SC Cancel Rizwan Kaskar Bail Plea : बिल्डरला धमकावल्याप्रकरणी 2019 मध्ये अटक करण्यात आलेला फरारी गुंड दाऊद इब्राहिमचा पुतण्या रिझवान कासकरचा जामीन अर्ज सुप्रीम कोर्टाने फेटाळला आहे. रिझवानवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाला सहा महिन्यांत आरोप निश्चित करण्यास सांगितले आहे. त्यानंतर रिझवान जामिनासाठी प्रयत्न करू शकतो, असेही न्यायालयाने म्हटले आहे.


गेल्या वर्षी मुंबई उच्च न्यायालयाने रिजवानचा जामीन अर्ज फेटाळला होता


2019 मध्ये मुंबईतील एका बिल्डरला दाऊदचा निकटवर्तीय छोटा शकील आणि फहीम मचमच यांच्या नावाने धमकीचे फोन आले होते. या आंतरराष्ट्रीय कॉल्सच्या तपासादरम्यान, प्रकरणाचे संबंध भारतात राहणाऱ्या दाऊदचा पुतण्या मोहम्मद रिझवान इब्राहिम कासकर याच्याशी संबंधित असल्याचे आढळून आले. या दरम्यान दाऊद टोळीशी संबंधित बेकायदेशीर कामांमध्ये रिझवानचा सहभाग असल्याचे पोलिसांना आढळून आले. गेल्या वर्षी 30 डिसेंबर रोजी मुंबई उच्च न्यायालयाने रिजवानचा जामीन अर्ज फेटाळला होता.


प्रथमदर्शनी पुरावे असल्याने जामीन मिळू शकत नाही


उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नितीन सांबरे यांनी सांगितले की, महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत (मकोका) ज्या कलमांतर्गत आरोपींवर गुन्हा दाखल आहे, त्या कलमांमध्ये 10 वर्षांपेक्षा जास्त शिक्षा आहे. त्याच्याविरुद्ध संघटित गुन्ह्यात सहभाग असल्याचे प्रथमदर्शनी पुरावे आहेत. त्याला जामीन मिळू शकत नाही. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एमआर शहा आणि बीव्ही नागरथना यांच्या खंडपीठाने रिझवानची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील देवदत्त कामत यांचा युक्तिवाद ऐकला. पण न्यायाधीशांना ते पटले नाही. कनिष्ठ न्यायालयात आरोप निश्चित झाल्यानंतर तो पुन्हा जामीन अर्ज दाखल करू शकतो, असे त्यांनी सांगितले.


इतर महत्त्वाच्या बातम्या