एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

खोटं ऐकून ऐकून विकास वेडा झालाय : राहुल गांधी

विकासाचं कोणतंही काम इतरांचं ऐकल्याशिवाय होऊ शकत नाही, असे राहुल गांधी म्हणाले.

खेडा (गुजरात) : गुजरातमधील खेडामध्ये काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर पुन्हा एकदा घणाघात केला. खोटं ऐकून ऐकून विकास वेडा झालाय, असं म्हणत राहुल गांधींनी मोदींवर निशाणा साधला. राहुल गांधी म्हणाले, “विकासाचं कोणतंही काम इतरांचं ऐकल्याशिवाय होऊ शकत नाही. काँग्रेस पक्ष कोणतंही काम करण्याआधी लोकांशी चर्चा करतं. मात्र गेल्या 22 वर्षांपासून गुजरातमध्ये कामगार, महिला, लहान दुकानदार यांना जे बोलायचं आहे, ते कुणीही ऐकत नाही.” जीएसटीवरुनही राहुल गांधींनी मोदींवर निशाणा साधला. “जीएसटीची कल्पना काँग्रेस पक्षाची होती. संपूर्ण देशात एकच कर प्रणाली असावी, असं आम्हाला वाटत होतं. आम्ही लोकांपर्यंत आलो. लोकांना विचारलं, त्यानंतर लोकांनी सांगितलं, देशात एकच कर प्रणाली असावी. शिवाय, 18 टक्क्यांपेक्षा जास्त कर न लावण्याचेही लोकांनी सूचवलं. आमच्या जीएसटीच्या कल्पनेत या गोष्टी होत्या. शिवाय, जीएसटी भरण्यासाठी एकच फॉर्म होता. आमचं जीएसटी असं होतं.” “नरेंद्र मोदींनी कुणाचंही न ऐकता रात्री 12 वाजता जीएसटी लागू केलं. आम्ही सांगितलं की, 18 टक्क्यांहून अधिक कर लावू नका, कारण अशामुळे लहान-सहान व्यापाऱ्यांना फटका बसेल. भाजपने ना लोकांचं ऐकलं, ना आमचं ऐकलं. अचानकपणे जीएसटी लागू केलं. त्यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत.”, असे राहुल गांधी म्हणाले. “नरेंद्र मोदींनी नोटाबंदी लागू केली, तेव्हाही कुणालाच विचारलं नाही. कुणा लहान शेतकऱ्याकडे जाऊन त्याला विचारलं असतं की, 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बंद केल्याने काय होईल? तर शेतकऱ्यांनीच सांगितलं असतं की, चुकूनही नोटा बंद करु नका. कारण नोटाबंदीने लाखो लोकांना तोटा सहन करावा लागला आहे.”, असेही राहुल गांधी म्हणाले. राहुल गांधी म्हणाले, “देशात बेरोजगार लोकांची मोठी फौज बनत चालली आहे. प्रत्येक 24 तासाला 30 हजार तरुण रोजगार शोधण्यासाठी बाहेर पडत आहेत. 30 हजारमधील केवळ 450 तरुणांना मोदी सरकार 24 तासात रोजगार देत आहे. आपली स्पर्धा चीनशी आहे. चीनमध्ये एका दिवसात 50 हजार तरुणांना रोजगार मिळतो.”
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra CM : शपथविधीसाठी निवडलेले एक मैदान, जिथे दोनवेळा शपथविधी झाला, दोन्ही वेळा सरकार कार्यकाळ पूर्णच करू शकलं नाही
शपथविधीसाठी निवडलेले एक मैदान, जिथे दोनवेळा शपथविधी झाला, दोन्ही वेळा सरकार कार्यकाळ पूर्णच करू शकलं नाही
Sanjay Gaikwad : आमचे केंद्रीय मंत्री माझ्यासोबत नव्हते, त्यांनी विरोधकांना मदत केली; शिंदेंच्या आमदाराचा प्रतापराव जाधवांवर थेट आरोप
आमचे केंद्रीय मंत्री माझ्यासोबत नव्हते, त्यांनी विरोधकांना मदत केली; शिंदेंच्या आमदाराचा प्रतापराव जाधवांवर थेट आरोप
Numerology : अत्यंत अतिशहाणे असतात 'या' जन्मतारखेचे लोक; दुसऱ्यांना लेखतात कमी, स्वत:चंच म्हणणं करतात खरं
अत्यंत अतिशहाणे असतात 'या' जन्मतारखेचे लोक; दुसऱ्यांना लेखतात कमी, स्वत:चंच करतात खरं
Maharashtra Ekikaran Samiti : बेळगावात मराठी भाषकांच्या मेळाव्यास परवानगी नाहीच, कडक कारवाई करण्याचा कर्नाटक पोलिसांचा इशारा
बेळगावात मराठी भाषकांच्या मेळाव्यास परवानगी नाहीच, कडक कारवाई करण्याचा कर्नाटक पोलिसांचा इशारा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  6:30 AM : 30 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सSpecial Report Eknath Shinde : काळजीवाहू मुख्यमंत्र्यांना कोणती काळजी सतावतेय?Special Report Eknath Shnde Dimand : एकनाथ शिंदे नाराज, कुठे रखडलं? मंत्रिपदावरुन अडलं?Special Report Mahayuti Mla Mantripad : मंत्रिपदाची आस, कोणाच्या नावासमोर लागणार मंत्रिपदाचा टीळा?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra CM : शपथविधीसाठी निवडलेले एक मैदान, जिथे दोनवेळा शपथविधी झाला, दोन्ही वेळा सरकार कार्यकाळ पूर्णच करू शकलं नाही
शपथविधीसाठी निवडलेले एक मैदान, जिथे दोनवेळा शपथविधी झाला, दोन्ही वेळा सरकार कार्यकाळ पूर्णच करू शकलं नाही
Sanjay Gaikwad : आमचे केंद्रीय मंत्री माझ्यासोबत नव्हते, त्यांनी विरोधकांना मदत केली; शिंदेंच्या आमदाराचा प्रतापराव जाधवांवर थेट आरोप
आमचे केंद्रीय मंत्री माझ्यासोबत नव्हते, त्यांनी विरोधकांना मदत केली; शिंदेंच्या आमदाराचा प्रतापराव जाधवांवर थेट आरोप
Numerology : अत्यंत अतिशहाणे असतात 'या' जन्मतारखेचे लोक; दुसऱ्यांना लेखतात कमी, स्वत:चंच म्हणणं करतात खरं
अत्यंत अतिशहाणे असतात 'या' जन्मतारखेचे लोक; दुसऱ्यांना लेखतात कमी, स्वत:चंच करतात खरं
Maharashtra Ekikaran Samiti : बेळगावात मराठी भाषकांच्या मेळाव्यास परवानगी नाहीच, कडक कारवाई करण्याचा कर्नाटक पोलिसांचा इशारा
बेळगावात मराठी भाषकांच्या मेळाव्यास परवानगी नाहीच, कडक कारवाई करण्याचा कर्नाटक पोलिसांचा इशारा
Waqf Board : काळजीवाहू सरकार असताना वक्फ बोर्डला 10 कोटींचा निधी, या प्रकाराची चौकशी करणार; देवेंद्र फडणवीसांचा पहिला मोठा निर्णय
काळजीवाहू सरकार असताना वक्फ बोर्डला 10 कोटींचा निधी, या प्रकाराची चौकशी करणार; देवेंद्र फडणवीसांचा पहिला मोठा निर्णय
AR Rahman Net Worth : भारतापासून अमेरिकेपर्यंत आलिशान घरे, महागड्या कार; किंग कोहलीपेक्षाही गर्भश्रीमंत, एकूण किती हजार कोटींचा मालक?
एआर रहमान : भारतापासून अमेरिकेपर्यंत आलिशान घरे, महागड्या कार; किंग कोहलीपेक्षाही गर्भश्रीमंत, एकूण किती हजार कोटींचा मालक?
Champions Trophy : तर चॅम्पियन्स ट्रॉफी भारतामध्ये होणार? पाकिस्तानात होणार की नाही? आजच निर्णय होण्याची शक्यता
तर चॅम्पियन्स ट्रॉफी भारतामध्ये होणार? पाकिस्तानात होणार की नाही? आजच निर्णय होण्याची शक्यता
डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे गेला चिमुकल्याचा जीव, मृत्यूनंतर 11 दिवस ठेवलं व्हेंटिलेटरवर; संभाजीनगरमधील धक्कादायक प्रकार
डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे गेला चिमुकल्याचा जीव, मृत्यूनंतर 11 दिवस ठेवलं व्हेंटिलेटरवर; संभाजीनगरमधील धक्कादायक प्रकार
Embed widget