एक्स्प्लोर
चंदू चव्हाण यांना भारतात नक्की परत आणू: राजनाथ सिंह
नवी दिल्ली: नजरचुकीने एलओसी पार करुन पाकिस्तानी लष्कराच्या हाती लागलेला जवान महाराष्ट्राचा असल्याचं स्पष्ट झालं आहे. चंदू बाबूलाल चव्हाण असं या जवानाचं नाव असून ते मूळचे धुळ्याचे आहेत. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्यानंतर आता राजनाथ सिंह यांनी चंदू चव्हाण यांच्या कुटुंबीयांशी फोनवरून बातचीत याबाबत बातचीत केल्याची माहिती समजते आहे.
चंदू चव्हाण यांना भारतात परत आणण्यासाठी सरकार हरतऱ्हेचे प्रयत्न करणार असल्याची ग्वाही गृहमंत्र्यांनी दिली आहे. त्यासाठी भारत आंतरराष्ट्रीय स्तरावरील दबावनीतीचा वापर करुन त्यांची सुटका करण्याचे प्रयत्न करेल. असंही राजनाथ सिंह म्हणाले.
दरम्यान, चंदू चव्हाण यांच्या आजीचं निधनाद्दलही त्यांनी शोक व्यक्त केला आहे. भारताच्या सर्जिकल स्ट्राईकनंतर भारतीय जवानाने नियंत्रण रेषा म्हणजेच एलओसी पार केल्याचं वृत्त गुरुवारी संध्याकाळी आलं होतं. टट्टापानी इथे या चंदू चव्हाण यांनी एलओसी पार केली होती. त्यामुळे पाकिस्तानच्या लष्कराने त्यांना ताब्यात घेतलं. पाकिस्ताने त्यांना अज्ञातस्थळी ठेवलं आहे.
भारताचा सर्जिकल स्ट्राईक
27 आणि 28 सप्टेंबरच्या रात्री भारतीय सैन्याच्या सर्जिकल स्ट्राईकमध्ये पाकव्याप्त काश्मीरमधील 7 तळांना उद्ध्वस्त झाली. यामध्ये 38 दहशतवाद्यांचा खात्मा केला, तर 2 पाकिस्तानी सैनिक ठार झाले.
सर्जिकल स्ट्राईकनंतर दावे-प्रतिदावे
भारताच्या सर्जिकल स्ट्राईकनंतर दावे-प्रतिदावे सुरु आहेत. ताब्यात घेतलेला जवान सर्जिकल स्ट्राईकमधील असल्याचा दावा पाकिस्तानी लष्कराने केला आहे. मात्र भारताने हा दावा फेटाळला आहे. चंदू चव्हाण यांचा सर्जिकल स्ट्राईकशी संबंध नसून नगरचुकीने त्यांनी एलओसी पार केली, असं स्पष्टीकरण भारताने दिलं आहे.
कोण आहेत चंदू चव्हाण?
चंदू चव्हाण हे मूळचे धुळे जिल्ह्यातील बोरविहीर या गावचे आहेत. चंदू 2012 मध्ये सैन्यात भरती झाले होते. 22 वर्षीय चंदू यांनी दोन महिन्यांपूर्वीच राष्ट्रीय रायफल्स जॉईन केलं होतं. चंदू यांचा मोठा भाऊ भूषणदेखील मिलिट्रीमध्ये आहे. ते सध्या 9 मराठा रेजिमेट कार्यरत आहेत.
धक्क्याने आजीचाही मृत्यू
चंदू चव्हाण लहान असतानाच त्यांच्या डोक्यावरुन आई-वडिलांचं छत्र हरवलं. त्यामुळे चंदू आणि त्याचा भाऊ भूषण यांचं पालनपोषण आजी-आजोबांनी केलं. आजी-आजोबा भूषण चव्हाण यांच्यासोबत गुजरातमधील जामनगर इथे राहतात. चंदू चव्हाण यांना पाकिस्तानने ताब्यात घेतल्याचं वृत्त आल्यानंतर आजीचं धक्क्याने निधन झालं.
चंदू यांच्या सुटकेसाठी मुख्यमंत्री राजनाथ सिंहांची भेट
जवान चंदू चव्हाणसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली. चंदू चव्हाण यांची पाकिस्तानच्या ताब्यातून लवकरात लवकर सुटका करा, अशी मागणी त्यांनी राजनाथ सिंहांकडे केली.
चंदू चव्हाण यांना आणण्याचे प्रयत्न सुरु
दरम्यान, चंदू चव्हाण यांना परत आणण्याचे पूर्ण प्रयत्न सुरु असल्याचं राजनाथ सिंह यांनी सांगितलं. तसंच डीजीएमओ रणबीर सिंह यांनी पाकिस्तानला याबाबत मााहिती दिली आहे.
चंदूच्या सुटकेसाठी मुख्यमंत्री राजनाथ सिंहांची भेट
जवान चंदू चव्हाणसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली. चंदू चव्हाण यांची पाकिस्तानच्या ताब्यातून लवकरात लवकर सुटका करा, अशी मागणी त्यांनी राजनाथ सिंहांकडे केली.
चंदू चव्हाणला आणण्याचे प्रयत्न सुरु
दरम्यान, चंदू चव्हाण यांना परत आणण्याचे पूर्ण प्रयत्न सुरु असल्याचं राजनाथ सिंह यांनी सांगितलं. तसंच डीजीएमओ रणबीर सिंह यांनी पाकिस्तानला याबाबत मााहिती दिली आहे.
संबंधित बातम्या
चुकून नियंत्रण रेषा ओलांडलेला भारतीय जवान पाकच्या ताब्यात
सीमेजवळची हजार गावं रिकामी, रुग्णालयंही सज्ज
सर्जिकल स्ट्राईक : राहुल गांधीही म्हणतात, मी मोदींसोबत !
दहशतवाद्यांचे मृतदेह दफन, पुरावे नष्ट करण्याचे पाकचे प्रयत्न
भारताच्या सर्जिकल स्ट्राईकवर शाहिद आफ्रिदी म्हणतो…
सर्जिकल स्ट्राईकनंतर आज पुन्हा केंद्रीय सुरक्षा समितीची बैठक
सर्जिकल स्ट्राईकनंतर सीमेवर पाकिस्तानी रेंजर्सच्या हालचाली
भारत-पाकिस्तान सीमा कुठून कुठपर्यंत?
होय, आम्ही LOC पार करुन अतिरेक्यांचा खात्मा केला : इंडियन आर्मी
चुकून नियंत्रण रेषा ओलांडलेला भारतीय जवान पाकच्या ताब्यात
वाघा बॉर्डरवरील बीटिंग रिट्रीट 2 ऑक्टोबरपर्यंत रद्द
पाकमधील भारतीय उच्चायुक्तांना पाक परराष्ट्र मंत्रालयाचं बोलावणं
मोदी आणि भारतीय जवानांकडून पितृपक्षात पाकचं श्राद्ध : राज ठाकरे
सर्जिकल स्ट्राईक: भारतीय जवान नेमके कसे घुसले?
भारत-पाक युद्ध झाल्यास… दोन्ही देशांची शस्त्रसज्जता किती?
सर्जिकल स्ट्राईक म्हणजे काय?
ही कारवाई उरी हल्ल्यातील जवानांना श्रद्धांजली, कुटुंबीयांची भावना
भारत कणखर, मोदींचा अभिमान, मुख्यमंत्र्यांचं ट्वीट
अभिनंदन मोदीजी… उद्धव ठाकरेंचा पंतप्रधानांना फोन
काश्मीर मांगो गे तो चीर देंगे, भाजप कार्यालयाबाहेर जल्लोष
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
शिक्षण
बातम्या
महाराष्ट्र
Advertisement