एक्स्प्लोर
रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी लवकरच नवा यूनिफॉर्म
नवी दिल्ली: भारतीय रेल्वेमध्ये लवकरच नवीन बदल पाहायला मिळणार आहेत. आता रेल्वेचे कर्मचारी फॅशन डिझायनरनी डिझाइन केलेले कपडे परिधान करणार आहेत. या बदलांसाठी रेल्वेने सुरुवात केली असून प्रसिद्ध फॅशन डिझायनर ऋतू बेरीकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे.
रेल्वेमधील या नव्या बदलासाठी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची ऋतू बेर यांनी दिल्लीत दुसऱ्यांदा भेट घेऊन चर्चा केली. जवळपास एक तासांच्या या बैठकीसाठी ऋतू बेरी पूर्ण तयारीने आल्या होत्या. यावेळी त्यांनी जगभरातील विविध देशातील रेल्वे स्टाफ हवामानानुसार कोणत्या प्रकारचे कपडे परिधान करतो याचे प्रेझेंटेशन बेरी यांनी दिले. तसेच यावेळी त्यांनी भारतीय रेल्वे कर्मचाऱ्यांच्या गणवेशातील काही बदलही रेल्वे मंत्र्यांना सुचवले.
यानुसार त्यांनी रेल्वे मंत्र्यांना चार पर्याय सुचवले आहेत.
1). Ethos Of India
2). The Golden Period
3). The Vibrant soul of India
4). The Legacy of India
Ethos Of India यानुसार, भारतात जितक्या पारंपरिक कला आहेत, त्यातील मधुबनी आर्ट, मेंहदी आणि इतर कलाकृतींचा अंतर्भाव असावा.
The Golden Period मध्ये काहीप्रमाणात यात सोनेरी किनार आहे. कारण भारताला सोन्यांचा देश म्हणूनही म्हणले जात होते. त्यामुऴे या थीममध्ये सोनेरी शेड जास्त आहेत.
The Vibrant soul of Indiaमध्ये मुगलशाहीतील राजांच्या जीवनातील काही दृश्याचा अंतर्भाव यात आहे.
The Legacy of India मध्ये भारतातील सर्वात जास्त रंगांचा यामध्ये अंतर्भाव करण्यात आला आहे.
या चार थीममधील कोणत्याही एका थीमची निश्चिती रेल्वे मंत्रालयाने केल्यानंतर, ऋतू बेरी रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी कपडे डिझाइन करणार आहे. विशेष म्हणजे, यासाठी ऋतू बेरी कोणतेही मानधन घेणार नसल्याचे स्पष्ट केले. मात्र, रेल्वे विभाग यापैकी वेगळ्याच विचारात आहे.
दरम्यान, ड्रेस रेल्वेने रनिंग स्टाफ परिधान करेल. स्टेशन मॅनेजर, स्टेशन सुप्रीटेंड, टिकट चेकर, रिझर्व्हशन बुकिंग स्टाफ, गार्ड ड्रायव्हर आणि स्टेशन स्टाफ आदींसाठी हे नवे गणवेश आसणार आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement