एक्स्प्लोर
आत्मसमर्पणाआधी शशिकला अम्मांच्या समाधी स्थळावर
चेन्नई : उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती बाळगल्याप्रकरणी शिक्षा सुनावलेल्या शशिकला नटराजन यांना सर्वोच्च न्यायालयाने झटका देत, आत्मसमर्पणासाठी वेळ देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे शशिकला यांना लवकरच तुरुंगाची वारी करावी लागणार आहे.
आत्मसमर्पणासाठी बंगळुरुच्या ट्रायल कोर्टात रवाना होण्यापूर्वी शशिकला नटराजन यांनी मरीना बीचवर जाऊन माजी मुख्यमंत्री जयललिता यांना श्रद्धांजली अर्पण केली.
शशिकला यांना आजच आत्मसमर्पण करावं लागणार!
जयललिता यांच्या समाधीला श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर शशिकला यांनी एमजीआर यांच्या समाधीला भेट देऊन तिथे ध्यानस्थ झाल्या.
वेळ देण्यास नकार, आत्मसमर्पण आजच करावं लागणार
शिक्षा सुनावल्यानंतर पोलिसांसमोर हजर होण्यासाठी शशिकला यांनी वेळ देण्याची मागणी केली होती. पण, सुप्रीम कोर्टाने वेळ देण्यास नकार दिल्याने, त्यांना आज आत्मसमर्पण करावं लागणार आहे.
पनीरसेल्वम यांची हकालपट्टी,पलनीसामी विधीमंडळ नेतेपदी
शशिकला यांना चार वर्षांची शिक्षा
उत्पन्नाहून अधिक संपत्ती बाळगल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने शशिकला यांना काल चार वर्षांची शिक्षा सुनावली आहे. तसंच त्यांना दहा कोटींचाही दंड ठोठवण्यात आला होता. त्यामुळे आता शशिकला यांची तुरुंगात रवानगी होणार हे निश्चित झालं.
शशिकलांना मोठा धक्का, बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी 4 वर्षांचा तुरुंगवास
मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न लांबणीवर
या निर्णायानंतर शशिकला आता दहा वर्षांपर्यंत निवडणूक लढवू शकणार नाहीत. परिणामी तामिळनाडूच्या मुख्यमंत्री होण्याचं शशिकला यांच स्वप्न तूर्तास तरी लांबणीवर पडलं आहे.
#WATCH: #VKSasikala visits Jayalalithaa's memorial at Chennai's Marina Beach before heading to Bengaluru, pays floral tribute pic.twitter.com/1t8C150GKf
— ANI (@ANI_news) February 15, 2017
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement