एक्स्प्लोर
Advertisement
राहुल गांधी चुकून लेडिज टॉयलेटमध्ये घुसले...
टॉयलटेवर गुजरातीमध्ये जेंट्स आणि लेडिज असे दोन बोर्ड होते. मात्र गुजराती भाषा वाचता येत नसल्याने राहुल गांधी चुकून लेडिज टॉयलेटमध्ये घुसले.
अहमदाबाद : गुजरात विधानसभेसाठी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या होमग्राऊंडवर तळ ठोकून आहेत. मोदींवर विविध मुद्द्यांवरुन त्यांनी टीकेची झोड उठवली आहे. मात्र गुजरातमधील छोटा उदयपूर येथील सभेनंतर असा प्रकार घडला, ज्याची सगळीकडे चर्चा सुरु आहे.
छोटा उदयपूर येथील सभेनंतर राहुल गांधी टॉयलेटला गेले. टॉयलटेवर गुजरातीमध्ये जेंट्स आणि लेडीज असे दोन बोर्ड होते. मात्र गुजराती भाषा वाचता येत नसल्याने राहुल गांधी चुकून लेडीज टॉयलेटमध्ये घुसले. त्यानंतर या प्रकाराची एकच चर्चा सुरु झाली.
राहुल गांधी लेडीज टॉयलेटमध्ये गेल्यानंतर प्रचंड गर्दी जमली. त्यांच्या सुरक्षा रक्षकांनी गर्दी हटवली. मात्र राहुल गांधींना लेडीज टॉयलेटमधून बाहेर पडताना पाहून सर्वांना हसू अनावर झालं.
राहुल गांधी निवडणूक प्रचार अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी गुजरात दौऱ्यावर होते. या तीन दिवसीय दौऱ्याच्या अखेरच्या दिवशी त्यांनी जनतेला संबोधित केलं. जीएसटी आणि नोटाबंदीमुळे येत असलेल्या अडचणींवरुन त्यांनी मोदींवर हल्लाबोल चढवला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
पुणे
भविष्य
राजकारण
Advertisement