एक्स्प्लोर

Salary Increment : दोन वर्षे काम करून फक्त 9 रुपयांची पगारवाढ; नोकरी सोडली तर 1.5 लाख दंड, सॉफ्टवेअर इंजिनिअरची व्यथा

9 Rupees Increment : एवढी कमी वेतनवाढ मिळाली तरी तो इंजिनिअर नोकरी सोडू शकत नाही, कारण कंपनीच्या कडक सर्विस बाँडमुळे आपण जाळ्यात अडकल्याची भावना त्याने व्यक्त केली.  

नवी दिल्ली : आयटी क्षेत्रात लाखोंच्या पगाराच्या बातम्या समोर येत असताना, दिल्ली-एनसीआरमधून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एका सॉफ्टवेअर इंजिनिअरने Reddit वर आपली व्यथा मांडत सांगितले की, 2025 मध्ये त्याला फक्त 9 रुपयांची वेतनवाढ मिळाली, तर 2026 मध्ये कोणतीही वाढ देण्यात आली नाही. 

या इंजिनिअरने मे 2024 मध्ये 6 महिन्यांच्या इंटर्नशिपद्वारे कंपनीत प्रवेश केला होता. त्यानंतर त्याला फुल-टाईम नोकरी मिळाली आणि त्याचा वार्षिक पगार 4.25 लाख रुपये निश्चित करण्यात आला. आयटी क्षेत्रात मंदी असल्याने त्या परिस्थिती त्याने कमी पगारातही काम स्वीकारल्याचं त्याने सांगितलं.

Service Bond Issue : दोन वर्षांचा बॉन्ड, 1.5 लाखांचा दंड

फक्त 9 रुपये पगार वाढ मिळाल्यानंतरही त्या सॉफ्टवेअर इंजिनिअरला नोकरी सोडणं सोपं नाही. कंपनीच्या नियमांनुसार, त्याला 2 वर्षांचा सर्विस बॉन्ड पूर्ण करणे बंधनकारक आहे. जर तो त्या आधी नोकरी सोडेल, तर त्याला 1.5 लाख रुपये दंड भरावा लागणार आहे.

याशिवाय, राजीनामा दिल्यानंतरही 6 महिन्यांचा नोटीस पिरियड पूर्ण करावा लागणार आहे. या अटींमुळे तो एका प्रकारच्या करिअरच्या जाळ्यात अडकल्याची भावना व्यक्त करत आहे.

Salary Increment Issue : 9 रुपयांची वाढ; 2026 मध्ये शून्य

इंजिनिअरने सांगितले की, 2025 मध्ये वार्षिक वेतनवाढ म्हणून फक्त 9 रुपये वाढ करण्यात आली. तर 2026 मध्ये कोणतीही वाढ देण्यात आली नाही. त्यामुळे त्याच्या आर्थिक स्थितीत कोणताही बदल झालेला नाही. या प्रकारामुळे आपण प्रचंड नाराज आणि निराश झाल्याची भावना त्याने व्यक्त केली आहे. 

Social Media Reaction : रेडिटवर संतापाची लाट

ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी आयटी कंपन्यांच्या धोरणांवर टीका केली आहे. युजर्सनी 9 रुपयांची वाढ ही कर्मचाऱ्याचा अपमान असल्याचं म्हटलं आहे. तर स्वतःच्या कौशल्यात वाढ करून लवकरात लवकर दुसरी नोकरी शोध, असा सल्ला काहीजणांनी दिला आहे. 9 रुपयात तर एका वेळचा चहादेखील येत नाही, असंही काहींनी म्हटलंय. 

IT Sector Trend : ऑटोमेशनमुळे वाढीवर परिणाम

तज्ज्ञांच्या मते, आयटी क्षेत्रात ऑटोमेशन आणि कॉस्ट कटिंगमुळे पगारवाढीचा वेग कमी झाला आहे. काही क्षेत्रांमध्ये अजूनही 10 टक्के पेक्षा जास्त वाढ मिळत असली तरी अनेक कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांना मर्यादित वाढ दिली जात आहे.

ही बातमी वाचा:

महत्त्वाच्या बातम्या

Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
NEET PG 2026: परीक्षा एकाच सत्रात, प्रत्येक प्रश्नासाठी अतिरिक्त वेळ, घराजवळ केंद्र निवडण्याची मुभा; NEET PG 2026 परीक्षेसाठी नियमांमध्ये मोठा बदल
परीक्षा एकाच सत्रात, प्रत्येक प्रश्नासाठी अतिरिक्त वेळ, घराजवळ केंद्र निवडण्याची मुभा; NEET PG 2026 परीक्षेसाठी नियमांमध्ये मोठा बदल

व्हिडीओ

Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Team India Sri Lanka Tour: टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
Khadakwasla Dam : पुणेकरांना दिलासा! खडकवासला अन् वरसगाव धरणं फुल भरली; मुठा नदीत विसर्ग सुरू
पुणेकरांना दिलासा! खडकवासला अन् वरसगाव धरणं फुल भरली; मुठा नदीत विसर्ग सुरू
NEET PG 2026: परीक्षा एकाच सत्रात, प्रत्येक प्रश्नासाठी अतिरिक्त वेळ, घराजवळ केंद्र निवडण्याची मुभा; NEET PG 2026 परीक्षेसाठी नियमांमध्ये मोठा बदल
परीक्षा एकाच सत्रात, प्रत्येक प्रश्नासाठी अतिरिक्त वेळ, घराजवळ केंद्र निवडण्याची मुभा; NEET PG 2026 परीक्षेसाठी नियमांमध्ये मोठा बदल
Guhagar Kasturi Cat rare: गुहागरच्या शाळेत जंगलातील दुर्मिळ कस्तुरी मांजर शिरलं, सगळेच अवाक झाले
गुहागरच्या शाळेत जंगलातील दुर्मिळ कस्तुरी मांजर शिरलं, सगळेच अवाक झाले
Embed widget