ABP Cvoter UP Exit Poll Result 2022 : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुका सात टप्प्यात पार पडल्या. 403 जागांवरील मतदारांचे भवितव्य मतदान पेटीत कैद झाले आहे. सोमवारी उत्तर प्रदेशमधील निवडणुकीचा एक्झिट पोलचे आकडे समोर आले आहेत. त्यानुसार भाजपला स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता आहे. पण सत्ता कोण स्थापन करणार हे दहा मार्च रोजी स्पष्ट होईल. एकूण 403 सदस्य संख्या असलेल्या उत्तर प्रदेश विधानसभेमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी एकूण 202 जागांची गरज आहे. भाजपला यावेळीही स्पष्ट बहुमत मिळणार तर अखिलेश यादव सत्तेपासून दूर राहणार असंच या एक्झिट पोलमधून दिसतंय. काँग्रेसला दोन आकडी संख्याही गाठणे अवघड ठरणार आहे असं या एक्झिट पोलमध्ये सांगण्यात येतंय. पाहूयात एक्झिट पोलमध्ये सात टप्प्यात कुणाला किती जागा मिळाल्या आहेत.... 


पहिला टप्पा (58 जागा)
BJP+ 28 ते 32 जागा
SP+  23 ते 27 जागा
BSP  2 ते 4 जागा
INC  0 ते 1 जागा
OTH 0 ते 1 जागा


दुसरा टप्पा – (55 जागा)
BJP+ 23 ते 27 जागा
SP+  26 ते 30 जागा
BSP  1 ते 3 जागा
INC  0 ते 1 जागा
OTH 0 ते 1 जागा


तिसरा टप्पा (59 जागा)
BJP+ 38 ते 42 जागा
SP+  16 ते 20 जागा
BSP  0 ते 2 जागा
INC  0 ते 1 जागा
OTH 0 ते 1 जागा


चौथा टप्पा (59 जागा)
BJP+ 41 ते 45 जागा
SP+  12 ते 16 जागा
BSP  1 ते 3 जागा
INC  0 ते 1 जागा
OTH 0 ते 1 जागा


पाचवा टप्पा (61 जागा)
BJP+ 39 ते 43 जागा
SP+  14 ते 18 जागा
BSP  0 ते 1 जागा
INC  1 ते 3 जागा
OTH 1 ते 3 जागा


सहावा टप्पा (57 जागा)
BJP+ 28 ते 32 जागा
SP+  18 ते 22 जागा
BSP  3 ते 5 जागा
INC  2 ते 4 जागा
OTH  0 ते 1 जागा


सातवा टप्पा (54 जागा)
 BJP+ 25 ते 29 जागा
SP+  17 ते 21 जागा
BSP  4 ते 6 जागा
INC  0 ते 2 जागा
OTH  1 ते 3 जागा


उत्तर प्रदेशमध्ये कुणाची सत्ता? 
BJP+ 228 ते 244 जागा
SP+  132 ते 148 जागा
BSP  13 ते 21 जागा
INC  4 ते 8 जागा
OTH  2 ते 6 जागा


कोणत्या टप्यात किती झालं मतदान?
• पहिल्या टप्प्यात 10 फेब्रुवारी रोजी 62.43 टक्के मतदान 
• दुसऱ्या टप्प्यात 14 फेब्रुवारी रोजी 64.66 टक्के मतदान
• तिसऱ्या टप्प्यात 20 फेब्रुवारी रोजी 62.28 टक्के मतदान  
• चौथ्या टप्प्यात 23 फेब्रुवारी रोजी 62.76 टक्के मतदान
• पाचव्या टप्प्यात 27 फेब्रुवारी रोजी 58.35 टक्के मतदान  
• सहाव्या टप्प्यात 3 मार्च रोजी 56.43 टक्के मतदान 
• सातव्या टप्प्यात 7 मार्च रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत 46.40 टक्के मतदान


2017 साली भाजपला बहुमत
उत्तर प्रदेशमध्ये 2017 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला 317 जागा, समाजवादी पक्षाला 47 जागा, बसपाला 19 जागा तर काँग्रेसला केवळ सात जागा मिळाल्या होत्या.