Rahul Gandhi : राऊत म्हणाले, जिंकलेल्या डावाचे पराभवात रुपांतर, तृणमूल म्हणते, अहंकार नडला; राहुल गांधी मोजक्याच शब्दात काय म्हणाले?
हरियाणात काँग्रेसच्या पराभवानंतर इंडिया आघाडीच्या नेत्यांनी काँग्रेसच्या धोरणावर प्रश्न उपस्थित केले. सामनामधून काँग्रेसला विजयाचे रूपांतर पराभवात कसे करायचे हे माहित असल्याचे म्हटले आहे.
Rahul Gandhi : लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी जम्मू-काश्मीर आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या निकालांवर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी X वरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, हरियाणा विधानसभा निवडणुकीचे निकाल आश्चर्यकारक आहेत.
अनेक विधानसभा मतदारसंघातून तक्रारी येत आहेत
राहुल यांनी म्हटलं आहे की, 'आम्ही हरियाणाच्या अनपेक्षित निकालाचे विश्लेषण करत आहोत. अनेक विधानसभा मतदारसंघातून तक्रारी येत आहेत. याबाबत आम्ही निवडणूक आयोगाला कळवू. हक्क, सामाजिक आणि आर्थिक न्याय आणि सत्यासाठी आम्ही हा संघर्ष सुरूच ठेवू. जम्मू-काश्मीरमध्ये इंडिया आघाडीच्या विजयाबद्दल राहुल यांनी जनतेचे आभार मानले.
जम्मू-कश्मीर के लोगों का तहे दिल से शुक्रिया - प्रदेश में INDIA की जीत संविधान की जीत है, लोकतांत्रिक स्वाभिमान की जीत है।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) October 9, 2024
हम हरियाणा के अप्रत्याशित नतीजे का विश्लेषण कर रहे हैं। अनेक विधानसभा क्षेत्रों से आ रही शिकायतों से चुनाव आयोग को अवगत कराएंगे।
सभी हरियाणा वासियों को…
जिंकलेल्या डावाचे पराभवात रुपांतर
हरियाणात काँग्रेसच्या पराभवानंतर इंडिया आघाडीच्या नेत्यांनी काँग्रेसच्या धोरणावर प्रश्न उपस्थित केले. सामनामधून काँग्रेसला विजयाचे रूपांतर पराभवात कसे करायचे हे माहित असल्याचे म्हटले आहे. तृणमूल काँग्रेसचे नेते साकेत गोखले यांनी काँग्रेसचे नाव न घेता सांगितले की, उद्दामपणा आणि प्रादेशिक पक्षांना तुच्छतेने पाहणे यामुळे पराभव झाला. सामनामध्ये लिहिलं आहे की, 'हरयाणातील पराभवातून काँग्रेसने धडा घेण्याची गरज आहे. हरियाणाचा पराभव हा काँग्रेसच्या अतिआत्मविश्वासाचा आणि राज्यातील नेत्यांच्या उद्दामपणाचा परिणाम आहे. हुड्डा यांनी गैर-जाट मतदारांना सोबत घेतले नाही, त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागले.
महाराष्ट्रात एकट्याने निवडणूक लढवायची असेल तर आधी सांगा
शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले की, काँग्रेसला महाराष्ट्रात एकट्याने निवडणूक लढवायची असेल तर आधी सांगा. राऊत म्हणाले की, भाजपने हरलेला डाव जिंकला. काँग्रेस जिंकतेय असा विश्वास सगळ्यांना वाटत होता पण तरीही पराभव झाला. पद्धतशीर व्यवस्थापन असल्याने भाजप जिंकला. नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला म्हणाले की, काँग्रेसला सखोल विचार करण्याची गरज आहे, हरियाणातील पराभवाची कारणे शोधण्यासाठी काँग्रेसला खोलवर विचार करावा लागेल. या एक्झिट पोलवर विश्वास ठेवून आम्ही आमचा वेळ वाया घालवत आहोत, असे मी आधीच सांगितले आहे. एक्झिट पोल इतके चुकीचे असतील, असे कुणालाही वाटले नसेल.
इतर महत्वाच्या बातम्या