एक्स्प्लोर
गुजरातचा भाजप आमदार कोविंद यांच्या विरोधात मतदान करणार
राष्ट्रपती निवडणुकीसाठी देशभरातील आमदार आणि खासदार मतदान करणार आहेत. मात्र एनडीएचे उमेदवार रामनाथ कोविंद यांना मतदान करणार नसल्याचं वक्तव्य गुजरातमधील एका भाजप आमदाराने केलं आहे.
![गुजरातचा भाजप आमदार कोविंद यांच्या विरोधात मतदान करणार Presidential Election 2017 Gujarat Bjp Candidate Nalin Kotadia Will Vote Against Bjp गुजरातचा भाजप आमदार कोविंद यांच्या विरोधात मतदान करणार](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/07/17113104/Ramnath_Kovind-580x395.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
गांधीनगर : राष्ट्रपती निवडणुकीसाठी देशभरातील आमदार आणि खासदार मतदान करणार आहेत. मात्र एनडीएचे उमेदवार रामनाथ कोविंद यांना मतदान करणार नसल्याचं वक्तव्य गुजरातमधील एका भाजप आमदाराने केलं आहे. भाजपाध्यक्ष अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरातमधील आमदारच एनडीएला मतदान करणार नसल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
गुजरात सरकारने पाटीदार समाजाच्या 14 जणांची हत्या केली असून आमच्या मागण्याही मान्य केलेल्या नाहीत. त्यामुळे भाजपला मतदान करणार नाही, असं भाजप आमदार नलिन कोटडिया यांनी एबीपी न्यूजशी बोलताना जाहीरपणे स्पष्ट केलं.
पक्षाला माझ्यावर कारवाई करायची असती तर दोन वर्षांपूर्वीच केली असती. मला पक्षातून निलंबित केलं तरीही त्याची चिंता नाही, असंही कोटडिया यांनी सांगितलं.
तुम्ही भाजपच्या विरोधात आहात की रामनाथ कोविंद यांच्या, हा प्रश्नही कोटडिया यांना विचारण्यात आला. पण आपण भाजपच्या विरोधात असल्याचं कोटडिया यांनी स्पष्ट केलं. गुजरातमध्ये विधानसभा निवडणूक आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजप आमदाराचं हे वक्तव्य भाजपसाठी चिंता वाढवणारं आहे.
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. सकाळी 10 ते 5 या वेळेत संसद भवन आणि विधानसभांमध्ये खासदार आणि आमदार मतदानाचा हक्क बजावतील. या निवडणुकीत एका खास पद्धतीने तयार करण्यात आलेल्या पेनाने मतदान करण्यात येणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
करमणूक
भारत
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)