एक्स्प्लोर

Ram Mandir PM Narendra Modi Speech : राम म्हणजे कोण? पंतप्रधान मोदींनी उलगडला प्रभू श्रीरामाचा अर्थ

Ram Mandir Pran Pratishtha PM Narendra Modi Speech : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येत प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठापना केल्यानंतर भाषण करताना प्रभू श्रीरामाचा अर्थ सांगितला.

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha PM Narendra Modi Speech :   राम म्हणजे आग नाही तर ती ऊर्जा आहे. राम म्हणजे भारताचा विचार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi Speech Ayodhya) यांनी म्हटले. अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठापनेनंतर पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणात प्रभू श्रीरामाचा अर्थ उलगडून सांगताना भारतीय संस्कृतीमधील त्याचे महत्त्व अधोरेखित केले. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'सियावर रामचंद्र की जय... असे म्हणत आपल्या भाषणाची सुरुवात केली. आज आपले राम आले आहेत. मला खूप काही बोलायचं आहे, पण कंठ दाठले आहेत. आजचा क्षण हा अलौकीक आणि पवित्र असल्याची भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली. 22 जानेवारी 2024 ही फक्त कॅलेंडरवरील तारीख नाही. नव्या कालचक्राचा उगम आहे. आजची वेळ सामान्य नाही. हजारो वर्षानंतरही आजच्या दिवसाची चर्चा होणार आहे, असेही त्यांनी सांगितले. 

राम म्हणजे कोण? पंतप्रधान मोदींनी उलगडला अर्थ

पंतप्रधान मोदी यांनी म्हटले की, या काळात अयोध्या आणि देशवासीयांनी शेकडो वर्षांचा वियोग सहन केला.आपल्या अनेक पिढ्यांनी हे  सहन केले आहे. पंतप्रधान मोदी यांनी म्हटले की, राम म्हणजे आग नाही तर ऊर्जा आहे. राम हा वाद नाही, तर तोडगा आहे असेही त्यांनी म्हटले. राम वर्तमान नसून शाश्वत, अनंत आहे. राम हा भारताचा विश्वास आहे, राम हा भारताचा आधार आहे, राम हा भारताचा विचार आहे, राम हा भारताचा विचार आहे, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले. राम हे भारताचे जीवन आहे. राम महान आहे, राम प्रभाव आहे, राम प्रवाह आहे, राम धोरण आहे, राम सातत्य आहे, राम निरंतरता आहे, राम सर्वव्यापी आहे, जग, विश्व-आत्मा आहे, जेव्हा राम पूज्य होतो, त्याची प्रतिष्ठापना होते तेव्हा त्याचा प्रभाव हजारो वर्षे टिकतो. गुलामगिरीची मानसिकता झुगारून उभे राहणारे राष्ट्र नवा इतिहास घडवत असल्याचे  पंतप्रधान मोदी यांनी म्हटले. 

भगवान प्रभू श्रीरामाला ‘दंडवत प्रणाम’

अवघ्या देशाला ज्या क्षणाची आतुरता होती, तो ऐतिहासिक क्षण अखेर आज आला. अयोध्येतील राम मंदिरात प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा पंतप्रधान मोदींच्या हस्ते विधीवत पार पडली. अवघ्या 84 सेकंदाच्या मुहूर्तावर रामाच्या लोभस बालमूर्तीची प्राणप्रतिष्ठा पार पडली. सध्या अयोध्येसह देशभरात एक अनोखा उत्साह दिसून आला. तब्बल 500 वर्षांनंतर प्रभू श्रीराम विधीवत राम मंदिरात विराजमान झाले. सगळी अयोध्यानगरी राममय झाली. देशभरात उत्साहाचं वातावरण आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नवनिर्मित राम मंदिराच्या प्राण-प्रतिष्ठा सोहळ्यानंतर भगवान प्रभू श्रीरामाला ‘दंडवत प्रणाम’ केला.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

एकनाथ शिंदेंनी सामना आणि संजय राऊतांविरोधात कोर्टात गेलं पाहिजे, त्यांना एकाकी पाडायचा प्रयत्न; शिवसेना नेत्याचा गंभीर आरोप
एकनाथ शिंदेंनी सामना आणि संजय राऊतांविरोधात कोर्टात गेलं पाहिजे, त्यांना एकाकी पाडायचा प्रयत्न; शिवसेना नेत्याचा गंभीर आरोप
Sanjay Shirsat : राणे बापलेकांनी काल बोलताच आज दोन्ही शिवसेना मनोमिलनावरून मंत्री संजय शिरसाटांची अवघ्या चार दिवसात कोलांटउडी, म्हणाले...
राणे बापलेकांनी काल बोलताच आज दोन्ही शिवसेना मनोमिलनावरून मंत्री संजय शिरसाटांची अवघ्या चार दिवसात कोलांटउडी, म्हणाले...
'त्या' अधिकाऱ्याला घरी बसवेन, मग पूर्णवेळ सोशल मीडियाच बघा; मंत्री नितेश राणेंचा थेट इशारा
'त्या' अधिकाऱ्याला घरी बसवेन, मग पूर्णवेळ सोशल मीडियाच बघा; मंत्री नितेश राणेंचा थेट इशारा
नामदेव शास्त्रींच्या वक्तव्याने भावना दुखावल्या; मराठा समाज आक्रमक, पोलीस अधीक्षकांना निवेदन
नामदेव शास्त्रींच्या वक्तव्याने भावना दुखावल्या; मराठा समाज आक्रमक, पोलीस अधीक्षकांना निवेदन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sudhir Mungantiwar : Chandrapur चा Beed होऊ द्यायचा नाही, मुनगंटीवारांचं वक्तव्य मग सारवासारवTop 100 : 100 हेडलाईन्स बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर : 03 Feb 2025 ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 2 PM TOP Headlines 2PM 03 February 2024 दुपारी २ च्या हेडलाईन्सPruthviraj Mohol Maharashtra Kesri| महाराष्ट्र केसरीची गदा मिळताच मोहोळने वस्तादांना खाद्यांवर घेतलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
एकनाथ शिंदेंनी सामना आणि संजय राऊतांविरोधात कोर्टात गेलं पाहिजे, त्यांना एकाकी पाडायचा प्रयत्न; शिवसेना नेत्याचा गंभीर आरोप
एकनाथ शिंदेंनी सामना आणि संजय राऊतांविरोधात कोर्टात गेलं पाहिजे, त्यांना एकाकी पाडायचा प्रयत्न; शिवसेना नेत्याचा गंभीर आरोप
Sanjay Shirsat : राणे बापलेकांनी काल बोलताच आज दोन्ही शिवसेना मनोमिलनावरून मंत्री संजय शिरसाटांची अवघ्या चार दिवसात कोलांटउडी, म्हणाले...
राणे बापलेकांनी काल बोलताच आज दोन्ही शिवसेना मनोमिलनावरून मंत्री संजय शिरसाटांची अवघ्या चार दिवसात कोलांटउडी, म्हणाले...
'त्या' अधिकाऱ्याला घरी बसवेन, मग पूर्णवेळ सोशल मीडियाच बघा; मंत्री नितेश राणेंचा थेट इशारा
'त्या' अधिकाऱ्याला घरी बसवेन, मग पूर्णवेळ सोशल मीडियाच बघा; मंत्री नितेश राणेंचा थेट इशारा
नामदेव शास्त्रींच्या वक्तव्याने भावना दुखावल्या; मराठा समाज आक्रमक, पोलीस अधीक्षकांना निवेदन
नामदेव शास्त्रींच्या वक्तव्याने भावना दुखावल्या; मराठा समाज आक्रमक, पोलीस अधीक्षकांना निवेदन
17 साल बाद! विराटने 18 व्या वर्षी जे मैदान मारलं, त्याच मैदानावर भारतीय पोरींनी वर्ल्डकप उंचावला
17 साल बाद! विराटने 18 व्या वर्षी जे मैदान मारलं, त्याच मैदानावर भारतीय पोरींनी वर्ल्डकप उंचावला
इकडं विरोधकांनी महाकुंभातील मृत्यूचा आकडा विचारताच लोकसभा सभापती म्हणाले, आता चर्चा नको; तिकडं सुप्रीम कोर्टाचा चेंगराचेंगरीवर सुनावणीस नकार; म्हणाले, उच्च न्यायालयात जा
इकडं विरोधकांनी महाकुंभातील मृत्यूचा आकडा विचारताच लोकसभा सभापती म्हणाले, आता चर्चा नको; तिकडं सुप्रीम कोर्टाचा चेंगराचेंगरीवर सुनावणीस नकार; म्हणाले, उच्च न्यायालयात जा
VIDEO : मॉडेलने कपडे घातले की नाही, हे कळणं देखील कठीण; रेड कार्पेटवर ट्रान्सपरेंट ड्रेस घालणं महागात, ग्रॅमी अवॉर्ड्समधून प्रसिद्ध गायकासह पत्नीची हकालपट्टी
VIDEO : मॉडेलने कपडे घातले की नाही, हे कळणं देखील कठीण; रेड कार्पेटवर ट्रान्सपरेंट ड्रेस घालणं महागात, ग्रॅमी अवॉर्ड्समधून प्रसिद्ध गायकासह पत्नीची हकालपट्टी
धक्कादायक! बँकेचे हफ्ते न भरल्याने कर्जदारच्या मुलालाच उचलले, डांबून ठेवले; सोलापुरात 3 वसुलीदारांविरुद्ध गुन्हा
धक्कादायक! बँकेचे हफ्ते न भरल्याने कर्जदारच्या मुलालाच उचलले, डांबून ठेवले; सोलापुरात 3 वसुलीदारांविरुद्ध गुन्हा
Embed widget