एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
VIDEO : महागाईसंदर्भातील महिलेच्या प्रश्नाला राहुल गांधींच उत्तर
राहुल गांधी हे सध्या प्रचारासाठी गुजरातच्या कानाकोपऱ्यात फिरत आहेत.
अहमदाबाद : काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी सध्या गुजरातमध्ये प्रचारात व्यस्त आहेत. काही महिन्यांवर गुजरात विधानसभेची निवडणूक येऊन ठेपली आहे. त्यामुळे सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. राहुल गांधी हे सुद्धा गुजरातच्या कानाकोपऱ्यात फिरत आहेत.
बडोद्यात प्रचारादरम्यान राहुल गांधींना उपस्थित एका महिलेने महागाई संदर्भात प्रश्न विचारला. “काँग्रेस सत्तेत आल्यास महागाई कमी करण्यासाठी काय करेल?”, महिलेच्या या प्रश्नाला राहुल गांधींनी अत्यंत संयमी आणि सोप्या भाषेत उत्तर दिले. शिवाय, आताही महागाई कशाप्रकारे कमी केली जाऊ शकते, हे पटवून दिले.
"महगाईचं मूळ पेट्रोलच्या किंमती आहेत. तुम्ही ज्या चपला घातल्यात, कपडे परिधान केलेत, त्या सर्वात पेट्रोलची किंमत सामावलेली आहे. सर्व वस्तूंमध्ये पेट्रोलच्या किंमती समाविष्ट असतात. मग आता तुम्ही पाहत असाल की, याआधी 140 डॉलरला बॅरल असायचे, आता 50 डॉलरला बॅरल असते. मात्र त्याचा फायदा हिंदुस्तानातील जनतेला मिळत नाही. मग हा फायदा कुणाला जातोय?", असे म्हणत अत्यंत सोप्या शब्दात महागाई आणि त्यासंदर्भात राहुल गांधींनी समजावून सांगितले.
याचसोबत, महागाईबाबत राहुल गांधी यांनी समोरील उपस्थित लोकांना त्यांच्या संयमी भाषेत समजावून सांगितले.
VIDEO : पाहा राहुल गांधी यांनी काय उत्तर दिले?
https://twitter.com/ANI/status/917427966245609472
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भंडारा
भविष्य
महाराष्ट्र
Advertisement