एक्स्प्लोर
सचिनचा मास्टरस्ट्रोक, खासदारकीचं वेतन पंतप्रधान मदतनिधीला दान
सांसद आदर्श गाव योजनेत सचिनने दोन गावं दत्तक घेतली होती. त्यात उस्मानाबाद जिल्ह्यातील डोंजा गावाचा समावेश होता.

नवी दिल्ली : एकीकडे महाराष्ट्रातील माजी आमदार आपल्या निवृत्तीवेतनात सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वाढ करण्याची मागणी केली असताना, भारतरत्न आणि माजी राज्यसभा खासदार सचिन तेंडुलकरने आपलं सर्व वेतन आणि भत्ते पंतप्रधान मदतनिधीला दान केले आहेत. राज्यसभेवर खासदार असताना आपल्या उपस्थितीवरुन सचिन अनेकांच्या टीकेचं लक्ष्य बनला. मात्र, कार्यकाळ संपल्यानंतर सचिनवर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव सुरु आहे. गेल्या सहा वर्षात सचिनला जवळपास 90 लाख रुपये वेतन आणि अन्य मासिक भत्ते मिळाले होते. ते सर्व त्याने पंतप्रधान कार्यालयाकडे दान केले आहेत. सांसद आदर्श गाव योजनेत सचिनने दोन गावं दत्तक घेतली होती. त्यात उस्मानाबाद जिल्ह्यातील डोंजा गावाचा समावेश होता.
आणखी वाचा























