एक्स्प्लोर
काँग्रेसला मोठा धक्का, रिता बहुगुणा-जोशी भाजपमध्ये
नवी दिल्ली : उत्तर प्रदेश निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या रिता बहुगुणा-जोशी पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्या उपस्थितीत बहुगुणा भाजपमध्ये दाखल झाल्या.
उत्तर प्रदेशच्या लखनऊ कँटोन्मेंटमधून रिता बहुगुणा-जोशी आमदार आहेत. त्यांनी 2007 ते 2012 या कालावधीत उत्तर प्रदेश काँग्रेस कमिटीचं अध्यक्षपदही भूषवलं होतं. यूपीच्या माजी मुख्यमंत्री हेमवती नंदन बहुगुणा यांच्या त्या कन्या.
मे महिन्यातही बहुगुणा समाजवादी पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. अखिलेश यादव यांची भेट त्यांनी घेतल्यामुळे या वावड्या उठल्या, मात्र त्यांनी लेखी स्पष्टीकरण देत या शक्यता नाकारल्या होत्या.
रिता बहुगुणा या 1995 ते 2000 या काळात समाजवादी पक्षाकडून अलाहाबादच्या महापौरपदी होत्या. त्यानंतर सपाच्या तिकीटावरच त्यांनी सुलतानपूरमधून खासदारकीची निवडणूक लढवली होती.
2012 मध्ये त्या लखनऊ कॅन्टोन्मेंटमधून काँग्रेसतर्फे आमदारपदी निवडून आल्या. 2014 मध्ये त्या लोकसभेला उभ्या राहिल्या होत्या, मात्र पराभूत झाल्या. लोकसभेला त्यांना दोन वेळा पराभवाचा सामना करावा लागला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement