Punjab CM : नवज्योतसिंह सिद्धू की सुनिल जाखड? पंजाबचा नवा 'कॅप्टन' कोण?
कॅप्टन अमरिंदर सिंह (Capt. Amrinder Singh) यांच्या राजीनाम्यानंतर आता पंजाबमध्ये नव्या मुख्यमंत्र्याची निवड दिल्लीतून केली जाणार आहे. नवज्योतसिंह सिद्धू आणि सुनिल जाखड ही दोन नावं सध्या चर्चेत आहेत.
![Punjab CM : नवज्योतसिंह सिद्धू की सुनिल जाखड? पंजाबचा नवा 'कॅप्टन' कोण? Punjab Congress Crisis Navjot Singh Sidhu and Sunil Jakhar leading name for Punjab Chief Minister Punjab CM : नवज्योतसिंह सिद्धू की सुनिल जाखड? पंजाबचा नवा 'कॅप्टन' कोण?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/09/19/236a528276e0c62a97f58ae50dd3c032_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
चंदीगड : कॅप्टन अमरिंदर सिंह (Capt. Amrinder Singh) यांनी राजीनामा दिल्यानंतर आता पंजाबमधील राजकीय हालचालींना वेग आला आहे. एकीकडे पंजाब काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सुनिल जाखड (Sunil Jakhar) यांच्या घरी अनेक आमदारांनी भेट देऊन भावी मुख्यमंत्री म्हणून त्यांचे अभिनंदन सुरु केलं आहे तर दुसरीकडे नवज्योतसिंह सिद्धूंनीही (Navjot Singh Sidhu) आमदारांच्या भेटीगाठीतून मोठी लॉबिंग सुरु केली आहे. त्यामुळे पंजाबचा नवा 'कॅप्टन' कोण याची उत्सुकता वाढली असून अवघ्या काही तासातच त्याची दिल्लीतून घोषणा केली जाणार आहे.
कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी शनिवारी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेस आमदारांची नियोजित बैठक रद्द करण्यात आली होती. त्यामुळे आता पंजाबचा मुख्यमंत्री थेट दिल्लीतून निवडला जाणार हे नक्की झालं. आज दुपारी तीन वाजता पंजाबच्या नव्या मुख्यमंत्र्याची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.
CM Amarinder Singh Resigns: पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर यांना खुर्ची का गमवावी लागली?
पंजाबच्या मुख्यमंत्रीपदासाठी अनेक नावांची चर्चा सुरु आहे. काँग्रेस हायकमांडने ज्येष्ठ नेत्या अंबिका सोनी यांना मुख्यमंत्री पद स्वीकारण्याचा प्रस्ताव दिला होता. पण पंजाबच्या मुख्यमंत्रीपदी एखाद्या शिख नेत्याची नियुक्ती करावी असं सांगत अंबिका सोनी यांनी तो प्रस्ताव नाकारला.
माजी प्रदेशाध्यक्ष सुनिल जाखड यांच्या निवासस्थानी सकाळपासून अनेक आमदारांनी भेटी दिल्या आहेत. त्यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून अभिनंदन करायला सुरुवात केली आहे. दुसरीकडे नवज्योतसिंह सिद्धू यांनीही मुख्यमंत्रीपदाची माळ आपल्या गळ्यात पडावी यासाठी जोरदार लॉबिंग सुरु केली आहे.
काँग्रेस हायकमांडकडे आपला राजीनामा दिल्यानंतर कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी पंजाबच्या नव्या मुख्यमंत्रीपदासाठी नवज्योतसिंह सिद्धू यांच्या नावाला विरोध केला आहे. नवज्योतसिंह सिद्धू हे अकार्यक्षम असून ते राष्ट्रीय सुरक्षेला धोका असल्याचं कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी म्हटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)