एक्स्प्लोर
Advertisement
जनधन खात्यातून महिन्याला केवळ 10 हजारच काढता येणार
नवी दिल्ली : जनधन खात्याबाबत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने अतिशय महत्त्वापूर्ण निर्णय घेतला आहे. जनधन खात्यातून आता महिन्याला केवळ 10 हजार रुपयेच काढता येणार आहे. विशेष म्हणजे नोटाबंदीच्या निर्णयानंतर जनधन खात्यात मोठ्या प्रमाणात पैसे जमा होत आहे.
10 हजारांपेक्षा जास्त पैसे काढल्यास खर्चाची माहिती बंधनकारक
प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत उघडलेल्या खात्यांमधून आता महिन्याला फक्त दहा हजार रुपयेच काढता येणार आहे, असं रिझर्व्ह बँकेने सांगितलं. जर एखाद्या खातेदाराला दहा हजारांपेक्षा जास्त पैसे काढायचे असतील तर त्याला या पैशांच्या खर्चाची संपूर्ण माहिती देणं बंधनकारक असेल, असे निर्देश आरबीआयने बँक मॅनेजरना दिले आहेत.
जनधनद्वारे काळा पैसा पांढरा करण्याचं काम
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 8 नोव्हेंबर रोजी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बंद झाल्याची घोषणा केली. यानंतर जनधन खात्यात एकाएकी जास्त रक्कम जमा होऊ लागले. त्यामुळे जनधन खात्याद्वारे काळा पैसा पांढरा करण्याचं काम सुरु असल्याचं म्हटलं जात आहे. परंतु आरबीआयच्या या निर्णयानंतर जनधन खात्याच्या माध्यमातून काळा पैसा पांढरा करणाऱ्यांवर आळा बसणार आहे.
25 कोटी जनधन खात्यात 65 हजार कोटी जमा
नोटाबंदीनंतर 25 कोटी जनधन खात्यांमध्ये आतापर्यंत तब्बल 65 हजार कोटींपेक्षा जास्त रुपये जमा झाले आहे. यातील संशयित खात्यांवर अर्थ मंत्रालयाची नजर आहे. शिवाय त्यांच्यावर कधीही कारवाई होऊ शकते.
काय आहे प्रधानमंत्री जनधन योजना?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन वर्षांपूर्वी जनधन योजना सुरु केली होती. यामादे सर्वसामान्यांना आर्थिक व्यवस्थेच्या कक्षेत आणण्याचा उद्देश होता. मात्र पुढे जाऊन हे काळा पैसा पांढरा करण्याचं माध्यम बनेल, याची कल्पना तेव्हा कोणालाही नव्हती.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
क्रिकेट
सोलापूर
Advertisement