलबतं
रात्रीच्या बैठकांचा खेळ, महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्र्यांसह, उपमुख्यमंत्र्यांची वर्षावर खलबतं
Embed widget