Rakesh Jhunjhunwala Thanks To Mukesh Ambani : दूरसंचार क्षेत्रात क्रांती घडवून आणल्याबद्दल आणि देशातील डिजिटायझेशन प्रक्रिया वेगवान केल्याबद्दल भारताने रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचे आभार मानले पाहिजेत. दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलंय


..ज्यामुळे या देशात वेगाने डिजिटायझेशन झाले - राकेश झुनझुनवाला
राकेश झुनझुनवाला म्हणाले "मुकेश अंबानी यांनी भारतात घडवून आणलेल्या अमुलाग्र बदलाबद्दल मी त्यांचे आभार मानतो, कारण त्यांनी स्वस्त दरात व्हॉईस कॉल तसेच इंटरनेट डेटा उपलब्ध करून दिला, ज्यामुळे या देशात वेगाने डिजिटायझेशन झाले", ते म्हणाले.


दूरसंचार क्षेत्र हे गुंतवणुकीसाठी कसे असेल?
काळ जसजसा पुढे जाईल, तसतसे डिजिटायझेशन वाढत राहील असा विश्वास बाजारातील दिग्गजांना वाटतो. ते म्हणाले, “मला नाही वाटत की दूरसंचार क्षेत्र हे गुंतवणुकीसाठी फार चांगले क्षेत्र आहे, कारण त्यात सतत गुंतवणुकीची गरज असते.


एअरलाइन क्षेत्र स्पर्धात्मक असेल
Akasa Air ने आकाशाला गवसणी घातली असताना, राकेश झुनझुनवाला यांनी याबाबत सांगितले की, एअरलाइन क्षेत्र स्पर्धात्मक असेल आणि तिच्या ऑपरेशन्समध्ये देखील काळानुसार बदल होत जातील. नुकतंच राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांच्या मालकीच्या 'अकासा एअर' (Akasa Airs) कंपनीचं पहिलं विमान 7 ऑगस्टला आकाशात झेपावलं.  Akasa Air ही देशातील प्रसिद्ध गुंतवणूकदार आणि स्टॉक ब्रोकर राकेश झुनझुनवाला यांची विमान कंपनी आहे. 


रिलायन्सने 2.32 लाख नोकऱ्या दिल्या
तर रिलायन्स इंडस्ट्रीजच्या अहवालानुसार, मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स समूहाने 2021-22 या आर्थिक वर्षात एकूण 2.32 लाख लोकांना नोकऱ्या दिल्या आहेत. कंपनीतील नवीन कर्मचाऱ्यांच्या या संख्येमुळे रिलायन्सच्या एकूण कर्मचाऱ्यांचा आकडा 3.43 लाख झाला आहे. वार्षिक अहवालात असे सांगण्यात आले की, या कालावधीत रिटेल क्षेत्रात 1,68,910 लोकांना नोकऱ्या मिळाल्या, तर रिलायन्स जिओमध्ये 57,883 लोकांना नोकऱ्या देण्यात आल्या.


इतर महत्वाच्या बातम्या 


Mukesh Ambani : रिलायन्सने FY22 मध्ये 2.32 लाख लोकांना दिल्या नोकऱ्या, 5G कव्हरेजसाठी ब्लू प्रिंट तयार


Tiranga Interesting Facts : देशात फक्त एकाच ठिकाणी तिरंग्याची निर्मिती अन् 18 वेळा गुणवत्ता तपासणी! जाणून घ्या तिरंगा निर्मितीच्या 5 रंजक गोष्टी


Bihar : प्राध्यापकाचा प्रामाणिकपणा; विद्यार्थी आले नाहीत म्हणून शिकवता न आल्यानं 23 लाखांचा पगार केला परत!