(Source: Poll of Polls)
Retail Inflation hit : सर्वसामान्यांना महागाईचा फटका! साबण, शॅम्पूच्या किंमतीत तीन महिन्यात 40 टक्के वाढ
साबण, शॅम्पू, टूथपेस्ट शिवाय वॉशिंग पावडर, चहापत्ती, खाद्य तेल, केचप, जॅम , नूडल्स, बेबी फूड आदी वस्तूंच्या किंमतीत वाढ झाली आहे.
नवी दिल्ली : कोरोनामुळे आर्थिक घडी विस्कटली असताना त्यात महागाईमुळे सर्वसामान्यांना जगायचं कसं असा प्रश्न पडलाय. जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत सातत्याने वाढ होत असल्याने घरचं आर्थिक गणितच बिघडून गेलंय. खाद्यतेलाच्या किंमतीबरोबर साबण, शॅम्पू, टूथपेस्ट या दैनंदिन जीवनात आवश्यक असलेल्या वस्तूंच्या किंमती वाढल्या आहे. एक अहवालानुसार तीन महिन्यात दैनंदिन जीवनात आवश्यक असलेल्या वस्तूंच्या किंमती 40 टक्क्यांनी वाढल्या आहे. साबण, शॅम्पू, टूथपेस्ट शिवाय वॉशिंग पावडर, चहापत्ती, खाद्य तेल, केचप, जॅम , नूडल्स, बेबी फूड आदी वस्तूंच्या किंमतीत वाढ झाली आहे.
अमूलने आजपासून (1 जुलै) दिल्ली-एनसीआरबरोबर अहमदाबाद आणि गुजरातच्या सौराष्ट्रात दूधाच्या किंमतीत प्रतिलिटरमागे २ रुपयांची वाढ झाल्याची घोषणा केली आहे. दोन रुपये प्रति लिटर वाढ म्हणजे एमआरपीमध्ये चार टक्के वाढ आहे. गेल्या दीड वर्षापासून अमूलने दूधांच्या किंमतीमध्ये काही वाढ केली नाही.
LPG सिलेंडर 25 रुपयांनी महागला
सरकारी तेल कंपन्यांनी घरी वापरल्या जाणार्या एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत 25 रुपयांची वाढ केली आहे. वाढलेल्या किमतींमुळे देशाची राजधानी दिल्लीमध्ये एलपीजी गॅस सिलेंडरचे दर आता 834 रुपयांवर पोहोचले आहेत. यापूर्वी घरगुती गॅस सिलेंडरची किंमत 809 रुपये होती. दरम्यान, एप्रिलमध्ये एलपीजी सिलेंडरच्या किंमती 10 रुपयांनी स्वस्त झाल्या होत्या, त्यानंतर मे-जूनमध्ये एलपीजी गॅसच्या किमतींमध्ये कोणताही बदल झालेला नव्हता. दिल्लीव्यतिरिक्त आजपासून कोलकातामध्ये एलपीजी सिलेंडर 861 रुपयांना विकण्यात येणार आहे. तर मुंबईत विना अनुदानित घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत 834 रुपये असणार आहे. चेन्नईत एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमती 850 रुपयांवर पोहोचल्या आहेत.
एसी, टिव्ही, फ्रीज, कुलरच्या किंमती वाढणार
घरात वापरात येणाऱ्या इलेक्ट्रॉनिक वस्तूच्या किंमती देखील वाढणार आहे, लॉकडाऊनमुळे देशातील अनेक फॅक्टरी बंद पडल्या आहेत. त्यामुळे उत्पादन बंद आहे. यामध्ये कॉपर देखील आहे. लॉकडाऊनचा कॉपर उद्योगाला देखील मोठा फटका बसला आहे. मागणी वाढल्याने कॉपरच्या किंमतीत वाढ झाली आहे. त्यामुळे एसी, टिव्ही, फ्रीज, कुलरच्या किंमती वाढणार आहे. तसेच ज्या वस्तूमध्ये कॉपर वापरले जाते त्या वस्तूंच्या किंमती वाढल्या जाणार आहे
महत्त्वाच्या इतर बातम्या :