(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mughal Garden Name Changed: राष्ट्रपती भवनातल्या ऐतिहासिक मुघल गार्डनचं नाव बदललं, आता 'अमृत उद्यान' म्हणून ओळखलं जाणार
Mughal Gardens To Amrit Udyan: राष्ट्रपती भवनातील ऐतिहासिक मुघल गार्डनचे नाव आता बदलण्यात आले आहे. मुघल गार्डनचं (Mughal Garden) नाव बदलून अमृत उद्यान (Amrit Udyan) असं ठेवण्यात आलं आहे.
Mughal Garden Name Changed: राष्ट्रपती भवनातील ऐतिहासिक मुघल गार्डनचे नाव आता बदलण्यात आले आहे. मुघल गार्डनचं (Mughal Garden) नाव बदलून अमृत उद्यान (Amrit Udyan) असं ठेवण्यात आलं आहे. देशाच्या अमृत महोत्सवानिमित्त मुघल गार्डनचे नामकरण करण्यात आले आहे. हे गार्डन फुलांच्या विशेष विविधतेसाठी ओळखली जाते. राष्ट्रपती भवनाचे हे गार्डन आपल्या सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. हे गार्डन पाहण्यासाठी दरवर्षी लाखो पर्यटक भेट देतात या गार्डनमध्ये 138 प्रकारच्या गुलाबांची लागवड करण्यात आली आहे. या गार्डनमध्ये 10 हजारांहून अधिक ट्युलिप फुलेही आहेत. याशिवाय हंगामी फुलांच्याही 5 हजार प्रजाती आहेत.
देशाचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी हे गार्डन सर्वसामान्यांसाठी खुले करण्यास सुरुवात केली होती. तेव्हापासून दरवर्षी मुघल गार्डन सर्वसामान्यांसाठी खुले केले जाते. साधारणपणे महिनाभराहून अधिक काळ सर्वसामान्यांसाठी हे उघडले जाते. दरवर्षीप्रमाणे यंदाही हे गार्डन सर्वसामान्यांसाठी खुले होणार आहे. सामान्य लोकांना येथे विविध प्रकारचे ट्युलिप्स आणि गल्बचे फुल पाहायला मिळतील.
राष्ट्रपतींच्या माध्यम उपसचिव नाविका गुप्ता यांनी मुघल गार्डनच्या नामांतराची माहिती दिली. ते म्हणाले की, स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती भवनाच्या गार्डनला ‘अमृत उद्यान’ असे सामान्य नाव दिले आहे. स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने देशात ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ साजरा केला जात आहे. यंदा पावसाळ्यातही हे गार्डन सर्वसामान्यांसाठी खुले करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे आता सर्वसामान्य नागरिकांना वर्षातून दोनदा अमृत उद्यानात जाता येणार आहे. यावेळी अमृत उद्यानात ट्युलिप्सच्या 12 प्रकारांची फुले पाहायला मिळणार आहेत. इतकंच नाही तर फुलांसमोर QR कोड लावण्यात येणार आहेत. हे क्यूआर कोड स्कॅन करून सर्वसामान्यांना फुलांची माहिती मिळू शकेल.
अमृत उद्यानात सेल्फी पॉइंटही बनवण्यात आले असून, तेथे सर्वसामान्य नागरिक फुलांच्या साहाय्याने सेल्फी घेऊ शकतात. यावेळी शेतकरी, दिव्यांग, महिला आणि इतर लोकांसाठी वेगवेगळं दिवस ठेवण्यात आले आहेत. विशेष श्रेणी अंतर्गत 28 मार्च ते 31 मार्च ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. म्हणजेच 28 मार्च ते 31 मार्च दरम्यान शेतकरी, दिव्यांग आणि महिलांसाठी प्रत्येकी एक दिवस निश्चित करण्यात येणार आहे, अशी माहित ही त्यांनी दिली.
इतर महत्वाची बातमी: