एक्स्प्लोर
टोल नाक्यांवर आता 5 ते 100 रुपयांपर्यंतची कुपन्स
मुंबई: नोटबंदीनंतर वारंवार टोलमाफी मिळाल्यानंतर उद्या म्हणजे शुक्रवार 2 डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून पुन्हा देशभरात टोल नाके सुरु होणार आहेत.
सुट्ट्या पैशांचा प्रश्न सोडवण्यासाठी टोलची कुपन देण्याचा विचार केंद्रीय रस्ते विकास मंत्रालयातर्फे सुरु आहे. 5 रुपयांपासून 100 रुपयांपर्यंतची ही कुपन्स असतील.
त्यामुळे टोलचे पैसे देतानाही ही कुपन्स वापरता येतील, तसंच उरलेले सुट्टे पैसे म्हणूनही टोलधारक ही कुपन्स ग्राहकांना परत करतील.
8 नोव्हेंबरनंतरच्या नोटबंदीनंतर 14, 18, 24 नोव्हेंबर आणि 2 डिसेंबरपर्यंत वेळोवेळी टोलमाफी देण्यात आली.
दरम्यान, पेट्रोल पंपांवर 500 रुपयाच्या जुन्या नोटा स्वीकारण्याचा निर्णय कधीही रद्द होऊ शकतो. याबाबतची घोषणा आज होण्याची शक्यता आहे.
टोलमाफीच्या घोषणा
पहिली घोषणा - 9 ते 11 नोव्हेंबरपर्यंत
दुसरी घोषणा - 11 ते 14 नोव्हेंबरपर्यंत
तिसरी घोषणा - 14 ते 18 नोव्हेंबर
चौथी घोषणा - 18 ते 24 नोव्हेंबर
पाचवी घोषणा - 24 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर 2016
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
करमणूक
महाराष्ट्र
ठाणे
Advertisement