एक्स्प्लोर
Advertisement
मोदींवर भ्रष्टाचाराचा पहिलाच आरोप, राजीनाम्याचीही मागणी
राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषद घेऊन राफेल डीलप्रकरणी थेट मोदींवर तोफ डागली. भ्रष्ट मोदींनी राजीनामा द्यावा, अशी मागणी 'राफेल'वरुन राहुल गांधींनी केली
नवी दिल्ली: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भ्रष्ट आहेत. फ्रान्ससोबतच्या राफेल विमान करारप्रकरणी भ्रष्टाचाराचे आरोप होऊनही गप्प बसणाऱ्या मोदींनी राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली. राफेल विमान करार प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अनिल अंबानींच्या खिशात 30 हजार कोटी घातले असा आरोप राहुल गांधींनी केला. पंतप्रधानपदाच्या आजपर्यंतच्या कारकिर्दीत थेट मोदींवर भ्रष्टाचाराचा आरोप पहिल्यांदाच झाला आहे. यापूर्वी मोदींना ‘चौकीदारही चोर है’ असं म्हणणाऱ्या राहुल गांधी यांनी त्यांचा उल्लेख भ्रष्ट असा केला.
राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषद घेऊन राफेल डीलप्रकरणी थेट मोदींवर तोफ डागली.
पंतप्रधान मोदी राफेलवर एक शब्द बोलत नाहीत आणि संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन फ्रान्स दौऱ्यावर गेल्या आहेत. अशी काय एमर्जन्सी आली की त्या नेमक्या दसॉल्टच्या प्लॉटवरच गेल्या. असं म्हणत राहुल गांधी यांनी निर्मला सीतारामन यांच्या फ्रान्स दौ-याच्या टायमिंगवर, दसॉल्ट प्लान्ट व्हिजिटवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केली.
गली गली में शोर है, हिंदुस्तान का चौकीदार चोर है : राहुल गांधी
भारताचे पंतप्रधान भ्रष्ट आहेत, आम्ही लोकसभेत त्यांना प्रश्न विचारले तर ते डोळ्यात डोळे घालू शकले नाहीत. राफेल विमान करार प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अनिल अंबानींच्या खिशात 30 हजार कोटी घातले. त्यामुळे मोदीच भ्रष्ट आहेत. त्यांनी राजीनामा द्यावा असं राहुल गांधी म्हणाले.
राफेल विमान खरेदी करार
भारताकडून 2007 सालापासून फ्रान्सकडून अत्याधुनिक मिसाईल्स असणारे राफेल विमान खरेदी करण्याचे प्रयत्न केले जात होते. मात्र काही अडचणींमुळे या करारात अडथळा येत होता. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मागील वर्षीच्या फ्रान्स दौऱ्यानंतर या खरेदीला वेग आला आणि मोदींना भारत फ्रान्सकडून 36 फायटर जेट्स खरेदी करणार असल्याची घोषणा केली.
ग्राफिक्स व्हिडीओ | राफेल विमान नेमकं आहे तरी काय?
यूपीए सरकारच्या काळात फ्रान्सकडून 126 राफेल विमान खरेदीचा निर्णय झाला होता. यापैकी 36 विमान राफेल विमान बनवणारी कंपनी दसाल्ट एव्हिएशनकडून खरेदी करण्यात येणार होते. तर उर्वरित 90 विमानं भारतात तयार केले जाणार होते. मात्र पंतप्रधान मोदींनी जुना करार रद्द करत नव्याने खेरदीचा निर्णय घेतला.
मोदींनी करार केल्यानंतरही विमानांच्या किंमतींमुळे व्यवहार अडकून होता. फ्रान्सने भारताकडून 36 विमानांच्या मोबदल्यात 65 हजार कोटी रुपयांची मागणी केली होती. मात्र तत्कालिन संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी ही किंमत कमी करण्याची मागणी केली आणि त्यात त्यांना यशही मिळालं. 59 हजार कोटी रुपयांमध्ये हा करार झाला.
संबंधित बातम्या
काँग्रेस-भाजप वादात कळीचा मुद्दा ठरलेला राफेल करार काय आहे?
राफेल डीलबाबत सरकारला हवाई दलाची साथ
मोदी 'चोरांचे सरदार', राहुल गांधींचा पुन्हा हल्ला
फ्रान्सचे माजी राष्ट्राध्यक्ष मोदींना चोर म्हणाले, राहुल गांधींचा आरोप
काँग्रेस-भाजप वादात कळीचा मुद्दा ठरलेला राफेल करार काय आहे?
राफेल विमान करार : भारताने फक्त रिलायन्सचं नाव सुचवलं : ओलांद
गली गली में शोर है, हिंदुस्तान का चौकीदार चोर है : राहुल गांधी
ग्राफिक्स व्हिडीओ | राफेल विमान नेमकं आहे तरी काय?
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
सोलापूर
भविष्य
Advertisement