एक्स्प्लोर

Hatkanangale : रात्रीस खेळ चाले! नारळ, कापड, बाहुली अन् टाचण्या... हातकणंगलेतील स्मशानात अघोरी विद्या, रक्षा विसर्जनाच्या वेळी प्रकार उघडकीस

Hatkanangale Black Magic : हातकणंगलेच्या स्मशानभूमीमध्ये या आधीही अनेकदा असे प्रकार घडले आहेत, परंतु प्रशासन त्याकडे कोणतेही लक्ष देत नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. 

कोल्हापूर : पुरोगामी विचारसरणीसाठी ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यात पुन्हा एकदा अंधश्रद्धा आणि अघोरी विद्येचा प्रकार समोर आला आहे. हातकणंगले येथे स्मशानभूमीत प्रेतदहनानंतर रात्री अघोरी विधी करण्यात आल्याची घटना घडली. रक्षा विसर्जनाच्या वेळी हा संतापजनक प्रकार उघडकीस आला. त्यानंतर नागरिकांनी नगरपंचायत प्रशासनाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली.

हातकणंगलेतील निवृत्त तहसीलदार श्रीपती चौगुले यांचे 11 एप्रिल रोजी निधन झाले. 13 एप्रिल रोजी त्यांच्या रक्षा विसर्जनाचा कार्यक्रम पार पडत असताना हा प्रकार समोर आला. यावेळी श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. परंतु घडलेल्या प्रकारावर नागरिक संतप्त झाल्याचं दिसून आलं.

Hatkanangale Aghori Vidya Incident : स्मशानात अघोरी प्रकार उघड

रक्षा विसर्जनावेळी काही अज्ञात व्यक्तींनी नारळ आणि इतर साहित्य वापरून अघोरी विधी केल्याचे दिसून आले. या प्रकारामुळे उपस्थित नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. अशा अंधश्रद्धाजन्य कृतींमुळे परिसरातील वातावरण दूषित होत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.

Hatkanangale Black Magic : यापूर्वीही घडले होते असे प्रकार

हातकणंगले परिसरात यापूर्वीही अशा प्रकारच्या घटना घडल्या असल्याची माहिती स्थानिकांनी दिली. मात्र, प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने अशा घटनांना पुन्हा प्रोत्साहन मिळत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

Public Demand CCTV : कडक कारवाई आणि सीसीटीव्हीची मागणी

या पार्श्वभूमीवर संबंधित अघोरी प्रकार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी होत आहे. तसेच स्मशान परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, नियमित देखरेख ठेवावी आणि जबाबदार अधिकाऱ्यांनी लक्ष घालावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Hatkanangale Administrative Negligence : नगरपंचायतीवर निष्काळजीपणाचा आरोप

हातकणंगले नगरपंचायतीचा सगळाच कारभार हा अत्यंत ढिसाळ असल्याची तक्रार लोकांमधून सातत्याने केली जाते. कोणत्याही प्रश्नावर वेळकाढूपणा करणाऱ्या प्रशासनाने स्मशानातील या अशा अघोरी विद्या प्रकरणाकडेही दुर्लक्ष केल्याची तक्रार होत आहे. या आधी स्मशानात आणि गावातही अनेकदा असे प्रकार घडले आहेत. स्मशानात वारंवार अशा घटना घडूनही कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाही. ना सीसीटीव्ही बसवण्यात आले, ना सुरक्षेची कोणतीही यंत्रणा उभारण्यात आली.

या घटनेनंतर तरी प्रशासन जागे होणार का, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने तातडीने कारवाई न केल्यास नागरिकांचा संताप अधिक वाढण्याची शक्यता आहे.

ही बातमी वाचा:

एबीपी माझामध्ये कोल्हापूर ब्युरो म्हणून गेल्या साडे तीन वर्षांपासून कार्यरत. तसेच टीव्ही 9 मराठी कोल्हापूर ब्युरो म्हणूनही कामाचा अनुभव. 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Crime News: 15 वर्षांच्या लिव्ह-इनचा भयानक शेवट; प्रेयसीने मित्राच्या मदतीने प्रियकराचा काटा काढला, बॉडी 18 तास घरात ठेवली अन्..., नाशिक हादरलं!
15 वर्षांच्या लिव्ह-इनचा भयानक शेवट; प्रेयसीने मित्राच्या मदतीने प्रियकराचा काटा काढला, बॉडी 18 तास घरात ठेवली अन्..., नाशिक हादरलं!
Mumbai Navy Nagar Family Death Case: पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
Mumbai Navy Nagar Family Death: मुंबईतील नेव्ही ऑफिसरने पत्नी आणि दोन मुलांसह स्वत:लाही संपवलं; आता पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून हादरवणारी माहिती, सगळ्यात मोठा ट्विस्ट, नेमकं काय समोर आलं?
मुंबईतील नेव्ही ऑफिसरने पत्नी आणि दोन मुलांसह स्वत:लाही संपवलं; आता पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून हादरवणारी माहिती, सगळ्यात मोठा ट्विस्ट, नेमकं काय समोर आलं?
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं

व्हिडीओ

Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Laxman Hake and Manoj Jarange Patil: तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
Mira Bhayandar Accident News: भरधाव कारनं नागरिकांना उडवलं; मिरा रोडवर हिट अँड रनचा थरार! भीषण घटना डॅशकॅममध्ये कैद, घटनेनंतर कारचालक पसार
भरधाव कारनं नागरिकांना उडवलं; मिरा रोडवर हिट अँड रनचा थरार! भीषण घटना डॅशकॅममध्ये कैद, घटनेनंतर कारचालक पसार
BMC BEST Depot Redevelopment: मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
CM Devendra Fadnavis Maharashtra Government: मोठी बातमी: मुख्यमंत्र्यांना कोणत्याही मंत्र्याचा निर्णय फिरवण्याचा अधिकार, राज्य सरकारकडून नियमात महत्त्वाचा बदल
मोठी बातमी: मुख्यमंत्र्यांना कोणत्याही मंत्र्याचा निर्णय फिरवण्याचा अधिकार, राज्य सरकारकडून नियमात महत्त्वाचा बदल
Embed widget