PM Modi : पंतप्रधान मोदी आज करणार बुंदेलखंड द्रुतगती महामार्गाचे उद्घाटन; Expressway चे वैशिष्ट्य काय?
PM Modi inaugurate Bundelkhand Expressway : या द्रुतगती महामार्गाचे काम 28 महिन्यात पूर्ण झाले असून आता उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे
Bundelkhand Expressway : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) शनिवारी उत्तर प्रदेशाला (Uttar Pradesh) भेट देणार आहेत. या भेटीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी बुंदेलखंड द्रुतगती महामार्गाचे उद्घाटन करणार आहेत. या द्रुतगती महामार्गाचे काम 28 महिन्यात पूर्ण झाले असून आता उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारी सकाळी साडेअकरा वाजता जालौन जिल्ह्यातील उरईमधील कैथेरी गावात बुंदेलखंड द्रुतगती महामार्गाचे उद्घाटन होणार आहे.
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यापूर्वी एक्सप्रेस वेची पाहणी
बुंदेलखंड एक्स्प्रेस वेचे उद्घाटन 16 जुलै म्हणजेच आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. 29 फेब्रुवारी 2020 मध्ये पायाभरणी करण्यात आलेल्या या एक्स्प्रेस वेचे काम कसे पूर्ण झाले याचा तपशील शोधण्यासाठी संशोधन पथकाला सांगितले होते. पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यापूर्वी मुख्य सचिव, डीजीपी यांनी बुंदेलखंड एक्सप्रेस वेची पाहणी केली. या एक्सप्रेस वे चे वैशिष्ट्य नेमके काय आहे? याचा फायदा कसा होणार आहे? या संदर्भात अधिक माहिती जाणून घ्या.
एक्सप्रेस वे चे वैशिष्ट्य नेमके काय आहे?
पंतप्रधान नरेंद्र मोदी 29 फेब्रुवारी रोजी या एक्सप्रेस वे ची पायाभरणी केली. त्यानुसार 16 जुलै 2022 रोजी एक्सप्रेस वे चे उद्घाटन होणार आहे.
- बांधकामासाठी लागणारा खर्च - 7,767 कोटी
- जमीन खरेदीसाठी खर्च - जवळपास 2,200 कोटी
- एक्सप्रेस वे ची लांबी - 296 किलोमीटर
- कुठून सुरु होणार ? - झाशी-अलाहाबाद राष्ट्रीय मार्ग क्रमांक-35 मधील चित्रकूट जिल्ह्यातील भरतकूप जवळ
- कुठपर्यंत ? - आग्रा-लखनौ द्रुतगती मार्गावर इटावा जिल्ह्यातील कुद्रेल गावाजवळ
- इतक्या जिल्ह्यांतून जाईल - 7 जिल्हे (चित्रकूट, बांदा, महोबा, हमीरपूर, जालौन, औरैया, इटावा)
एक्स्प्रेस वे वर काय झाले?
रेल्वे ओव्हर ब्रिज - 4
मोठे पूल - 14
फ्लायओव्हर - 18
टोल प्लाझा - 6
रॅम्प प्लाझा - 7
छोटे पूल - 266
एक्स्प्रेस वे बांधणीचा महत्त्वाचा टप्पा :
- 36 महिन्यांत बनवायचे होते, 8 महिने आधीच तयार.
- योगी सरकारने ई-टेंडरिंगद्वारे अंदाजे खर्चाच्या 13% म्हणजे 1,132 कोटींची बचत केली.
- कोरोनाच्या पहिल्या आणि दुसर्या लाटेत बहुतांश एक्सप्रेसवे बांधण्याचे काम झाले.
- यूपी देशाची एक्सप्रेस वे राजधानी बनली.
- यूपीचा सातवा एक्सप्रेस वे सुरु होणार. आतापर्यंत 6 ऑपरेशन झाले.
बुंदेलखंड एक्सप्रेस वे चा फायदा :
- बुंदेलखंड परिसर आग्रा-लखनौ एक्सप्रेसवे आणि यमुना एक्सप्रेसवेने जोडला जाईल.
- बुंदेलखंड प्रदेशाचा विकास केला जाईल.
- वाहनांच्या इंधन वापरात बचत होईल.
- प्रदूषणावर नियंत्रण ठेवता येईल.
- द्रुतगती मार्गाने जोडलेल्या जिल्ह्याचा सामाजिक आणि आर्थिक विकास होईल.
- शेती, पर्यटन आणि उद्योगांचे उत्पन्न वाढेल.
महत्वाच्या बातम्या :
PM Modi : पंतप्रधान मोदी शनिवारी उत्तर प्रदेश दौऱ्यावर, बुंदेलखंड द्रुतगती महामार्गाचे करणार उद्घाटन
Ram Setu : राम सेतूला राष्ट्रीय स्मारक घोषित करण्याची मागणी; 26 जुलै रोजी सुप्रीम कोर्टात सुनावणी