एक्स्प्लोर

रामनाथ कोविंद यांना JDU-BJD नंतर TRS चंही समर्थन

नवी दिल्ली : रामनाथ कोविंद हे देशाचे 14 वे राष्ट्रपती होण्याचा मार्ग जवळपास निश्चित झाला आहे. कारण एनडीएने राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत आवश्यक असणाऱ्या मतांची जुळवाजुळव केली आहे. जेडीयू आणि बीजेडीनंतर तेलंगणा राष्ट्र समिती अर्थात टीआरएसनेही कोविंद यांना पाठिंबा दिला आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी रामनाथ कोविंद यांच्या नावाची घोषणा करताच पाठिंबा देण्याची घोषणा केली. नितीश कुमार यांच्याकडे 20 हजार 935 मतं आहेत. टीआरएसच्या पाठिंब्यामुळे एनडीएच्या मतांची आकडेवारी आणखी वाढणार आहे. त्यामुळे रामनाथ कोविंद यांना राष्ट्रपती करण्याचा मार्ग एनडीएसाठी आणखी सोपा होणार आहे. दरम्यान राज्यात शिवसेनेने आपली भूमिका अजून स्पष्ट केलेली नाही. मायावतींचाही पाठिंबा विरोधी पक्षांनी कुणी दलित चेहरा नाही दिला तर दलित चेहरा म्हणून रामनाथ कोविंद यांना पाठिंबा देऊ, असं बसपा अध्यक्ष मायावती यांनी स्पष्ट केलं आहे. मायावतींकडे 8 हजार 200 मतं आहेत. राष्ट्रपती निवडणुकीची प्रक्रिया राष्ट्रपती निवडणुकीची प्रक्रिया सुरु झाली आहे. आतापर्यंत 15 उमेदवारांनी अर्ज दाखल केला आहे. अर्ज दाखल करण्याची अखेरची तारीख 28 जून आहे. तर 1 जुलैपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. यानंतर 17 जुलै रोजी मतदान होईल आणि 20 जुलै रोजी राष्ट्रपतींची घोषणा होईल. सध्याचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा कार्यकाळ 24 जुलै रोजी संपणार आहे. तर नवनिर्वाचित राष्ट्रपती 25 जुलै रोजी पदभार स्वीकारतील. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतांची आकडेवारी कशी? लोकसभेतले 543 राज्यसभेतले 233 असे एकूण 776 खासदार मतदान करतात प्रत्येक खासदाराच्या एका मताची किंमत ही 708 आहे (देशातल्या सर्व आमदारांच्या मतांची एकत्र किंमत भागिले 776 असे करुन हा आकडा काढला जातो) देशातल्या एकूण आमदारांची संख्या 4120 म्हणजे 776 खासदार अधिक 4120 आमदार = 4896 जणांचं निर्वाचक मंडळ ( electoral college) ……………. आमदारांच्या एका मताची किंमत ही प्रत्येक राज्यात वेगवेगळी असते उदा. महाराष्ट्र महाराष्ट्राची 1971 मधली लोकसंख्या : 5,04,12,235 5,04,12,235 (पाच कोटी 4 लाख) भागिले 288 याचं उत्तर येतं 1,75,042 (288 नं भागण्याचं कारण विधानपरिषदेचे आमदार या निवडणुकीत मत देऊ शकत नाहीत) एका आमदाराच्या मताची किंमत काढण्यासाठी या संख्येला एक हजारने भागा, उत्तर 175.042 त्याची पूर्णांक संख्या म्हणून 175 ही महाराष्ट्रातल्या एका आमदाराच्या मताची किंमत यात 1971 हे लोकसंख्येसाठी आधारभूत वर्ष आहे ……………. यूपीत एका आमदाराच्या मताची किंमत 208, तर गोव्यासारख्या छोट्या राज्यात ती 20 आहे ……………. राष्ट्रपतींच्या निवडीसाठी एकूण मतांची किंमत 10,98,882 ( यात 776 गुणिले 708 अधिक देशातल्या एकूण आमदारांच्या मताची किंमत 5,49,474) ……………. बहुमतासाठी आकडा : 5,49,442 ……………. पाच राज्यांच्या निवडणुका होण्याआधी एनडीएकडे 4,74,336 मते होती पाच राज्यातल्या यशानंतर हा आकडा 5,29,398 झाला असला, तरी अजूनही 20,044 ने कमीच आहे शिवाय हा आकडा शिवसेनेला ग्राह्य धरूनच आहे शिवसेनेकडे 21 खासदार गुणिले 708 म्हणजे 14,868 अधिक 63 आमदार गुणिले 175 म्हणजे 11,025 अशी एकूण साधारण 25 हजार मतं आहेत शिवसेना सोबत आली नाही तर एनडीएला कमी पडणाऱ्या मतांमध्ये 25 हजारांनी वाढ होऊन ती 45 हजारांवर पोहचतात ……………. ही तूट भरून काढण्यासाठी एनडीएला बीजेडी किंवा एआयडीएमके यांची मदत घ्यावी लागेल. शिवाय काही अपक्ष आमदार, खासदारही कामी येतील ………… बीजेडी सोबत आल्यास काय बीजेडी कडे 20 लोकसभा अधिक सात राज्यसभा असे एकूण 27 खासदार 27 गुणिले 708 म्हणजे 19,116 इतकी खासदारांची मतं तर 117 आमदार आहेत एका आमदाराच्या मताची किंमत ओडिशात 149 आहे 117 गुणिले 149 म्हणजे 17,433 इतकी आमदारांची मतं आहेत. दोन्हींची बेरीज केली, तर बीजेडी सोबत आल्यास 36 हजार मतांची वाढ एनडीएला मिळू शकते …………… एआयडीएमके सोबत आल्यास काय? एआयडीएमकेकडे लोकसभेत 37 तर राज्यसभेत 13 असे एकूण 50 खासदार आहेत म्हणजे 50 गुणिले 708 म्हणजे 35 हजार 400 इतकी खासदारांची मतं आहेत तर एआयडीएमकेकडे 134 आमदार आहेत तामिळनाडूत एका आमदाराच्या मताची किंमत 176 आहे 134 गुणिले 176 म्हणजे 23,584 इतकी आमदारांची मतं आहेत दोन्हींची बेरीज केली तर एआयडीएमके सोबत आल्यास साधारण 58 हजार मतांची वाढ एनडीएला मिळू शकेल. एनडीएला अजूनही मतं कमी असल्यानं शिवसेनेचा भाव टिकून आहे
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले
BMC Election : ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
Dhule Municipal Corporation Winners List : धुळे महानगरपालिका निवडणूक निकाल विजयी उमेदवार यादी, भाजपची पुन्हा सत्ता
धुळे महानगरपालिका निवडणूक निकाल विजयी उमेदवार यादी

व्हिडीओ

Ganesh Naik Special Report : गणेश नाईकांचा विजय, विरोधकांचा टांगा पलटी घोडा फरार
Sambhajinagar Municipal Election Result : संभाजीनगरमध्ये ठाकरे नाही तर शिंदेंनाच भाजपचा मोठा धक्का
Ganesh Naik On Navi Mumbai : हा नवी मुंबईच्या जनतेचा विजय, गणेश नाईकांची पहिली प्रतिक्रिया
Eknath Shinde On BMC : मुंबई महापालिकेची सत्ता युतीलाच मिळणार, एकनाथ शिंदेंचा शब्द
Thackeray Brothers : ठाकरेंची पिछाडी का? लोकांपर्यंत पोहोचायला ठाकरे कुठे कमी पडले

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले
BMC Election : ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
Dhule Municipal Corporation Winners List : धुळे महानगरपालिका निवडणूक निकाल विजयी उमेदवार यादी, भाजपची पुन्हा सत्ता
धुळे महानगरपालिका निवडणूक निकाल विजयी उमेदवार यादी
Navi Mumbai Mahanagarpalika election results 2026 all winner candidate list: नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी वाचा एका क्लिकवर
नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी वाचा एका क्लिकवर
राज ठाकरे रसमलाई म्हणाले, मुंबईतील भाजपच्या विजयानंतर के. अण्णामलाईंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
राज ठाकरे रसमलाई म्हणाले, मुंबईतील भाजपच्या विजयानंतर के. अण्णामलाईंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
MNS Winning candidates BMC Election results 2026: मुंबईतील मनसेच्या विजयी उमेदवारांची यादी, कोण-कोण जिंकलं?
MNS Winning candidates: मुंबईतील मनसेच्या विजयी उमेदवारांची यादी, कोण-कोण जिंकलं?
Mira Bhayandar Mahanagarpalika election results 2026 all winner candidate list: मीरा भाईंदर महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी, कुणाचा झेंडा फडकला?
मीरा भाईंदर महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी, कुणाचा झेंडा फडकला?
Embed widget