एक्स्प्लोर

जयललितांच्या जागेसाठी पोटनिवडणूक, 82 उमेदवार मैदानात

चेन्नई : तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या आरके नगर या मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे. मात्र या निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. कारण या जागेसाठी तब्बल 82 उमेदवारांनी अर्ज दाखल केला आहे. मतदान केंद्रात केवळ 4 मतदान यंत्र लावता येतात आणि यातील उमेदवारांची मर्यादा 63 असते. त्यामुळे उर्वरित उमेदवारांसाठी काय करायचं, असा पेच निवडणूक आयोगासमोर निर्माण झाला आहे. आरके नगर मतदारसंघात 12 एप्रिल रोजी विधानसभेची पोटनिवडणूक होईल. जयललिता यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली होती. शशिकला गट आणि ओ. पन्नीरसेल्वम गटाची इथे प्रमुख लढत असेल. भाजपने प्रसिद्ध संगीतकार गंगई आमरन यांना रिंगणात उतरवलं आहे. तर डीएमकेने एन.मुर्तूगणेश यांना उमेदवारी दिली आहे. हे मुख्य स्पर्धक असले तरी उमेदवारांची यादी इथेच संपत नाही. निवडणूक आयोगाकडे तब्बल 82 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. मतदान केंद्रात जास्तीत जास्त चार मतदान यंत्र लावता येतात. ईव्हीएमवर 15 बटण असतात आणि यातील एक बटण हे नोटासाठी राखीव ठेवणं बंधनकारक आहे. यानुसार चार मशिन्सवर उमेदवारांची मर्यादा 63 आहे. त्यामुळे उर्वरित उमेदवारांसाठी काय करायचं, असा प्रश्न निवडणूक आयोगासमोर आहे. बॅलेट पेपरद्वारे निवडणूक? निवडणूक आयोग अशा परिस्थितीत बॅलेट पेपरद्वारे मतदान घेईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. या निवडणुकीसाठी सोमवारी दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. दुपारनंतर नेमकं चित्र स्पष्ट होईल. पण उमेदवारांची संख्या 63 पेक्षा जास्त झाल्यास केंद्रीय निवडणूक आयोगाशी चर्चा करु, असं तामिळनाडू राज्य निवडणूक आयोगाने म्हटलं आहे. मतदान यंत्रांमधील उमेदवारांची संख्या वाढवावी, अशी मागणी प्रलंबित आहे. नवीन मतदान यंत्रांना तांत्रिक भाषेत एम 3 ईव्हीएम असे म्हटले जाते. या मशिनमध्ये तब्बल 126 उमेदवारांचा समावेश शक्य आहे. या नवीन मशिन्सचा वापर 2019 च्या निवडणुकांसाठी होऊ शकता, असा अंदाज लावला जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Congress Vs CJP : टार्गेट एक, रस्ता वेगळा! राहुल गांधी अन् सीजेपीचा एकाच मुद्द्यावरून केंद्र सरकारवर दुहेरी हल्ला; श्रेय कुणाचे?
टार्गेट एक, रस्ता वेगळा! राहुल गांधी अन् सीजेपीचा एकाच मुद्द्यावरून केंद्र सरकारवर दुहेरी हल्ला; श्रेय कुणाचे?
हवाई प्रवाशांना मोठा फटका! सणासुदीच्या मुहूर्तावर हवाई प्रवास महागला, नेमकी किती झाली वाढ? 
हवाई प्रवाशांना मोठा फटका! सणासुदीच्या मुहूर्तावर हवाई प्रवास महागला, नेमकी किती झाली वाढ? 
Rahul Gandhi: काँग्रेसचं सलग तिसऱ्या दिवशी आंदोलन...जे खासदार आंदोलनात आले नाहीत त्यांची यादी तयार करा, राहुल गांधी यांची केसी वेणुगोपाल यांना सूचना
जे खासदार आंदोलनात आले नाहीत त्यांची यादी तयार करा, राहुल गांधी यांची केसी वेणुगोपाल यांना सूचना
GST Council Meeting : अधिकाऱ्यांची अटक करण्याची शक्ती रद्द, 10 हजारांपर्यंतच्या दंडालाही ब्रेक; जीएसटी कौन्सिलचा मोठा निर्णय
अधिकाऱ्यांची अटक करण्याची शक्ती रद्द, 10 हजारांपर्यंतच्या दंडालाही ब्रेक; जीएसटी कौन्सिलचा मोठा निर्णय

व्हिडीओ

Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
USA : अमेरिकनं भारताच्या टीसीएस,एचसीएल, विप्रोला PERM मधून वगळलं, पर्मनंट लेबर सर्टिफिकेशन प्रोग्राम नेमका काय?
अमेरिकनं भारताच्या टीसीएस,एचसीएल, विप्रोला PERM मधून वगळलं, पर्मनंट लेबर सर्टिफिकेशन प्रोग्राम नेमका काय?
Congress Vs CJP : टार्गेट एक, रस्ता वेगळा! राहुल गांधी अन् सीजेपीचा एकाच मुद्द्यावरून केंद्र सरकारवर दुहेरी हल्ला; श्रेय कुणाचे?
टार्गेट एक, रस्ता वेगळा! राहुल गांधी अन् सीजेपीचा एकाच मुद्द्यावरून केंद्र सरकारवर दुहेरी हल्ला; श्रेय कुणाचे?
Drought Relief Maharashtra : दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
Donald Trump : भारताच्या IT कंपन्यांवर अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक, TCS, Wipro, Infosys, Cognizant सह बड्या कंपन्या पर्मनंट लेबर सर्टिफिकेट कार्यक्रमातून आऊट !
भारताच्या IT कंपन्यांवर अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक, TCS, Wipro, Infosys, Cognizant सह बड्या कंपन्या पर्मनंट लेबर सर्टिफिकेट कार्यक्रमातून आऊट !
पाकिस्तानला धक्का, भारतात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीतून वगळलं, पाकची मागणी अमान्य करत बागंलादेशला संधी
पाकिस्तानला धक्का,भारतातील चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेरचा रस्ता, पाकची मागणी अमान्य, बांगलादेशला लॉटरी
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
Home Loan :  रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
 रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
CJP Protest In Bengaluru: बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
Embed widget