एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
नियम धाब्यावर बसवत लॉकडाऊन काळात कर्नाटकच्या आरोग्यमंत्र्यांची भव्य मिरवणूक
लॉकडाऊनच्या कालावधीत आणि कोरोना रुग्ण वाढत असताना कर्नाटकचे आरोग्यमंत्री श्रीरामलू यांनी एका भव्य मिरवणुकीत सहभागी होऊन लॉकडाऊनचे सगळे नियम धाब्यावर बसवले आहेत.
चित्रदुर्ग : लॉकडाऊनच्या कालावधीत आणि कोरोना रुग्ण वाढत असताना कर्नाटकचे आरोग्यमंत्री श्रीरामलू यांनी एका भव्य मिरवणुकीत सहभागी होऊन लॉकडाऊनचे सगळे नियम धाब्यावर बसवले आहेत. हजारो लोक मिरवणुकीत सहभागी झाले होते. चित्रदुर्ग येथे वेदवती नदीचे पूजन करण्यासाठी आलेल्या आरोग्य मंत्री श्रीरामलू यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. विशेष म्हणजे मिरवणुकीत सहभागी झालेल्या आरोग्यमंत्री श्रीरामलू यांनी मास्क देखील घातला नव्हता.
या मिरवणुकीत हजारो लोकांनी भाजपचे झेंडे हातात घेऊन गर्दी केली होती. यावेळी भलामोठा सफरचंदाचा हार त्यांना घालण्यात आला. ठिकठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे तीनतेरा वाजवून पुष्पवृष्टी करण्यात येत होती. मिरवणुकीच्या मार्गावर फटाकेही फोडण्यात आले. अनेक जण श्रीरामलू यांच्या जवळ जावून पुष्पहार देखील घालत होते. नदीचे पूजन करण्यासाठी गेलेल्या श्रीरामलू हे भव्य मिरवणुकीत सहभागी होऊन सगळे नियम धाब्यावर बसवल्याबद्दल त्यांच्यावर टीका होत आहे.
हजारो लोकांच्या मिरवणुकीत सहभागी झाल्याबद्दल श्रीरामलू यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. मिरवणुकीचा व्हिडीओ व्हायरल झाला असून सोशल मीडियावर देखील श्रीरामलू टीकेचे धनी बनले आहेत. या मिरवणुकीमुळे सार्वजनिक आरोग्य तर धोक्यात आलेच शिवाय वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला.
विशेष म्हणजे मिरवणुकीने जावून वेदवती नदीचे पूजन करून आल्यावर मंत्री श्रीरामलू यांनी कोरोना संबंधी कोणती काळजी घ्यावी, मास्क वापरावा, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे असे माध्यमांशी बोलताना सांगितले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement