(Source: ECI/ABP News/ABP Majha)
"केवळ जय श्रीरामचा नारा देऊन चालणार नाही; तर..."; सरसंघचालकांनी विज्ञान भवनात जाऊन कान टोचले
RSS Chief Mohan Bhagwat : केवळ जय श्रीरामचा नारा देऊन चालणार नाही; तर प्रभू श्रीरामासारखं आचरणही असायला हवं, अशा शब्दांत सरसंघचालकांनी कान टोचले आहेत.
RSS Chief Mohan Bhagwat : सरसंघचालक मोहन भागवत यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. केवळ 'जय श्रीराम'चा नारा देऊन चालणार नाही, तर प्रभू श्रीरामासारखं आचरणही असायला हवं अशा शब्दांत सरसंघचालकांनी उपस्थितांचे कान टोचले आहेत. तसंच स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतर देशाचा म्हणावा तसा विकास झाला नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली आहे.
मोहन भागवत रविवारी दिल्लीतील विज्ञान भवनात संत ईश्वर सन्मान समारोहात बोलत होते. यावेळी संरसंघचालक संबोधित केले. त्यावेळी तिथे उपस्थितांनी 'जय श्रीराम' घोषणा देण्यास सुरुवात केली. घोषणा थांबवत सरसंघचालक म्हणाले की, सेवेत जोश नाही, तर होश असणं गरजेचं आहे. भागवत यांनी भाषणादरम्यान घोषणांचा उल्लेख करत म्हणाले, केवळ 'जय श्रीराम'चा नारा देऊन चालणार नाही, त्यांच्यासारखं वागणं गरजेचं आहे. जेणेकरुन जनतेची निःस्वार्थ सेवा करता येईल. सेवेत अहंकाराचं कोणतंही स्थान नसतं, असंही सरसंघचालक यांनी म्हटंल.
कार्यक्रमात समाजाची निःस्वार्थ भावनेनं सेवा करणाऱ्या संघटना आणि व्यक्तींचा सन्मानही केला आहे. भागवत म्हणाले की, "स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतरही भारतानं जेवढी प्रगती करणं अपेक्षित होतं, तेवढी प्रगती झालेली नाही. देश जर प्रगतिपथावर मार्गस्थ झाला, तर प्रगती होईलच, पण आतापर्यंत आपण त्या रस्त्यावर चाललोच नाही, असंही त्यांनी म्हटंल.
मोहन भागवत यांनी पुढे म्हटलं की, "भारतानं कधीही काहीच हिसकावून घेतलं नाही, तर देण्याचंच काम केलं आहे आणि भारतात जन्मलेली सर्व मुलं भावंडांप्रमाणे आहेत. प्राचीन काळापासूनच भारताची जमीन आणि लोक भारताला मानतात. तर 130 कोटींची लोकसंख्या असणारा देश विविधतेनं नटलेला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :