एक्स्प्लोर
सानिया मिर्झाची बहिण पतीपासून विभक्त, घटस्फोट घेणार!
इतकंच नाही तर सलमान आणि परिणीतीने लग्नात डान्सही केला होता.
हैदराबाद : भारताची टेनिसस्टार सानिया मिर्झाची धाकटी बहिण अनम मिर्झाचा संसार दोन वर्षांच्या आतच मोडला आहे. अनमने पती अकबर रशीदपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे.
या दोघांचा निकाह नोव्हेंबर 2016 मध्ये झाला होता. वेगळं होण्याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. परंतु घटस्फोटाची प्रक्रिया सुरु झाली आहे. अनम ही सानियाची स्टायलिस्ट असून तिचं स्वत:च फॅशन आऊटलेटही आहे.
अनमचं लग्न धूमधडाक्यात झालं होतं. सलमान खान, परिणीती चोप्रा, अर्जुन कपूर, हुमा कुरेशी, लारा दत्त यांनीही तिच्या लग्नाला उपस्थिती लावली होती. इतकंच नाही तर सलमान आणि परिणीतीने लग्नात डान्सही केला होता.
अकबर रशीदचा हैदराबादमध्ये बिझनेस आहे. लग्नाआधी अकबर आणि अनम रिलेशनशिपमध्ये होते. त्यांचा साखरपुडा 2015 मध्ये झाला होता. तर नोव्हेंबर 2016 मध्ये लग्न झालं होतं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्राईम
Advertisement