PM Modi : 'एकीकडे अभिमानाचा दिवस, तर दुसरीकडे करुणेने भरलेले अंतःकरण' PM मोदी झाले भावूक, मोरबी दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त
PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी भावूक होत म्हणाले, मोरबी दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांप्रती मी संवेदना व्यक्त करतो.
PM Narendra Modi : स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान आणि गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल (Sardar Vallabhbhai Patel) यांची आज जयंती आहे. या खास प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी गुजरातमधील केवडिया येथील 'स्टॅच्यू ऑफ युनिटी' येथे आदरांजली वाहिली आणि वल्लभभाईंच्या आदर्शांचे स्मरण केले, यावेळी त्यांनी आपल्या भाषणात त्यांनी मोरबी दुर्घटनेबद्दल (Morbi Incident) शोक व्यक्त केला, बोलताना पंतप्रधान मोदी भावूक झाले. म्हणाले, 'मी इथे एकता नगरमध्ये आहे, पण माझे मन मोरबीतील पीडितांशी जोडले गेले आहे.' या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांप्रती मी संवेदना व्यक्त करतो.
#WATCH राहत-बचाव कार्य में NDRF, सेना और वायुसेना लगी हुई है। लोगों की दिक्कतें कम से कम हो इसे प्राथमिकता दी जा रही है: मोरबी में ब्रिज गिरने की घटना पर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी#MorbiBridgeCollapse pic.twitter.com/uHydKx4EBL
— ANI_HindiNews (@AHindinews) October 31, 2022
'एकीकडे अभिमानाचा दिवस, तर दुसरीकडे करुणेने भरलेले अंतःकरण' - PM मोदी
पंतप्रधान म्हणाले की, मी आयुष्यात क्वचितच इतक्या तीव्र वेदना व्यक्त केल्या असतील. एकीकडे आझ अभिमानाने भरलेला दिवस आहे, दुसरीकडे कर्म आणि कर्तव्याचा मार्ग आहे. या कर्तव्याच्या वाटेची जबाबदारी घेऊन मी तुमच्यामध्ये आहे. पण करुणेने भरलेले अंतःकरण त्या पीडित कुटुंबांच्या सोबत आहे. असे पंतप्रधान यावेळी म्हणाले.
अपघाताच्या चौकशीसाठी समिती स्थापन
आपल्या भाषणात पीएम मोदी म्हणाले की, 'या दुर्घटनेत ज्यांनी आपला जीव गमावला आहे, त्यांच्या कुटुंबियांप्रती मी शोक व्यक्त करतो, या दुःखाच्या प्रसंगी सरकार प्रत्येक पीडित कुटुंबासोबत आहे. गुजरात सरकार संपूर्ण ताकदीने मदतकार्यात व्यस्त आहे. केंद्र सरकारकडून राज्य सरकारलाही पूर्ण मदत केली जात आहे, एनडीआरएफ, लष्कर आणि हवाई दल मदत आणि बचावकार्यात गुंतले आहेत. जे लोक रुग्णालयात उपचार घेत आहेत, त्यांचीही काळजी घेतली जात आहे. अपघाताची माहिती मिळताच सीएम भूपेंद्र पटेल मोरबीला पोहोचले होते. या अपघाताच्या चौकशीसाठी राज्य सरकारने समिती स्थापन केली आहे. PM मोदींनी यावेळी सांगितले की, मदत आणि बचावकार्यात कोणतीही कमी येणार नाही.
मोरबी येथे माचू नदीवरील मोठी दुर्घटना
गुजरातमधील मोरबी येथे माचू नदीवरील ओव्हरब्रिज कोसळल्याने रविवारी रात्री मोठी दुर्घटना घडली, पूल कोसळल्याने 200 हून अधिक लोक नदीत पडले आहेत. या अपघातात 132 जणांना आपला जीव गमवावा लागला. गुजरातच्या माहिती विभागाने सांगितले की, सोमवारी सकाळपर्यंत 32 हून अधिक मृत्यू झाले आहेत. 177 जणांची सुटका करण्यात आली आहे. 19 वर उपचार सुरू आहेत. माहितीनुसार, हा पूल एक पिकनिक स्पॉट आहे, जिथे सुट्टीच्या दिवशी खूप गर्दी असते.