कोरोना अजून संपला नाही, मोदी सरकारला अतिआत्मविश्वास; राहुल गांधींचा निशाणा
दक्षिण आफ्रिका व ब्राझील येथून कोरोनाचे नवीन स्ट्रेन भारतात आल्याची बाब गंभीर आहे. याच मुद्द्यावरुन कॉंग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी केंद्रा सरकारला लक्ष्य केलं आहे.
नवी दिल्ली : देशात पहिल्यांदाच चार जणांना दक्षिण आफ्रिकेतील सार्स-सीओव्ही -2 व्हायरसची लागण झाल्याचं समोर आलं आहे. तर एका व्यक्तीला ब्राझीलच्या व्हायरसचा संसर्ग झाल्याची पुष्टी झाली आहे. दक्षिण आफ्रिका व ब्राझील येथून कोरोनाचे नवीन स्ट्रेन भारतात आल्याची बाब गंभीर आहे. याच मुद्द्यावरुन कॉंग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला लक्ष्य केलं आहे.
राहुल गांधी यांनी ट्वीट करत केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. राहुल गांधी म्हणाले, कोरोना अजून संपलेली नाही. सरकार याकडे दुर्लक्ष करत आहे आणि याबाबत अति आत्मविश्वासाचा बाळगत आहे.
GOI is being grossly negligent and over confident about Covid-19.
It’s not over yet. pic.twitter.com/W3FcSkS2JD — Rahul Gandhi (@RahulGandhi) February 17, 2021
दक्षिण आफ्रिकेच्या कोरोना स्ट्रेनचा 44 देशांमध्ये फैलाव
ICMR चे महासंचालक बलराम भार्गव म्हणाले की, भारताबाहेरहून आलेल्या सर्व प्रवासी आणि त्यांच्या संपर्कात येणाऱ्यांची तपासणी केली गेली जाणार आहे आणि त्यांना आयसोलेशनमध्ये ठेवले गेले आहे. 'आयसीएमआर-एनआयव्ही' या चार बाधित लोकांच्या नमुन्यांमधून दक्षिण आफ्रिकेचा फॉर्म वेगळा करण्याचा आणि इतर माहिती एकत्रित करण्याचा प्रयत्न करत आहे.
मुंबईत मास्क न वापरणाऱ्यांविरोधात रेल्वेतही होणार कारवाई, विशेष मार्शल नेमणार
फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात ब्राझीलहून परत आलेल्या एका व्यक्तीला ब्राझीलच्या कोरोना व्हायरस स्ट्रेनची लागण झाल्याची पुष्टी झाली आहे. भार्गव यांनी या दोन्ही व्हायरस प्रकारांचा संदर्भ घेत सांगितले की, दक्षिण आफ्रिकेचा फॉर्म डिसेंबरच्या मध्यावधीत प्रथम आढळला. दक्षिण आफ्रिकेचा फॉर्म 44 देशांमध्ये पसरला आहे. ब्राझीलचा विषाणूचा प्रकार जानेवारीमध्ये आढळला होता आणि तो आतापर्यंत 15 देशांमध्ये पसरला आहे.
पालघर जिल्हा परिषद अध्यक्षांना मास्क न वापरल्याने दंड
ब्रिटनच्या नव्या कोरोना स्ट्रेनचे 187 रुग्ण
देशात ब्रिटनच्या नव्या कोरोना स्ट्रेनची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढून 187 झाली आहे. यात कुणाचाही मृत्यू झालेला नाही. नवीन स्वरुपाचे बारकाईने निरीक्षण केले जात आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण म्हणाले की, ब्रिटनहून येणाऱ्या प्रवाश्यांसाठी आरटी-पीसीआर चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे. संक्रमित लोकांचे जीनोम सिक्वेन्सिंग केले जात आहे. ही एक चांगली रणनीती आहे.