एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
हृदयावरील शस्त्रक्रियेतील स्टेंटवर 270 ते 1000 टक्के नफा
मुंबई : हृदयावरील शस्त्रक्रियेसाठी रुग्णाला हजारापासून लाख रुपयांपर्यंत खर्च येतो. मात्र या शस्त्रक्रियेत वापरल्या जाणाऱ्या एका स्टेंटमागे रुग्णालयं हजारोंची कमाई करत असल्याचं समोर आलं आहे. एका स्टेंटमागे 270 ते 1000 टक्क्यांपर्यंत नफा होत असल्याची आकडेवारी आहे.
स्थानिक कंपन्यांना स्टेंट बनवण्यासाठी अंदाजे आठ हजार रुपयांपर्यंत खर्च येतो. मॅन्युफॅक्चररचं मार्जिन अत्यंत कमी असून वितरकांना 13 टक्क्यांपासून दोनशे टक्क्यांपर्यंत नफा होतो. रुग्णालयांकडून किमतीत 11 ते 654 टक्क्यांपर्यंत वाढ केली जाते.
कारखानदारापासून रुग्णापर्यंत प्रत्यक्ष स्टेंट पोहचेपर्यंत किमतीत दसपट वाढ होते. राष्ट्रीय फार्मास्युटिकल दर प्राधिकरण (NPPA)ने स्टेंटच्या किमतीत विविध पातळ्यांवर होणाऱ्या वाढीविषयी आकडेवारी जाहीर केली.
स्थानिक मॅन्युफॅक्चररना स्टेंटसाठी आठ हजार रुपये खर्च येतो, तर परदेशातून आयात केलेल्या स्टेंटसाठी 5 हजार रुपये खर्च येतो.
रुग्णालयांकडून स्टेंटवर सर्वाधिक म्हणजे 650 टक्क्यांपर्यंत मार्जिन मिळवलं जातं. एकूण नफा 270 टक्क्यांपासून एक हजार टक्क्यांपर्यंत असतो.
रुग्णालयांकडूनच मोठ्या प्रमाणात नफेखोरी होत असली तरी सगळीच हॉस्पिटल्स इतकी मोठी रक्कम आकारत नाहीत. त्यामुळेच नफ्याची मर्यादा 11 टक्क्यांपासून 654 टक्क्यांपर्यंत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement