Rahul Gandhi Defamation Case: माझा भाऊ ना कधी घाबरला, ना कधी घाबरणार; शिक्षा सुनावल्यानंतर प्रियंका यांच्याकडून राहुल गांधींची पाठराखण
Defamation Case: शिक्षा सुनावल्यानंतर राहुल गांधी यांनी देखील ट्विटवरून पहिली प्रतिक्रिया दिली आहे. महात्मा गांधींचा कोट त्यांनी शेअर केला आहे.

Rahul Gandhi Convicted: राहुल गांधींचा (Rahul Gandhi) आवाज दाबण्यासाठी, सत्तेकडून साम, दाम, दंड आणि भेदाचा वापर करण्यात येत आहे. असे असले तरीसुद्धा राहुल घाबरणार नाहीत, असे म्हणत प्रियंका गांधीनी (Priyanka Gandhi) राहुल गांधींची पाठराखण केली आहे. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना सुरत कोर्टानं दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर प्रियंका गांधींनी वक्तव्य आहे. तसेच शिक्षा सुनावल्यानंतर राहुल गांधी यांनी देखील ट्विटवरून पहिली प्रतिक्रिया दिली आहे
राहुल गांधी यांना सुनावलेल्या शिक्षेवरून काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप प्रियंका गांधींनी केला आहे. प्रियांका गांधी आपल्या ट्विटमध्ये म्हणाल्या की, "माझा भाऊ ना कधी घाबरला आहे, ना कधी तो घाबरणार, ते खरं बोलत जगले आहेत आणि कायम खरंच बोलत राहतील. तसेच राहुल देशाचा आवाज उठवत राहतील. खऱ्याची ताकद आणि कोट्यवधी भारतीयांचं प्रेम त्यांच्यासोबत आहे.
डरी हुई सत्ता की पूरी मशीनरी साम, दाम, दंड, भेद लगाकर @RahulGandhi जी की आवाज को दबाने की कोशिश कर रही है।
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) March 23, 2023
मेरे भाई न कभी डरे हैं, न कभी डरेंगे। सच बोलते हुए जिये हैं, सच बोलते रहेंगे। देश के लोगों की आवाज उठाते रहेंगे।
सच्चाई की ताकत व करोड़ों देशवासियों का प्यार उनके साथ है।
शिक्षा सुनावल्यानंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया
शिक्षा सुनावल्यानंतर राहुल गांधी यांनी देखील ट्विटवरून पहिली प्रतिक्रिया दिली आहे. महात्मा गांधींचा कोट त्यांनी शेअर केला आहे. राहुल गांधी म्हणाले, माझा धर्म सत्य आणि अहिंसेवर आधारित आहे. सत्य हे माझे ध्येय आहे आणि अहिंसा माझे साधन आहे.
मेरा धर्म सत्य और अहिंसा पर आधारित है। सत्य मेरा भगवान है, अहिंसा उसे पाने का साधन।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) March 23, 2023
- महात्मा गांधी
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना सुरत कोर्टानं दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. मात्र या शिक्षेची अंमलबजावणी 30 दिवसांसाठी स्थगित करण्यात आली. वरच्या कोर्टात जाण्यासाठी कोर्टानं राहुल गांधींना 30 दिवसांचा वेळ दिला आहे. 2019 साली राहुल गांधी यांनी कर्नाटकच्या कोलारमध्ये एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. सर्व चोरांचं आडनाव मोदीच कसं असतं? असं राहुल प्रचारसभेत म्हणाले होते. त्याविरोधात गुजरातमधील एका भाजप आमदारानं पोलिसात तक्रार केली होती. त्यावर आज सुरत सेशन्स कोर्टानं निकाल दिला.























