एक्स्प्लोर

फ्रान्सचे तीन राफेल लढाऊ विमान भारतात

ऑस्ट्रेलियात नुकत्याच झालेल्या ‘पिच ब्लॅक’ युद्ध सरावातील ही विमानं आहेत, ज्यात भारतीय वायूसेनेनेही सहभाग घेतला होता. फ्रान्सकडून भारताने ज्या 36 राफेल लढाऊ विमानांची खरेदी केली आहे, त्याची पहिली खेप सप्टेंबर 2019 पर्यंत येणार आहे.

नवी दिल्ली : राफेल लढाऊ विमानाच्या राजकीय वादानंतर फ्रान्सचे तीन राफेल लढाऊ विमाने भारतीय वायूसेनेच्या ग्वाल्हेरमधील एअरबेसवर दाखल झाली आहेत. ऑस्ट्रेलियात नुकत्याच झालेल्या ‘पिच ब्लॅक’ युद्ध सरावातील ही विमानं आहेत, ज्यात भारतीय वायूसेनेनेही सहभाग घेतला होता. मिळालेल्या माहितीनुसार, फ्रान्सच्या तीन लढाऊ विमानांसह एक अॅटलास-400 एम मिलिट्री ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट, एक सी-135 रिफ्यूलर विमान आणि एक एअरबस कार्गो विमानाने ऑस्ट्रेलियाहून ग्वाल्हेरच्या हवाई दलाच्या तळावर दाखल झाली. यावेळी दोन्ही देशाची हवाई सेना एकत्र उड्डाण घेणार असल्याचीही शक्यता आहे. ग्वाल्हेर एअरबेसवर भारताच्या मिराज-2000 एच लढाऊ विमानांची स्क्वाड्रन तैनात आहे. फ्रान्सचे तीन राफेल लढाऊ विमान भारतात फोटो : रॉयल ऑस्ट्रेलिया वायूसेना ऑस्ट्रेलियात झालेल्या पिच ब्लॅक युद्ध सरावात भारतीय वायूसेनेच्या वैमानिकांनी राफेल लढाऊ विमानातून उड्डाण घेतलं होतं, ज्याचे फोटो ऑस्ट्रेलियाच्या वायूसेनेने जारी केले होते. फ्रान्सचा हा ताफा पिच ब्लॅक युद्ध सरावासोबतच आशिया-पॅसिफिक क्षेत्रातील पिगेस नावाच्या युद्ध सरावात सहभाग घेणार आहे. फ्रान्सचे तीन राफेल लढाऊ विमान भारतात फोटो : रॉयल ऑस्ट्रेलिया वायूसेना मिराज लढाऊ विमानंही भारताने 80 च्या दशकात फ्रान्सकडून खरेदी केली होती. मिराज विमानांची निर्मिती राफेल विमान बनवणारी कंपनी दसॉल्टने केली होती. फ्रान्सकडून भारताने ज्या 36 राफेल लढाऊ विमानांची खरेदी केली आहे, त्याची पहिली खेप सप्टेंबर 2019 पर्यंत येणार आहे. भारतीय वायूसेनेच्या अंबाला येथील एअरबेसवर राफेलची पहिली स्क्वाड्रन तैनात केली जाईल. या स्क्वाड्रनला गोल्डन एरो नाव दिलं आहे. दुसरी स्क्वाड्रन सिक्कीमजवळील उत्तर बंगालच्या हाशीमारामध्ये तैनात असेल. ग्वाल्हेर एअरबेसवर राफेल लढाऊ विमान येण्याची ही पहिलीच वेळ नाही. 2015 मध्ये बंगळुरुत झालेल्या एयरो-शोमध्येही राफेल लढाऊ विमानांनी सहभाग घेतला होता. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Beed Crime : धक्कादायक... बीडमध्ये 24 तासात दोन अपहरणाच्या घटना, व्यापाऱ्याकडून उकळली लाखोंची खंडणी, पोलिसांचा धाक संपला?
धक्कादायक... बीडमध्ये 24 तासात दोन अपहरणाच्या घटना, व्यापाऱ्याकडून उकळली लाखोंची खंडणी, पोलिसांचा धाक संपला?
विधानसभेचा निकाल, VVPAT मधील तफावतीबाबत निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा, पत्रक जारी
विधानसभेचा निकाल, VVPAT मधील तफावतीबाबत निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा, पत्रक जारी
Gopichand Padalkar : ... तर EVM च्या विरोधात थोबाड उचकटायचं नाही, पडळकरांचा शरद पवार, सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल
... तर EVM च्या विरोधात थोबाड उचकटायचं नाही, पडळकरांचा शरद पवार, सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल
नवजात बाळाला रस्त्यावर फेकलं, तोंडाला पिशवी बांधली; पुण्यातील धक्कादायक घटनेनं समाजमन हादरलं
नवजात बाळाला रस्त्यावर फेकलं, तोंडाला पिशवी बांधली; पुण्यातील धक्कादायक घटनेनं समाजमन हादरलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Kurla Bus Accident: चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; बसची फॉरेंसिक टीम तपासणीNana Patole Makarwadi Visit : माकरवाडीतील भावना जाणून घेण्यासाठी भेट देणारGopichand Padalkar speech Markadwadi:लबाड लांडगा,बेअक्कल,विश्वासघातकी,मारकडवाडीत शरद पवारांवर हल्लाSadabhau Khot Marakarwad Speech:मारकडवाडीत राहुल गांधींचं लग्न लावा..सदाभाऊ खोत यांची तुफान टोलेबाजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed Crime : धक्कादायक... बीडमध्ये 24 तासात दोन अपहरणाच्या घटना, व्यापाऱ्याकडून उकळली लाखोंची खंडणी, पोलिसांचा धाक संपला?
धक्कादायक... बीडमध्ये 24 तासात दोन अपहरणाच्या घटना, व्यापाऱ्याकडून उकळली लाखोंची खंडणी, पोलिसांचा धाक संपला?
विधानसभेचा निकाल, VVPAT मधील तफावतीबाबत निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा, पत्रक जारी
विधानसभेचा निकाल, VVPAT मधील तफावतीबाबत निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा, पत्रक जारी
Gopichand Padalkar : ... तर EVM च्या विरोधात थोबाड उचकटायचं नाही, पडळकरांचा शरद पवार, सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल
... तर EVM च्या विरोधात थोबाड उचकटायचं नाही, पडळकरांचा शरद पवार, सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल
नवजात बाळाला रस्त्यावर फेकलं, तोंडाला पिशवी बांधली; पुण्यातील धक्कादायक घटनेनं समाजमन हादरलं
नवजात बाळाला रस्त्यावर फेकलं, तोंडाला पिशवी बांधली; पुण्यातील धक्कादायक घटनेनं समाजमन हादरलं
Kurla Bus Accident: बेस्टमध्ये हैदराबादच्या कंपनीची मोनोपॉली, कोणाचा राजकीय वरदहस्त? कुर्ला बस अपघातानंतर ठाकरे गटाचा गंभीर आरोप
बेस्टमध्ये हैदराबादच्या कंपनीची मोनोपॉली, कोणाचा राजकीय वरदहस्त? ठाकरे गटाचा गंभीर आरोप
Beed Crime : बीडमधील सरपंच संतोष देशमुखांच्या हत्याप्रकरणात मोठी अपडेट, पोलिसांनी दोन आरोपींना ठोकल्या बेड्या, मस्साजोगमध्ये रास्ता रोको सुरूच
बीडमधील सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणात मोठी अपडेट, पोलिसांनी दोन आरोपींना ठोकल्या बेड्या, मस्साजोगमध्ये रास्ता रोको सुरूच
Satish Wagh Case: काळ्या मातीत राबणारा अन् हॉटेल व्यावसायिक, सतीश वाघ कोणाच्या डोळ्यात सलत होते? नेमकं कारण काय?
काळ्या मातीत राबणारा अन् हॉटेल व्यावसायिक, सतीश वाघ कोणाच्या डोळ्यात सलत होते? नेमकं कारण काय?
मामाचा खून, मुख्यमंत्र्यांचा फोन; स्मशानातूनच आमदार टिळेकरांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच सांगितलं
मामाचा खून, मुख्यमंत्र्यांचा फोन; स्मशानातूनच आमदार टिळेकरांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच सांगितलं
Embed widget