Coronavirus Cases In India Today : देशात अलिकडे वाढत असलेल्या कोरोनाच्या वाढत्या प्रार्दुभावाच्या पार्श्वभूमीवर एक चांगली दिलासादायक बातमी आहे. देशात गेल्या दोन महिन्यांनंतर सर्वात कमी कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. देशात गेल्या 24 तासांत 12 हजार 751 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. त्याआधी रविवारी 18 हजार 738 रुग्णांना कोरोनाची लागण झाली होती. दुसरी चांगली बाब म्हणजे कोरोना रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे. सोमवारी दिवसभरात देशात 16 हून अधिक रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोना रुग्णांची घटती संख्या ही मोठी दिलासादायक बातमी आहे. सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाबाधितांची संख्या घटली आहे. 


सक्रीय रुग्णांची संख्या एक लाख 31 हजारांवर


देशात कोरोना रुग्णांची संख्या घटली आहे. त्यासोबतच सक्रिय रुग्णांच्या संख्येतही झपाट्याने घट होताना पाहायला मिळत आहे. सध्या देशात 1 लाख 31 हजार 807 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. देशात आजपर्यंत कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे 5 लाख 26 हजार  772 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशातील सक्रिय कोरोना रुग्णांचा दर 0.30 टक्के आहे. देशातील दैनंदिन कोरोना रुग्णांचा दर 98.51 टक्के आहे. गेल्या 24 तासांत 16 हजार 412 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. त्यामुळे कोरोना संसर्गावर मात केलेल्यांची संख्या 4 कोटी 35 लाख 16 हजार 71 इतकी झाली आहे.




महाराष्ट्रात 1005 नवे रुग्ण, चार कोरोनाबाधितांचा मृत्यू


आरोग्य विभागाच्या नव्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांमध्ये महाराष्ट्रात 1005 नव्या रुग्णांची भर पडली आहे तर चार कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. तसेच सोमवारी राज्यात एकूण 1044 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात सध्या एकूण 11 हजार 968 इतके रुग्ण सक्रिय असून सर्वाधिक सक्रिय रुग्णसंख्या ही मुंबईमध्ये असल्याचं समोर आलं आहे. मुंबईमध्ये 2977 इतके सक्रिय रुग्ण असून त्या खालोखाल पुण्यामध्ये 2726 सक्रिय रुग्ण आहेत. 




मुंबईत सोमवारी 407 रुग्णांची नोंद, 163 कोरोनामुक्त


सोमवारी बईत 407 रुग्णांची नोंद झाली आहे. मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईत सोमवारी 163 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. ज्यामुळे मुंबईत कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची संख्या 11,05,317 वर पोहोचली आहे. त्यामुळे मुंबईचा रिकव्हरी रेट 98 टक्के इतका झाला आहे. तर मागील 24 तासांत एका रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या 19 हजार 660 झाली आहे. सध्या मुंबईत 2,977 रुग्ण आहेत.