एक्स्प्लोर

Pegasus Spyware : पेगॅसिस प्रकरणी सुप्रीम कोर्टानं याचिकाकर्त्यांना मागितला पुरावा, 10 ऑगस्टला पुढील सुनावणी  

Pegasus Spyware : पेगॅसिस प्रकरणी आज दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर सुनावणी झाली. खंडपीठानं आज याचिकाकर्त्यांच्या वकिलांची बाजू ऐकून घेतली आणि 10 तारखेला पुढील सुनावणी घेणार असल्याचं सांगितलं.

Pegasus Spyware : पेगॅसिस प्रकरणी आज दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. सरन्यायाधीश एन व्ही रमना आणि न्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठानं आज याचिकाकर्त्यांच्या वकिलांची बाजू ऐकून घेतली आणि 10 तारखेला पुढील सुनावणी घेणार असल्याचं सांगितलं. यावेळी कोर्टानं म्हटलं की, जर पेगॅसस संदर्भातील बातम्या खऱ्या असतील तर हे आरोप खूप गंभीर आहेत. कोर्टानं याचिकाकर्त्यांच्या वकिलांना विचारलं की, आपल्याकडं हेरगिरी संदर्भातील काही पुरावे आहेत का? यावर ज्येष्ठ वकिल कपिल सिब्बल यांनी नकार दिला.

Right To Privacy : भारतीय नागरिकांना खरोखरच 'राईट टू प्रायव्हसी'चा अधिकार आहे का? सर्वोच्च न्यायालयाचे खटले काय सांगतात?  

याचिकेत बातम्यांच्या कात्रणाशिवाय आणखी काय आहे?
प्रकरणाच्या सुनावणीच्या सुरुवातीला सरन्यायाधीशांनी याचिकाकर्त्यांच्या वकिलांना विचारलं की, आपल्या याचिकेत बातम्यांच्या कात्रणाशिवाय आणखी काय आहे? आम्ही हे का ऐकावं? यावर याचिकाकर्त्यांचे वकील कपिल सिब्बल म्हणाले की, हा टेक्नोलॉजीच्या माध्यमातून  राईट टू प्रायव्हसी वर हल्ला आहे. केवळ एका फोनची यासाठी गरज आहे, या माध्यमातून लोकांच्या प्रत्येक हालचालींवर नजर ठेवली जात आहे. हे राष्ट्रीय  इंटरनेट सुरक्षेवर देखील प्रश्नचिन्ह आहे.

Pegasus Spyware : 'पेगॅसस'चा हल्ला आणीबाणीपेक्षा भयंकर, याचे खरे बाप आपल्याच देशात, शिवसेनेचा हल्लाबोल

चौकशीचे आदेश देण्यासाठी काही ठोस पुरावा दिसत नाही

सरन्यायाधीशांनी म्हटलं की, आम्ही मान्य करतो की हा विषय गंभीर आहे. मात्र एडिटर्स गिल्ड वगळता अन्य सर्व याचिका ह्या वर्तमानपत्रातील बातम्यांच्या आधारावर आहेत. चौकशीचे आदेश देण्यासाठी काही ठोस पुरावा दिसत नाही. हा मुद्दा 2019 साली देखील चर्चेत आला होता. आता पुन्हा हा मुद्दा वर आला आहे. तुम्ही सगळे याचिकाकर्ते सुशिक्षित आहात. आपण सर्व जाणता की कोर्ट कशा पद्धतीच्या मुद्द्यांमध्ये दखल देतं. यावर सिब्बल म्हणाले की, हे खरं आहे की, आमच्याकडे स्पष्ट असा पुरावा नाही. मात्र  एडिटर्स गिल्डच्या याचिकेत हेरगिरीच्या 37 प्रकरणांचा उल्लेख आहे. सिब्बल यांनी यावेळी व्हॉट्सअॅप आणि एनएसओदरम्यान कॅलिफोर्नियाच्या कोर्टात सुरु असलेल्या केसचा उल्लेख केला. पेगॅसस हेरगिरी करते, हे स्पष्ट आहे. भारतात हे केलं की नाही, हा प्रश्न आहे.  

सरकारला नोटीस जारी करण्याचं आवाहन
सरन्यायाधीशांनी म्हटलं की, आम्ही वाचलं आहे की, NSO कडून केवळ देशांच्या सरकारलाच स्पायवेअर दिलं जातं. कॅलिफोर्निया केसचं आताच स्टेटस काय आहे? आम्हाला असं वाटत नाही की, तिथंही भारतात हेरगिरी झाल्याबाबत काही निष्कर्ष निघालाय. कपिल सिब्बल यांनी यावर उत्तर देताना म्हटलं की, संसदेत खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या प्रश्नावर मंत्र्यांनी हे मान्य केलं आहे की, भारतात 121 लोकं निशाण्यावर आहेत. यातील पुढील सत्य तेव्हाच माहिती पडेल जेव्हा कोर्ट सरकारकडून माहिती घेईल. कृपया आपण यासाठी नोटीस जाहीर करावी, असं सिब्बल म्हणाले.  
 
सर्वांची बाजू ऐकल्यानंतर सरन्यायाधीशांनी म्हटलं की,  सर्व याचिकाकर्ते आपल्या याचिकेची एक-एक कॉपी सरकारला पाठवा. सरकारकडून कुणाला तरी उपस्थित राहू द्या. यानंतर नोटीस देण्यावर विचार करु. या प्रकरणाची पुढील सुनावणी मंगळवार 10 ऑगस्ट रोजी होईल, असं कोर्टानं म्हटलं.  

महत्त्वाच्या बातम्या

Arunachal Pradesh Dispute : चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
Mecca Deal : पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
सणासुदीच्या काळात साखरेनं दिला दराचा चटका, महिनाभरातच तब्बल 15 टक्क्यांची वाढ, दर वाढण्याचं नेमकं कारण काय?
सणासुदीच्या काळात साखरेनं दिला दराचा चटका, महिनाभरातच तब्बल 15 टक्क्यांची वाढ, दर वाढण्याचं नेमकं कारण काय?
Lok Sabha Monsoon Session : संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Arunachal Pradesh Dispute : चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
Lok Sabha Monsoon Session : संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
Mecca Deal : पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Rahul Gandhi : भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
Gold Rate : पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Ratnagiri News : रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
Embed widget