एक्स्प्लोर

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रतिमा संवर्धनासाठी संघ दक्ष, दिल्लीत तीन दिवसांचं महामंथन

 गेल्या तीन दिवसांपासून संघाचे दहा वरिष्ठ पदाधिकारी दिल्लीत चिंतन करत आहेत. मोदी सरकारच्या प्रतिमेबाबत होणारी चर्चा, पश्चिम बंगालमध्ये जोर लावूनही भाजपचा पराभव, उत्तर प्रदेशच्या निवडणुका या सगळ्या बाबतीत या बैठकीत मंथन सुरू असल्याचं समजतं आहे. 

नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या राजधानी दिल्लीत सुरू असलेल्या मंथनाचा आज समारोप होत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोलमडलेली व्यवस्था त्यावरून मोदी सरकारच्या प्रतिमेबाबत होणारी चर्चा, पश्चिम बंगालमध्ये जोर लावूनही भाजपचा पराभव आणि नंतर तिथे उद्भवलेली राजकीय हिंसा.. पुढच्या काही महिन्यात होणाऱ्या उत्तर प्रदेशच्या निवडणुका, योगी आदित्यनाथ यांच्या कार्यशैली बद्दल पक्षांतर्गत तक्रारी या सगळ्या बाबतीत या बैठकीत मंथन सुरू असल्याचं समजतं आहे. 

 गेल्या तीन दिवसांपासून संघाचे दहा वरिष्ठ पदाधिकारी दिल्लीत चिंतन करत आहेत. सरसंघचालक मोहन भागवत नवनियुक्त सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे, सर्व पाच सहसरकार्यवाह, भाजपचे राष्ट्रीय संघटन महामंत्री बीएल संतोष यांच्यासह संघाचे वरिष्ठ पदाधिकारी या बैठकीत भाग घेतला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोलमडलेली आरोग्य व्यवस्था आणि त्यावरून सरकारवर होणारे आरोप या सगळ्या पार्श्वभूमीवर संघाकडून सरकारसाठी प्रतिमा सुधारण्यासाठी काही सूचना होतात का हे पाहावे लागेल. या काळात झालेल्या तडजोडीतून सावरण्यासाठी संघाचा नेमका काय अजेंडा समोर येतो हे पाहावे लागेल.

शिवाय उत्तर प्रदेश आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाबाबत कुरबुरी सुरू झाल्या आहेत. केंद्रातल्या सत्तेसाठी सर्वात मोठे योगदान उत्तर प्रदेशचं असतं त्यामुळे या निवडणुका भाजपसाठी महत्त्वाच्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून संघाचे पदाधिकारी लखनौमध्ये जाऊनही तिथल्या स्थितीचा आढावा घेऊन आले आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर दिल्लीतलं मंथन योगींसाठी काय कौल देतं हे पाहावं लागेल. उत्तर प्रदेश निवडणुकांआधी शेतकरी आंदोलनाचा प्रश्न सामोपचाराने मिटणं हे देखील सरकार साठी आवश्यक आहे, त्यादृष्टीने देखील या बैठकीत चर्चा अपेक्षित आहे. 

संबंधित बातम्या :

 

महत्त्वाच्या बातम्या

Kudankulam Nuclear Power Plant: भारताच्या सर्वात मोठ्या अणुऊर्जा प्रकल्पाचा संवेदनशील डेटा डार्क वेबवर? 19 हजार गोपनीय फाईल्स लीक झाल्याचा दावा
भारताच्या सर्वात मोठ्या अणुऊर्जा प्रकल्पाचा संवेदनशील डेटा डार्क वेबवर? 19 हजार गोपनीय फाईल्स लीक झाल्याचा दावा
Maharashtra Live News Updates: दिल्लीत सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आज 19 वा दिवस
Maharashtra Live News Updates: दिल्लीत सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आज 19 वा दिवस
Amitabh Bachchan Ranbir Kapoor Invested In Ayodhya: राम मंदिर निर्माणानंतर अयोध्येकडे बॉलिवूडचा ओढा; अमिताभ बच्चनांची 90 कोटींची गुंतवणूक, तर रणबीर कपूरनंही घेतली कोट्यवधींची मालमत्ता
राम मंदिर निर्माणानंतर अयोध्येकडे बॉलिवूडचा ओढा; अमिताभ बच्चनांची 90 कोटींची गुंतवणूक, तर रणबीर कपूरनंही घेतली कोट्यवधींची मालमत्ता
PoK Protest : ज्या पाकव्याप्त काश्मीरसाठी अमित शाहांनी शपथ घेतली, तो भारताला परत मिळणार? पाकिस्तानविरोधात मोठा उद्रेक
ज्या पाकव्याप्त काश्मीरसाठी अमित शाहांनी शपथ घेतली, तो भारताला परत मिळणार? पाकिस्तानविरोधात मोठा उद्रेक

व्हिडीओ

NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
Sachin Ahir UNCUT Speech : वरळीकरांकडून जंगी सत्कार, ठाकरे पिता-पुत्रांवर टीका, सचिन अहिरांचं भाषण!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vinayak Raut: अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणीपूर्वी विनायक राऊतांना झटका, अंतरिम संरक्षण देण्यास कोर्टाचा नकार; नेमकं काय घडलं?
अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणीपूर्वी विनायक राऊतांना झटका, अंतरिम संरक्षण देण्यास कोर्टाचा नकार; नेमकं काय घडलं?
Mumbai Local News: मुंबई लोकलमधील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; चालत्या लोकलमध्ये तुफान हाणामारी; चर्चगेट-विरार ट्रेनमधील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
मुंबई लोकलमधील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; चालत्या लोकलमध्ये तुफान हाणामारी; चर्चगेट-विरार ट्रेनमधील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
High Court On BMC: उघड्यावर थुंकणे आता मुंबईकरांना महागात पडणार; 250 रू दंड आता थेट 2000 रुपयांपर्यंत वाढणार, हायकोर्टाचे BMC ला आदेश
उघड्यावर थुंकणे आता मुंबईकरांना महागात पडणार; 250 रू दंड आता थेट 2000 रुपयांपर्यंत वाढणार, हायकोर्टाचे BMC ला आदेश
Gashmeer Mahajani On Pravin Tarde: '100 कोटींची मेहनत...', 'देऊळ बंद 2'च्या यशानंतर गश्मीर महाजनीची पोस्ट, प्रवीण तरडेंना टॅग करत म्हणाला...
'100 कोटींची मेहनत...', 'देऊळ बंद 2'च्या यशानंतर गश्मीर महाजनीची पोस्ट, प्रवीण तरडेंना टॅग करत म्हणाला...
Kandivali Crime: गिफ्ट देण्याच्या बहाणा, डोळे बंद करायला लावले अन् प्रियकराने जागीच...; क्राइम पेट्रोल बघून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न, एकतर्फी प्रेमप्रकरणात धक्कादायक माहिती उघड
गिफ्ट देण्याच्या बहाणा, डोळे बंद करायला लावले अन् प्रियकराने जागीच...; क्राइम पेट्रोल बघून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न, कांदिवलीतील एकतर्फी प्रेमप्रकरणात धक्कादायक माहिती उघड
Beed Crime Vilas Ghule Case: बीडमधील विलास घुले प्रकरणात धक्कादायक ट्विस्ट; उमेश मानेवर अत्याचाराचा गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं?
बीडमधील विलास घुले प्रकरणात धक्कादायक ट्विस्ट; उमेश मानेवर अत्याचाराचा गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं?
'द कपिल शर्मा शो'चं टॉप सीक्रेट अखेर सर्वांसमोर आलंच, 'बच्चा यादव'नं केला भांडाफोड; थेट कपिल शर्माचं नाव घेत म्हणाला...
'द कपिल शर्मा शो'चं टॉप सीक्रेट अखेर सर्वांसमोर आलंच, 'बच्चा यादव'नं केला भांडाफोड; थेट कपिल शर्माचं नाव घेत म्हणाला...
Nagpur Crime: आधी दारूच्या नशेत तरुणांसोबत राडा, नंतर नाकाबंदी दरम्यान पळून जाताना कारला धडकला; पोलिसांच्या तपासात तरुण नागपुरातील तडीपार आरोपी निघाला
आधी दारूच्या नशेत तरुणांसोबत राडा, नंतर नाकाबंदी दरम्यान पळून जाताना कारला धडकला; पोलिसांच्या तपासात 'तो' तरुण नागपुरातील तडीपार आरोपी निघाला
Embed widget