एक्स्प्लोर
Advertisement
सरसंघचालक मोहन भागवतांच्या वक्तव्याचा विपर्यास, संघाचा दावा
नागपूर: हिंदूंनी लोकसंख्या वाढवावी, अशा अर्थाचं वक्तव्य सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलंच नाही, असा दावा राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं केला आहे.
काल आग्र्यातील कार्यक्रमामध्ये मोहन भागवत यांनी हिंदूंना जास्त मुलं जन्माला घालण्यापासून कुणी रोखलं? असा प्रश्न विचारला होता. त्यानंतर माध्यमांनी या वक्तव्याचा विपर्यास केल्याचा दावा संघाकडून करण्यात आला आहे.
मोहन भागवतांनी हिंदूंनी जास्त मुलं जन्माला घालावी असं म्हटलं नाही, तर कायदा सर्वांसाठी सारखा असावा अशी अपेक्षा केल्याचा दावाही केला. लोकसंख्या नियंत्रणासाठी सर्वांना समान कायदा असावा, अशी अपेक्षाही संघानं व्यक्त केली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
राजकारण
महाराष्ट्र
बीड
Advertisement