एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना राहुल गांधींचं गणित चुकलं
पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींच गणित चुकल्याचं पाहायला मिळालं. मोदी सरकारच्या काळात गरजेच्या वस्तूंच्या किमतीत मोठी वाढ झाल्याचं ट्वीट राहुलं यांनी केलं होतं. मात्र, त्यात दिलेली महागाईची टक्केवारी मात्र चुकली होती.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींच गणित चुकल्याचं पाहायला मिळालं. मोदी सरकारच्या काळात गरजेच्या वस्तूंच्या किमतीत मोठी वाढ झाल्याचं ट्वीट राहुलं यांनी केलं होतं. मात्र, त्यात दिलेली महागाईची टक्केवारी मात्र चुकली होती.
पंतप्रधान मोदी गुजराचे मुख्यमंत्री असताना राज्यातील महागाईसंदर्भात काही प्रश्न विचारले होते. यात त्यांनी 2014 आणि 2017 मधील अकडेवारी एका ग्राफिक्सच्या माध्यमातून दिली होती.
या चार्टमधून राहुल गांधींनी भाजप सरकारच्या काळाता महागाई कशी वाढली ते सांगितलं होतं?
पण त्यांनी जी आकडेवारी दिली होती, ती चुकीची होती. आपली चूक लक्षात आल्यानंतर राहुल गांधींनी चूक सुधारत, जुनं ट्वीट डिलीट केलं आणि नवीन ट्वीट त्यांनी केलं.
या नव्या ट्वीटमध्ये महागाईची टक्केवारी न देता, त्यांनी वस्तूंच्या किंमतीत किती रुपयांनी वाढ झाली ते एका चार्टच्या माध्यमातून दाखवलं. दरम्यान, गुजरात निवडणूकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. मात्र, मोदींवर वार करताना राहुल गांधींच गणित चुकल्याची चर्चा आता रंगत आहे.22 सालों का हिसाब#गुजरात_मांगे_जवाब
प्रधानमंत्रीजी-7वाँ सवाल: जुमलों की बेवफाई मार गई नोटबंदी की लुटाई मार गई GST सारी कमाई मार गई बाकी कुछ बचा तो - महंगाई मार गई बढ़ते दामों से जीना दुश्वार बस अमीरों की होगी भाजपा सरकार? pic.twitter.com/1S8Yt0nI7B — Office of RG (@OfficeOfRG) December 5, 2017
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
निवडणूक
राजकारण
Advertisement