एक्स्प्लोर

सर्जिकल स्ट्राईकवेळी राहुल गांधींना लष्करासोबत पाठवायला हवं होतं : पर्रिकर

पणजी येथील भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना पर्रिकर यांनी पुन्हा एकदा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींवर निशाणा साधला. सर्जिकल स्ट्राईक करून आपण गोव्यावरचं देशाचं कर्ज फेडलं असल्याचं भाष्य पर्रिकर यांनी यापूर्वी केलं होतं.

पणजी : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींना सर्जिकल स्ट्राईकवेळी लष्करासोबत पाठवायला हवं होतं. मग त्यांचा सर्जिकल स्ट्राईकवर विश्वास बसला असता, अशी उपहासात्मक टीका माजी संरक्षण मंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी केली. सर्जिकल स्ट्राईक बाबत प्रश्रचिन्ह उपस्थित करणाऱ्या काँग्रेसचा समाचार घेणं मनोहर पर्रिकर यांनी सुरुच ठेवलं आहे. पणजी येथील भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना पर्रिकर यांनी पुन्हा एकदा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींवर निशाणा साधला. सर्जिकल स्ट्राईक करून आपण गोव्यावरचं देशाचं कर्ज फेडलं असल्याचं भाष्य पर्रिकर यांनी यापूर्वी केलं होतं. त्यानंतर आता भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात पर्रिकर यांनी आज थेट काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर नेम धरला. 'सर्जिकल स्ट्राईकची प्रक्रिया आणि नियोजन हे अत्यंत गुप्त ठेवावं लागतं. त्याविषयी कुणाला पूर्वकल्पना देता येत नाही. पण आम्ही जर लष्करासोबत राहुल गांधी यांना पाठवलं असतं, तर काँग्रेसने सर्जिकल स्ट्राईक झाला यावर विश्वास ठेवला असता ना?,' असा प्रश्न पर्रिकरांनी उपस्थित केला. 'मी सर्जिकल स्ट्राईकविषयी राजकीय अर्थाने बोलत नाही. मात्र या ऑपरेशनवर विश्वास बसण्यासाठी विरोधी पक्षातील लोकांना सर्जिकल स्ट्राईकवेळी लष्कराने सोबत न्यायला हवं होतं का?' अशी विचारणा पर्रिकर यांनी केली. 'सर्जिकल स्ट्राईकची माहिती फक्त चौघांनाच होती. मी, पंतप्रधान मोदी, लष्कर प्रमुख आणि मिलिटरी ऑपरेशनचे डायरेक्टर जनरल...’ असंही पर्रिकर म्हणाले. 'केंद्रात पुन्हा मोदी सरकार यायला हवं. देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी ते गरजेचं आहे. विरोधक अल्पसंख्यांकांमध्ये अकारण भीती निर्माण करत आहेत. मुस्लीम मतदारही भाजपसोबत आहेत. उत्तर प्रदेशमध्ये ते दिसून आलं. गोव्यातील लोकसभेच्या दोन्ही जागा भाजप जिंकेल,असा विश्वास पर्रिकर यांनी व्यक्त केला.
अधिक पाहा..
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Seema Haider : सीमा हैदरवर जीवघेणा हल्ला, गुजरातमधून आलेल्या युवकाकडून गळा दाबण्याचा प्रयत्न, काळी जादू केल्याचा दावा
सीमा हैदरवर जीवघेणा हल्ला, गुजरातमधून आलेल्या युवकाकडून गळा दाबण्याचा प्रयत्न, काळी जादू केल्याचा दावा
Bihar Election 2025 : बिहार विधानसभा निवडणुकीसाठी महागठबंधनचं ठरलं, राजद-काँग्रेसचा 243 जागांबाबत मोठा निर्णय, मनोज झा म्हणाले...
बिहार विधानसभा निवडणुकीसाठी महागठबंधनचं ठरलं, राजद-काँग्रेसचा 243 जागांबाबत मोठा निर्णय, मनोज झा म्हणाले...
NEET Exam 2025 : नाशिकमधील दोन विद्यार्थिनींना नीट परीक्षा केंद्रावर प्रवेश नाकारला, नेमकं काय घडलं?
नाशिकमधील दोन विद्यार्थिनींना नीट परीक्षा केंद्रावर प्रवेश नाकारला, नेमकं काय घडलं?
Warren Buffett : 40000 शेअरधारकांच्या बैठकीत वॉरेन बफेंची अचानक मोठी घोषणा, म्हणाले आता वेळ आलीय....
40000 शेअरधारकांच्या बैठकीत वॉरेन बफेंची अचानक मोठी घोषणा, म्हणाले आता वेळ आलीय....
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report : Pahalgam Terrorist : पहलगामचा गुन्हेगार काश्मीरच्या जंगलात? दहशतवाद्यांचा शोध सुरुShirdi Saibaba Temple Threat : साईबाबांवर आमची श्रद्धा, अफवांना आम्ही घाबरत नाही; साईभक्तांची प्रतिक्रियाSpecial Report : India War Practice : पृथ्वी, सागर,आकाश..सज्ज भारतीय सेना!त्रिशक्तीच्या सामर्थ्याची झलकEknath Shinde vs Ajit Pawar : शंभूराज देसाईंच्या महाबळेश्वर पर्यटन महोत्सवाकडे अजित पवारांची पाठ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Seema Haider : सीमा हैदरवर जीवघेणा हल्ला, गुजरातमधून आलेल्या युवकाकडून गळा दाबण्याचा प्रयत्न, काळी जादू केल्याचा दावा
सीमा हैदरवर जीवघेणा हल्ला, गुजरातमधून आलेल्या युवकाकडून गळा दाबण्याचा प्रयत्न, काळी जादू केल्याचा दावा
Bihar Election 2025 : बिहार विधानसभा निवडणुकीसाठी महागठबंधनचं ठरलं, राजद-काँग्रेसचा 243 जागांबाबत मोठा निर्णय, मनोज झा म्हणाले...
बिहार विधानसभा निवडणुकीसाठी महागठबंधनचं ठरलं, राजद-काँग्रेसचा 243 जागांबाबत मोठा निर्णय, मनोज झा म्हणाले...
NEET Exam 2025 : नाशिकमधील दोन विद्यार्थिनींना नीट परीक्षा केंद्रावर प्रवेश नाकारला, नेमकं काय घडलं?
नाशिकमधील दोन विद्यार्थिनींना नीट परीक्षा केंद्रावर प्रवेश नाकारला, नेमकं काय घडलं?
Warren Buffett : 40000 शेअरधारकांच्या बैठकीत वॉरेन बफेंची अचानक मोठी घोषणा, म्हणाले आता वेळ आलीय....
40000 शेअरधारकांच्या बैठकीत वॉरेन बफेंची अचानक मोठी घोषणा, म्हणाले आता वेळ आलीय....
Crime News : मुंबईहून सुटलेल्या अवंतिका एक्स्प्रेसमध्ये चाकू हल्ला; महिलेच्या हाता-पायावर वार; नेमकं काय घडलं?
मुंबईहून सुटलेल्या अवंतिका एक्स्प्रेसमध्ये चाकू हल्ला; महिलेच्या हाता-पायावर वार; नेमकं काय घडलं?
बारावीचा निकाल कुठं आणि कधी पाहायचा?
HSC Result 2025 : बारावीचा निकाल कुठं आणि कधी पाहायचा?
मोठी बातमी! देशातील 5 मोठ्या बँकांना RBI चा दणका, नियमांचे पालन न केल्यानं लाखो रुपयांचा दंड 
मोठी बातमी! देशातील 5 मोठ्या बँकांना RBI चा दणका, नियमांचे पालन न केल्यानं लाखो रुपयांचा दंड 
Maharashtra Board HSC Results 2025: बारावीचा निकाल काही तासांवर; बोर्डाच्या वेबसाईटशिवाय निकाल आणखी कुठे पाहता येणार?, जाणून घ्या संपूर्ण माहिती
बारावीचा निकाल काही तासांवर; बोर्डाच्या वेबसाईटशिवाय निकाल आणखी कुठे पाहता येणार?, जाणून घ्या संपूर्ण माहिती
Embed widget