एक्स्प्लोर
Advertisement
महागाईसोबत आता बेरोजगारी : यावर्षी 16 लाख रोजगारांच्या संधी कमी होणार
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एका अहवालानुसार यंदाच्या वर्षात 16 लाख रोजगारांच्या संधी कमी होणार आहेत.
नवी दिल्ली : महागाईच्या दराने गेल्या 5 वर्षांतला उच्चांक गाठला आहे असून महागाईचा दर तब्बल 7.35 टक्क्यांवर पोहोचला आहे. अशातच सर्वसामान्यांची चिंता वाढवणारी बातमी आली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अहवालानुसार चालू वित्त वर्षात जवळपास 16 लाख रोजगारांच्या संधी कमी होणार आहेत. याचा सर्वाधिक परिणाम हा आसाम, बिहार, राजस्थान, ओडीशा आणि उत्तर प्रदेशमध्ये होणार आहे.
इकोरॅप रिपोर्टनुसार, वित्त वर्ष 2018-19 मध्ये ईपीएफओनं देशभरात 89.7 लाख नव्या नोकऱ्या उत्पन्न होणार असल्याचा अंदाज वर्तवला होता. त्यावेळी विकासदर हा सात टक्क्यांच्या जवळपास होता. तर 2019-20मध्ये विकासदर पाच टक्क्यांहून खाली येण्याची चिंता व्यक्त करण्यात आली आहे. परिणामी नोकऱ्यांमध्ये 15.8 टक्क्यांची कपात नोंदवण्यात आली. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना(ईपीएफओ) प्रतिमहिना 15 हजारांहून कमी पगार असलेल्या कर्मचाऱ्यांची नोंदणी करते. एप्रिल-ऑक्टोबर 2019पर्यंत 43.1 लाख रोजगारांची निर्मिती झाली, जी वित्त वर्षाच्या शेवटाला 73.9 लाखांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता.
सरकार, राज्य सरकार आणि खासगी नोकऱ्यांचा ईपीएफओमध्ये समावेश होत नाही. कारण, ही माहिती 2004 मधील राष्ट्रीय पेन्शन योजनेमध्ये (एनपीएस )समाविष्ट करण्यात आला आहे. एनपीएस श्रेणीत राज्य आणि केंद्र सरकारद्वारे वित्त वर्ष 2020 मध्ये 39,000 हजार पेक्षा कमी नोकरीच्या संधी निर्माण होण्याचा अंदाज आहे. आसाम, बिहार, राजस्थान, ओडीशा आणि उत्तर प्रदेशमध्ये याचा जास्त परिणाम होणार असल्याचंही अहवालात म्हटलं आहे. दिवाळखोरी अंतर्गत केलेल्या कारवाईमुळे कंपन्या आपल्या कंत्राटदार कामगारांची संख्या कमी करत आहे.
अहवालात असेही म्हटले आहे, की गेल्या पाच वर्षांत एकूण उत्पादकता वाढ 9.4 टक्के ते 9.9 टक्क्यांच्या दरम्यान स्थिर राहिली आहे. उत्पादकतेत झालेल्या या मंद वाढीमुळे वेतनवाढ कमी होत आहे. येणाऱ्या काळात ही परिस्थिती अर्थव्यवस्था आणि वित्तीय व्यवस्थेसाठी मोठा धोका निर्माण करू शक्यताही यात वर्तवण्यात आली आहे.
महागाईचा उच्चांक -
महागाईच्या दराने गेल्या 5 वर्षांतला उच्चांक गाठला आहे. महागाईचा दर तब्बल 7.35 टक्क्यांवर पोहोचला आहे. भाज्यांच्या दरात तब्बल 60 टक्क्यांनी वाढ झाली. तसेच डाळी, मांस-मासे, दूध आणि इतर जीवनावश्यक गोष्टींमधल्या दरवाढीमुळे महागाईचा आगडोंब उसळला आहे. त्यामुळे आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या सरकारसमोर महागाई नियंत्रित आणण्याचं नवं आव्हान असणार आहे.
संबंधित बातमी -
BHARAT BACHAO | देश वाचवण्यासाठी सर्वांना संघर्ष करावा लागेल, सोनिया गांधींचं देशवासियांना आवाहन | ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement