एक्स्प्लोर
मराठी भाषिक संज्योत बांदेकरांची बेळगावच्या महापौरपदी निवड

बेळगाव: बेळगाव महापौरपदाची निवडणूक आज पार पाडली. यामध्ये मराठी भाषिक संज्योत बांदेकर यांची निवड झाली. संज्योत बादेंकर यांनी 15 मतांनी विजय मिळवला.
मराठी भाषिकात २२ नगरसेवकांचा एक आणि १० नगरसेवकांचा एक असे गट झाले होते . त्यामुळे महापौरपदाच्या निवडणुकीत काय होणार? याकडेच सगळ्यांचे लक्ष लागून राहिलं होतं. पण काल हे दोन्ही गट एकत्र आल्यानं आजच्या निवडणुकीत संज्योत बांदेकर यांचा सहज विजय झाला. महापौर पदाचा उमेदवार निश्चित करण्याचा अधिकार आमदार संभाजी पाटील यांना देण्यात आला होता.
सुरुवातीला मराठी भाषिक गटातून महापौर पदासाठी संज्योत बांदेकर आणि मधुश्री पुजारी यांच्या नावाची चर्चा होती. अखेर संज्योत बांदेकर यांच्या पारड्यात वजन टाकण्यात आलं.
बेळगाव महापालिकेत यंदा महापौर पद ओबीसी महिलांसाठी राखीव होतं. तर उपमहापौर पद खुल्या प्रवर्गासाठी होतं. निवडणूक अधिकारी म्हणून प्रभारी प्रादेशिक आयुक्त एन. जयराम उपस्थित होते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
भारत
राजकारण
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
